
Contents
- 1 कवीता:” कारभार शिरुर नगरपालिकेचा”
- 1.0.1
- 1.0.2 कवी:डॉ.नितीन पवार.
- 1.0.3 शहर म्हणे आहे ‘शिरुर’ आपलं, भीमा तीरावर वसलेलं, इतिहास, संस्कृती,आणिक परंपरेचं सोनं जपलेलं.
- 1.0.4 माणसं सोज्वळ,बनूल, मेहनती,आणि शेतकरी स्वाभिमानी, पण नगरपालिकेचा कारभार? – फारच मनमनी…
- 1.0.5 एकेक रस्ता बनलायन खड्ड्यांचा राजा, मळलेली वाट, वाहतूकीच्या गडबडीत साजा. संध्याकाळी पायवाटे चालताना इथे, विजेचा लपंडाव — अंधारातच घसरणं, हेच तर मानणं पडतन ‘भाग’ !
- 1.0.6 कचऱ्याचे ढिग, इथे उघड्यावर तुंबलेले नाले, पावसात पाणी येते घरात, हिवाळ्यात असते धुराळे. स्वच्छतेच्या घोषणा लावल्यात इथे भिंतीवर, पण वास्तवात दुर्गंधचं भरभरून दरवळतं दर.
- 1.0.7 शाळा, दवाखाने,घंटागाडी, बालवाडी – फक्त फाइलांमध्ये सुंदर रंगवलेले, मात्र ग्राउंडवर पाहिलं तर, पडझड, गळकी छप्परं नि स्वप्नं मोडलेले.
- 1.0.8 “सिंगापुर सिटी”ची स्वप्नं दाखवली, पण मूलभूत हक्क विसरले. पाणी, रस्ता, आरोग्य आणि शिक्षण — या सगळ्यांतून प्रशासन राहिले गाफीलच उतरले. अधिकाऱ्यांच्या गाड्यांना नसते खड्ड्यांची भीती,
- 1.0.9 जनतेच्या दु:खांनी यांची झोप मात्र येई घोटी. फारच झाल्या योजना, आराखडे, उदघाटनं णि भाषणं, पण प्रश्न आहे – कधी सुरू होणार खरं कामं?
- 1.0.10 जनता विचारते, “कधी सुधारणार इथं कारभार?” प्रशासनाचं उत्तर ठरलेलं – “लवकरच येईल सर्वंकश विकासाचा भार!” पण दर निवडणुक, तेच वचन, तेच थाटातलं उद्घाटन,
- 1.0.11 कुठं आहेत त्यांचे ठोस परिणाम, हे विचारण्याचं आहे कुणाला धाडस? मुलभूत गरजांसाठी भरपुर अर्ज-नोंदणी, रांग, शिफारस, आणि फक्त प्रतिक्षा असते,
- 1.0.12 कोणी जर तक्रार केली तर “तपासतो” म्हणतात, आणि शेवटी फाईल कुठल्या कपाटात हरवतात? तरीही आम्ही असतो आशावादी — कारण लोकशाहीवर आमचा विश्वास आहे.
- 1.0.13 एक दिवस नक्की येईल, जेव्हा प्रशासन जबाबदार असेल, आणि खऱ्या अर्थाने लोकहित साधेल ! महिला, युवक, कामगार,आणि शेतकरी , सगळेच झिजतात रोज अशा व्यवस्थेत. शहराचा विकास, असतो केवळ घोषणांत , तरी कृतीत दिसावा — हीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे आमच्यात. निवडणूक आली की यांना सगळे आठवतात,
- 1.0.14 दारोदार येऊन हात जोडतात. पण एकदा सत्तेत आले की, जनतेचा आवाजच बधीर होतो त्यांच्या दरबारात.
- 1.0.15 म्हणूनच सांगतो — हे प्रशासन, आता जागं हो रे ! जनतेच्या प्रश्नांना उत्तर दे रे ! कारभाराला ‘पारदर्शकते’ची वाट दाखव! शहर आमचं आहे, तुम्ही तर आमचे सेवक,
- 1.0.16 नेते नव्हे, कामगार बना रे ! हेच आमचं आहे ध्येयवाक्य. शिरुरचा विकास हवा आम्हाला खराखुरा, कारभार हवा जनतेचा, पारदर्शक तसाच सच्चा!
- 2
- 3 शिरुर नगरपालिकेत एक नवीन योजना आली ! – “गडगडाट योजना”!
- 3.0.0.1 एक पत्रकार विचारतो, ” काय आहे ही योजना साहेब?”
- 3.0.0.2 अधिकारी म्हणतो, “शहरात कुठेही चालताना कोणी खड्ड्यात पडून ‘गडगड’ झाला,
- 3.0.0.3 तर आम्ही त्याच्या मोबाईलवर , ‘Sorry for inconvenience’ मेसेज पाठवतो!”
- 3.0.0.4 पत्रकार: “पण इलाज करणार काय?” अधिकारी: “इलाज नाही… तो येईल पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये !”
- 3.1 खास वैचारिक भेट. ..
- 3.2 • शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
कवीता:” कारभार शिरुर नगरपालिकेचा”
कवी:डॉ.नितीन पवार.
शहर म्हणे आहे ‘शिरुर’ आपलं, भीमा तीरावर वसलेलं,
इतिहास, संस्कृती,आणिक परंपरेचं सोनं जपलेलं.
माणसं सोज्वळ,बनूल, मेहनती,आणि शेतकरी स्वाभिमानी,
पण नगरपालिकेचा कारभार? – फारच मनमनी…
एकेक रस्ता बनलायन खड्ड्यांचा राजा,
मळलेली वाट, वाहतूकीच्या गडबडीत साजा.
संध्याकाळी पायवाटे चालताना इथे,
विजेचा लपंडाव — अंधारातच घसरणं, हेच तर मानणं पडतन ‘भाग’ !
कचऱ्याचे ढिग, इथे उघड्यावर तुंबलेले नाले,
पावसात पाणी येते घरात, हिवाळ्यात असते धुराळे.
स्वच्छतेच्या घोषणा लावल्यात इथे भिंतीवर,
पण वास्तवात दुर्गंधचं भरभरून दरवळतं दर.
शाळा, दवाखाने,घंटागाडी, बालवाडी –
फक्त फाइलांमध्ये सुंदर रंगवलेले,
मात्र ग्राउंडवर पाहिलं तर,
पडझड, गळकी छप्परं नि स्वप्नं मोडलेले.
“सिंगापुर सिटी”ची स्वप्नं दाखवली,
पण मूलभूत हक्क विसरले.
पाणी, रस्ता, आरोग्य आणि शिक्षण —
या सगळ्यांतून प्रशासन राहिले गाफीलच उतरले.
अधिकाऱ्यांच्या गाड्यांना नसते खड्ड्यांची भीती,
जनतेच्या दु:खांनी यांची झोप मात्र येई घोटी.
फारच झाल्या योजना, आराखडे, उदघाटनं णि भाषणं,
पण प्रश्न आहे – कधी सुरू होणार खरं कामं?
जनता विचारते, “कधी सुधारणार इथं कारभार?”
प्रशासनाचं उत्तर ठरलेलं – “लवकरच येईल सर्वंकश विकासाचा भार!”
पण दर निवडणुक, तेच वचन, तेच थाटातलं उद्घाटन,
कुठं आहेत त्यांचे ठोस परिणाम, हे विचारण्याचं आहे कुणाला धाडस?
मुलभूत गरजांसाठी भरपुर अर्ज-नोंदणी,
रांग, शिफारस, आणि फक्त प्रतिक्षा असते,
कोणी जर तक्रार केली तर “तपासतो” म्हणतात,
आणि शेवटी फाईल कुठल्या कपाटात हरवतात?
तरीही आम्ही असतो आशावादी —
कारण लोकशाहीवर आमचा विश्वास आहे.
एक दिवस नक्की येईल,
जेव्हा प्रशासन जबाबदार असेल, आणि खऱ्या अर्थाने लोकहित साधेल !
महिला, युवक, कामगार,आणि शेतकरी ,
सगळेच झिजतात रोज अशा व्यवस्थेत.
शहराचा विकास, असतो केवळ घोषणांत ,
तरी कृतीत दिसावा — हीच एक प्रामाणिक अपेक्षा आहे आमच्यात.
निवडणूक आली की यांना सगळे आठवतात,
दारोदार येऊन हात जोडतात.
पण एकदा सत्तेत आले की,
जनतेचा आवाजच बधीर होतो त्यांच्या दरबारात.
म्हणूनच सांगतो —
हे प्रशासन, आता जागं हो रे !
जनतेच्या प्रश्नांना उत्तर दे रे !
कारभाराला ‘पारदर्शकते’ची वाट दाखव!
शहर आमचं आहे, तुम्ही तर आमचे सेवक,
नेते नव्हे, कामगार बना रे ! हेच आमचं आहे ध्येयवाक्य.
शिरुरचा विकास हवा आम्हाला खराखुरा,
कारभार हवा जनतेचा, पारदर्शक तसाच सच्चा!
शिरुर नगरपालिकेत एक नवीन योजना आली ! – “गडगडाट योजना”!
एक पत्रकार विचारतो,
” काय आहे ही योजना साहेब?”अधिकारी म्हणतो,
“शहरात कुठेही चालताना कोणी खड्ड्यात पडून ‘गडगड’ झाला,तर आम्ही त्याच्या मोबाईलवर ,
‘Sorry for inconvenience’ मेसेज पाठवतो!”पत्रकार: “पण इलाज करणार काय?”
अधिकारी: “इलाज नाही… तो येईल पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये !”
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…