
Contents
Ranjangaon MIDC News:रांजणगाव मधे एकास मारहाण : कुटुंबातील वादातून गंभीर जखमी, गुन्हा दाखल!
Ranjangaon MIDC News Ekas Marhan
दिनांक 5 जुन 2025 | सत्यशोधक न्युज |
” Ranjangaon MIDC News :रांजणगाव MIDC मध्ये कार पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कुटुंबीयांतच वाद झाला. यात डेव्हलपर्स व्यवसायिक आकाश बत्ते व त्यांच्या भावास गंभीर दुखापत झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
📍 स्थान: रांजणगाव MIDC, तालुका शिरूर, जिल्हा पुणे
🕒 घटना घडल्याची वेळ: 04 जून 2025 सकाळी 10:30 वाजता
🕒 गुन्हा दाखल: 04 जून 2025 रात्री 11:40 वाजता
📘 गुन्हा रजि. नं.: 179/2025
📜 भारतीय न्याय संहिता कलमे: 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5)
📝 घटना विवरण —-
रांजणगाव (ता. शिरूर) येथे 4 जून 2025 रोजी सकाळी एका किरकोळ कारणावरून गंभीर हाणामारीचा प्रकार घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
फिर्यादी आकाश संजय बत्ते (वय 30, व्यवसाय – डेव्हलपर्स, रा. रांजणगाव गणपती) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पार्क केलेल्या क्रेटा कार (MH-12/9400) बाबत विचारणा करताच आरोपी अभिजीत नंदू बत्ते, अनिकेत नंदू बत्ते व नंदू आनंदराव बत्ते या तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी आकाश बत्ते यांच्या उजव्या हाताचे मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले, तसेच त्यांचा भाऊ विकास बत्ते याच्या डोक्यावर पक्कडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले.
👮 तपास अधिकारी —-

• पोलीस हवालदार :पवार
• दाखल अधिकारी: पो.ह. अगलावे
• निवेदन: श्री. महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, रांजणगाव MIDC पो. स्टे.
📌 महत्वाची निरीक्षणे—
• किरकोळ वादातून झालेला प्रकार.
• कुटुंबीयांत तणाव, मागील वादांची शक्यता.
• गंभीर दुखापतीमुळे गुन्हा गंभीर स्वरूपाचा
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या —-
1. Maharashtra Police FIR Portal
2. Google Maps – Ranjangaon MIDC
3. IPC Sections Explained (Indian Kanoon)
4. Shirur Taluka Official Website (Pune District)
सत्यशोधक न्युज च्या आणखीन उपयुक्त बातम्या व लेख वाचा —-
Shirur News 16 Years Girl Missing : वॉशरूमला गेलेली बहाणा 16 वर्षीय तरुणी पळाली? वाचा सविस्तर. .