
Contents
- 1 ‘Operation Sindoor Shirur Rally’ तिरंगा पदयात्रा निघणार शिरूरकरांकडुन ! राष्ट्राभिमानाने सहभाग
- 1.0.1 ‘Operation Sindoor Shirur Rally’मागे भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करण्याचा विचार—-
- 1.0.2 तिरंगा पदयात्रेचा मार्ग आणि जनसमुदाय—
- 1.0.3 ‘Operation Sindoor’ म्हणजे काय?—-
- 1.0.4 ‘Operation Sindoor Shirur Rally’ चे आयोजनामागे जनतेची भावना आणि देशप्रेम—
- 1.0.5 आयोजक आणि त्यांचे आवाहन—-
- 1.0.6 ‘Operation Sindoor Shirur Rally’ चा उद्देश —
- 1.0.7 संबंधित मोफत माहिती वाचण्यासाठी :
- 1.0.8 About The Author
‘Operation Sindoor Shirur Rally’ तिरंगा पदयात्रा निघणार शिरूरकरांकडुन ! राष्ट्राभिमानाने सहभाग
शिरूर, 18 मे 2025 –(Satyashodhak News Report )
‘Operation Sindoor Shirur Rally’:भारत माता की जय… वंदे मातरम्, इन्कलाब जिंदाबाद! या राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत घोषणांनी शिरूर शहर राष्ट्रभक्तीच्या सागरात न्हावुन टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘Operation Sindoor Shirur Rally’ अंतर्गत आयोजित तिरंगा पदयात्रेस हजारोंच्या संख्येने शिरूर व परिसरातील नागरिकांनी सहभागी होवुन प्रतिसाद देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
‘Operation Sindoor Shirur Rally’मागे भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करण्याचा विचार—-
“हम है सेना के साथ, पुरा राष्ट्र है ऑपरेशन सिंदूर के साथ” या प्रेरणादायी घोषणांमधून शिरूरकरांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाला सलाम करण्याचा विचार यामागे आहे. Operation Sindoor च्या माध्यमातून भारतीय सेनेने शत्रूंवर विजय मिळवून देशवासीयांचा अभिमान वाढवला आहे. या यशाच्या गौरवासाठी आयोजित करण्यात आलेली ही भव्य तिरंगा पदयात्रा ही शिरूर शहराच्या इतिहासातील एक स्मरणीय ठरावी.असे आवाहन करण्यात आले आहे.
तिरंगा पदयात्रेचा मार्ग आणि जनसमुदाय—
ही तिरंगा पदयात्रा उद्या 19 ते 2025 ला दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मार्केट यार्ड येथून निघणार आहे. शिस्तबद्ध आणि देशभक्तीने भारलेल्या या यात्रेने हुतात्मा स्मारक चौक (शिरूर नगरपालिका मंगल कार्यालयाजवळ) पर्यंत असणार आहे. संपूर्ण मार्गावर तरुणाई, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. हातात तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा घेऊन नागरिकांनी शिरूरच्या रस्त्यांवर राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करणे आवश्यक आहे.
‘Operation Sindoor’ म्हणजे काय?—-
ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सेनेने अलीकडेच पार पाडलेले एक अत्यंत यशस्वी आणि निर्णायक लष्करी अभियान आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय जवानांनी अतिशय धाडसाने आणि रणनीतीने देशविरोधी शक्तींना निष्प्रभ केले. या मिशनमध्ये कोणत्याही नागरी हानीशिवाय मोठा विजय मिळवण्यात आला असून, शत्रूच्या अंगाचा थरकाप उडवणारा हा क्षण भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. Operation Sindoor संदर्भातील अधिक माहिती येथे वाचा.
‘Operation Sindoor Shirur Rally’ चे आयोजनामागे जनतेची भावना आणि देशप्रेम—
या ‘Operation Sindoor Shirur Rally’ दरम्यान अनेकांनी “आता एक दिवस त्यांच्यासाठी जे रोज लढतात आपल्यासाठी” या भावना व्यक्त करत लष्कराच्या शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हातात भारतीय ध्वज, पोस्टर्स, आणि सैनिकांच्या प्रतिमा असलेले बॅनर्स घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे .
आयोजक आणि त्यांचे आवाहन—-
ही पदयात्रा समस्त राष्ट्रभक्त शिरूर व पंचक्रोशी ग्रामस्थ बंधू भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. त्यांनी यशस्वी आयोजनाबद्दल करण्याचे व नागरिकांनी पुढील काळातही देशाच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले.
‘Operation Sindoor Shirur Rally’ चा उद्देश —
ही रॅली केवळ एक पदयात्रा नव्हे, तर भारतीय सेनेला पाठिंबा देणारी आणि तरुण पिढीला देशप्रेमाचे महत्व समजावण्यासाठी आहे. Operation Sindoor Shirur Rally च्या माध्यमातून शिरूरने पुन्हा एकदा सिद्ध केले पाहिजे की देशप्रेम हे केवळ शब्दांपुरते नसून कृतीतूनही ते व्यक्त करता येते.
संबंधित मोफत माहिती वाचण्यासाठी :
भारतीय सेना आणि त्यांचे अभियान
ऑपरेशन सिंदूर संदर्भातील बातम्या – The Print
देशभक्तीपर गीते आणि लेख – Bharat Ke Veer
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून. ..