Contents1 Shirur Electricity Office: Chori शिरूर वीज वितरण कार्यालयातून ३२ हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला !1.1 Shirur Electricity Office: Chori :शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल !1.1.1 बाहेर ठेवलेले अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल दिसून आले नाहीत—1.1.2 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले—-1.1.3 शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल —1.2 खास वैचारिक भेट. ..1.2.1 सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.1.2.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३४ मध्ये काय वाचाल ..👇1.3 ✅बुद्धाची महत्ता ,मर्यादा व वारसा.. ✅ बुद्ध:शरद पाटील.. ✅ मेत्ता व करुणा.. ✅ बुद्धकालीन समाज.. ✅ ‘मावळाई प्रकाशनची प्रकाशने…1.3.1 About The Author1.3.1.1 Dr.Nitin Pawar1.3.2 ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Electricity Office: Chori शिरूर वीज वितरण कार्यालयातून ३२ हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला ! Shirur Electricity Office: Chori :शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल ! शिरूर | ७ मे २०२५ : (प्रकाश करडे यांच्याकडुन ) Shirur Electricity Office: Chori:शिरूर शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातून ३२ हजार रुपये किमतीचे विजेचे साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाहेर ठेवलेले अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल दिसून आले नाहीत— फिर्यादी मानसिंग जगदिश नेवसे (वय -३५ वर्षे, राहणार- छत्रपती कॉलनी, शिरूर) यांनी याबाबत माहिती दिली.या माहितीनुसार दिनांक ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यालय बंद करून कर्मचारी घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडले गेले. त्यावेळी बाहेर ठेवलेले अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल दिसून आले नाहीत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले—- त्यानंतर कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात रात्री २.३० वाजता एक अनोळखी व्यक्ती मोटरसायकल घेऊन गेटमधून आत येताना व त्यानंतर अल्युनियम कंडक्टर व केबल मोटरसायकलला बांधून नेताना स्पष्टपणे दिसून आला आहे . या व्यक्तीने कोणतीही परवानगी न घेता माल चोरून नेल्याचे दिसले. या चोरीत अल्युनियम कंडक्टर (२८,०००/- रुपये.) आणि १२० एम.एम. केबल (१२,०००/- रुपये) असा अंदाजे ३२,०००/- रुपयांचा माल चोरीला गेला आहे. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल — शिरुर पोलीस स्टेशन या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३(२) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत ,खेडकर हे करत आहेत. खास वैचारिक भेट. .. काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——- सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर. डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३४ मध्ये काय वाचाल ..👇 ✅बुद्धाची महत्ता ,मर्यादा व वारसा.. ✅ बुद्ध:शरद पाटील.. ✅ मेत्ता व करुणा.. ✅ बुद्धकालीन समाज.. ✅ ‘मावळाई प्रकाशनची प्रकाशने… अंक ३४, सत्यशोधक मार्क्सवादी About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Nokariche Amish 24 lakhanchi Fasavanuk:सरकारी नोकरीचे अमिष दाखवून २४ लाखांचा गंडा महिलेकडुन ! Jugar Adda Dhad:रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई !