
Contents
- 1 Shirur Police Action on Road Romio ; शिरूरच्या रोड रोमिओंनो सावधान !
- 1.1 Shirur Police Action on Road Romio ; बुलेट सायलेन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या 35 सायलेन्सरवर वर शिरुर पोलिसांचा बुलडोजर !
- 1.1.1 Shirur Police Action on Road Romio ;याबाबत सविस्तर माहिती अशी—
- 1.1.2 खास भेट :
- 1.1.3 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.4 35 बुलेट सायलेन्सरवाल्यांवर कारवाई—-
- 1.1.5 आदेश शिरुर पोलिस वाहतुक शाखेला !
- 1.1.6 35 Shirur Police Action on Road Romio सायलेन्सर काढुन घेतले—-
- 1.1.7 जाहिर बुलेट फिरवण्यात आला—–
- 1.1.8 रोमिओंवर कारवाई करण्याचे आदेश—-
- 1.1.9 Shirur Police Action on Road Romio;काळ्या काचांचे फिल्मींग जागेवरच फाडण्याची कारवाई—-
- 1.1.10 About The Author
- 1.1 Shirur Police Action on Road Romio ; बुलेट सायलेन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या 35 सायलेन्सरवर वर शिरुर पोलिसांचा बुलडोजर !
Shirur Police Action on Road Romio ; शिरूरच्या रोड रोमिओंनो सावधान !
Shirur Police Action on Road Romio ; बुलेट सायलेन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या 35 सायलेन्सरवर वर शिरुर पोलिसांचा बुलडोजर !
Shirur Crime News 17 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Police Action on Road Romio ; शिरूरच्या रोड रोमिओंनो सावधान ! आता तुमच्या कर्णकर्कश बुलेट सायलेन्सर वर शिरुर पोलिसांचा बुलडोझर केव्हाही फिरु शकतो.हे लक्षात ठेवा. कठोर कारवाई करत
शिरुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी अशा 35 बुलेट सायलेन्सर वर बुलडोजर फिरवला आहे.या रोड रोमिओवर बुलेट सायलेन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या कर्ण कर्कश आवाज करत गाडीवरुन मुलींना पाहत किंवा छेड काढत फिरणार्यांच्या सायलेन्सरवर वर बुलडोजर फिरवत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
Shirur Police Action on Road Romio ;याबाबत सविस्तर माहिती अशी—
शिरुर शहर व शिरुर तालुक्यात बुलेट सायलेंसर मधुन फटाके फोडणार्या ,कर्कश आवाज करत जाण्याचे प्रकार सातत्याने घडत होते.तेही प्रामुख्याने शाळा,काॅलेज मधील येणार्या जाणार्या मुलींकडे पाहुन,त्यांची छेडछाड करुन ‘हवा’ हे ‘रोड रोमिओ’ वाहन चालक करत होते.
Read more >>
Cruelty With Cows: गाईच्या 14 वासरांना क्रुरतेची वागणुक; गुन्हा दाखल!
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
35 बुलेट सायलेन्सरवाल्यांवर कारवाई—-
त्यामुळे त्याबाबत मुली,पालक व इतर परिसरातील नागरिक व व्यवसायीक यांना त्रास होत होता.त्यामुळे शिरुर पोलिसांनी अशा 35 बुलेट सायलेन्सरवाल्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 35 बुलेट सायलेन्सर वर बुलडोझर फिरवण्यात आला.तो ही बस स्थानक परिसरात जाहीरपणे ! त्यामुळे अशा रोड रोमिओंची फजिती झाली आहे.
Read more >>
आदेश शिरुर पोलिस वाहतुक शाखेला !
शिरूर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांनी काॅलेज, शाळा बस स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणी बुलेट सायलेन्सर मधुन फटाके फोडणाऱ्या ,कर्कश आवाज करणार्या चालकांवर व बुलेट सायलेन्सर वर कारवाई करण्याचे आदेश शिरुर पोलिस वाहतुक शाखेला दिले. संदेश केंजळे यांनी दिले .
35 Shirur Police Action on Road Romio सायलेन्सर काढुन घेतले—-
त्यानंतर वाहतुक शाखेचे पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव,पोलिस अंमलदार विरेंद्र सुंभे,पोलिस अंमलदार शेखर झाडबुके,पोलिस अंमलदार अप्पासाहेब कदम ,पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे,पोलिस अंमलदार विकी मैद यांनी वरील ठिकाणी कारवाई करत 35 मोटर सायकल ताब्यात घेतल्या. त्यांचे 35 सायलेन्सर काढुन घेतले.
जाहिर बुलेट फिरवण्यात आला—–
आज 18 मार्च 2025 रोजी यांवर जाहिर बुलेट फिरवण्यात आला.त्यासाठी शिरूर बस स्थानकासमोरील व नविन पोलिस स्टेशन चे बांधकाम जेथे चालू आहे. त्याच्या जवळची जागा निवडली.आणि ही कारवाई पोलिस पथकाने पार पाडली आहे.
Read more >>
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
Shirur Crime शिरुर मधे मोटर सायकल (2) चोरीचा ‘सिलसिला’ च जणु सुरु !
रोमिओंवर कारवाई करण्याचे आदेश—-
या आधी श्री.संदेश केंजळे, यांनी पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव यांना महाविद्यालय,शाळा परिसर येथे मुलींच्या समस्या जाणुन घेण्यास सांगितले. तसेच रोड रोमिओंवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
Shirur Police Action on Road Romio;काळ्या काचांचे फिल्मींग जागेवरच फाडण्याची कारवाई—-
त्यानुसार शहर व तालुक्यातील चार चाकी काळ्या काचांचे फिल्मींग असल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. तसेच काचेचे फिल्मींग जागेवरच फाडण्याची कारवाई करण्याचे केंजळे यांनी या पथकाला सांगितले.पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर शहर वाह तुक शाखेचे पोलिस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलिस अंमलदार विरेंद्र सुंभे,पोलिस अंमलदार शेखर झाडबुके,पोलिस अंमलदार अप्पासाहेब कदम, पोलिस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलिस अंमलदार विकी मैद यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई पार पाडली आहे.