Contents1 Ranjangaon MIDC News:रांजणगाव मधे एकास मारहाण : कुटुंबातील वादातून गंभीर जखमी, गुन्हा दाखल!1.1 Ranjangaon MIDC News Ekas Marhan1.1.1 📝 घटना विवरण —-1.1.2 👮 तपास अधिकारी —-1.1.3 📌 महत्वाची निरीक्षणे—1.1.3.1 अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या —-1.1.3.2 सत्यशोधक न्युज च्या आणखीन उपयुक्त बातम्या व लेख वाचा —-1.1.4 About The Author1.1.4.1 Dr.Nitin Pawar1.1.5 ❤️ Support Satyashodhak Blog Ranjangaon MIDC News:रांजणगाव मधे एकास मारहाण : कुटुंबातील वादातून गंभीर जखमी, गुन्हा दाखल! Ranjangaon MIDC News Ekas Marhan दिनांक 5 जुन 2025 | सत्यशोधक न्युज | ” Ranjangaon MIDC News :रांजणगाव MIDC मध्ये कार पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कुटुंबीयांतच वाद झाला. यात डेव्हलपर्स व्यवसायिक आकाश बत्ते व त्यांच्या भावास गंभीर दुखापत झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” 📍 स्थान: रांजणगाव MIDC, तालुका शिरूर, जिल्हा पुणे 🕒 घटना घडल्याची वेळ: 04 जून 2025 सकाळी 10:30 वाजता 🕒 गुन्हा दाखल: 04 जून 2025 रात्री 11:40 वाजता 📘 गुन्हा रजि. नं.: 179/2025 📜 भारतीय न्याय संहिता कलमे: 118(2), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) 📝 घटना विवरण —- रांजणगाव (ता. शिरूर) येथे 4 जून 2025 रोजी सकाळी एका किरकोळ कारणावरून गंभीर हाणामारीचा प्रकार घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. फिर्यादी आकाश संजय बत्ते (वय 30, व्यवसाय – डेव्हलपर्स, रा. रांजणगाव गणपती) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर पार्क केलेल्या क्रेटा कार (MH-12/9400) बाबत विचारणा करताच आरोपी अभिजीत नंदू बत्ते, अनिकेत नंदू बत्ते व नंदू आनंदराव बत्ते या तिघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी आकाश बत्ते यांच्या उजव्या हाताचे मनगटाजवळ फ्रॅक्चर झाले, तसेच त्यांचा भाऊ विकास बत्ते याच्या डोक्यावर पक्कडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. 👮 तपास अधिकारी —- Ranjangaon MIDC News : रांजणगाव पोलिस स्टेशन • पोलीस हवालदार :पवार • दाखल अधिकारी: पो.ह. अगलावे • निवेदन: श्री. महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक, रांजणगाव MIDC पो. स्टे. 📌 महत्वाची निरीक्षणे— • किरकोळ वादातून झालेला प्रकार. • कुटुंबीयांत तणाव, मागील वादांची शक्यता. • गंभीर दुखापतीमुळे गुन्हा गंभीर स्वरूपाचा अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या —- 1. Maharashtra Police FIR Portal 2. Google Maps – Ranjangaon MIDC 3. IPC Sections Explained (Indian Kanoon) 4. Shirur Taluka Official Website (Pune District) सत्यशोधक न्युज च्या आणखीन उपयुक्त बातम्या व लेख वाचा —- News GANJA Illegal Captured | श्वान ‘रुफस’च्या मदतीने लाखों रुपयांचा गांजा कोठे जप्त करण्यात आला आहे, ते वाचा सविस्तर. Shirur News 16 Years Girl Missing : वॉशरूमला गेलेली बहाणा 16 वर्षीय तरुणी पळाली? वाचा सविस्तर. . About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur News Scope : शिरुरचे बातमी, पत्रकार आणि मिडिया विश्व कसे आहे? Ranjangaon MIDC Case: रांजणगावमध्ये तलवार व दगडाने हल्ला केल्याची प्रतितक्रार नोंद !