
Contents
- 1 Shirur Crime News: न्हावरे गावात शेतजमिनीच्या वादातून देशमुख कुटुंबीयावर हल्ला – 4 जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirur Crime News: न्हावरे गावात शेतजमिनीच्या वादातून देशमुख कुटुंबीयावर हल्ला – 4 जणांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Shirur Crime News Nhaware Halla 4 Injured
दिनांक . ५ जून २०२५ | सत्यशोधक न्युज |
” Shirur Crime News: : न्हावरे (शिरूर) गावात शेतजमिनीच्या वादातून देशमुख कुटुंबियांवर शेजाऱ्यांनी हल्ला केला असून ४ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण माहिती…”
न्हावरे (ता. शिरूर) येथे शेतजमिनीच्या वाटपावरून देशमुख कुटुंबीयावर शेजाऱ्यांनी हल्ला (Shirur Crime News) केल्याचा गंभीर प्रकार घडला असून यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु. र. क्र. 380/2025 प्रमाणे भा. दं. वि. कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय ३०, व्यवसाय शेती, रा. न्हावरे, शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ च्या सुमारास त्यांच्या घरी आणि शेताच्या भागात ही घटना घडली.
जमिनीच्या वाटपावरून वाद—
महेश देशमुख यांच्यानुसार, त्यांचे शेजारी त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे, साधना शंकर देशमुख आणि यशश्री सचिन हिंगे यांनी जमिनीच्या वाटपावरून वाद घालत त्यांच्या कुटुंबियांवर शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी कमल हिंगे हिने हातातील ऊसाच्या टिपऱ्याने महेश यांच्या पाठीवर मारहाण केली.
केस ओढून, लाथाबुक्क्यांनी मारहाण—
साधना देशमुख व त्रिंबक हिंगे यांनी रूपाली देशमुख व प्रियंका जगदाळे यांच्यावर केस ओढून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्रिंबक हिंगे याने आई मंदा देशमुख यांना काठीने हातावर मारहाण करून दुखापत केली. त्याचप्रमाणे प्रियंका हिला देखील डोक्यावर आणि उजव्या हातावर काठीने मारहाण करण्यात आली.
या मारहाणी दरम्यान आरोपी त्रिंबक हिंगे याने “पुन्हा आमच्या नादाला लागलात तर चेंदामेंदा करून टाकीन,” अशी धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
शिरुर पोलिसांकडुन कसुन तपास —–

या प्रकरणाचा तपास सफौ बनकर हे करत असून, गुन्हा दाखल करण्याची नोंद पो.हवा. कळमकर यांनी केली आहे. प्रभारी अधिकारी सौ. चिवडशेट्टी (शिरूर) यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण —
स्थानिक पातळीवर या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क झाली आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—–
1. Maharashtra Police Citizen Portal
2. Shirur Taluka Official Page
3. Legal Aid India
4. Bharatiya Nyay Sanhita 2023 Overview
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —
Breaking News Shirur: करडे गावात ७ आरोपींनी केला तरुणांवर हल्ला; गंभीर जखमी, वाहनाचीही तोडफोड !
Shirur News Missing: शिरूरमधून 21 वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; 5 तोळे सोने बरोबर नेले?