Girlfriend VS Wife : “तारुण्याच्या उंबरठ्यावर: मैत्री, शिक्षण, आणि समाजव्यवस्थेचा आरसा – भाग 2”
बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड : भारताच्या इतिहासात प्रथमच या देशातील तरुणाई सर्वाधिक मोकळेपणाने वावरताना दिसते.आनंदी चेहर्याची दिसते.अजुन बरेच टप्पे पुढे आहेत.पण बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आणि पती किंवा पत्नी यांमधील फरक समजुन घेण्याचे आव्हान मात्र मोठे आहे !
Girlfriend VS Wife : “तारुण्याच्या उंबरठ्यावर: मैत्री, शिक्षण, आणि समाजव्यवस्थेचा आरसा – भाग 2”
Girl Friend VS Wife But Why?
“या लेखाच्या दुसऱ्या भागात आपण आजच्या तरुणांच्या नातेसंबंधांची, शिक्षणव्यवस्थेची आणि सामाजिक परिस्थितीची बारकाईने चिकित्सा करतो.(Girlfriend VS Wife)या संकल्पनांपासून ते विवाहसंस्थेच्या जबाबदाऱ्या, जातीय अडथळे, आणि पारंपरिक दबाव यांचा वैचारिक वेध घेतला आहे. एक रोचक, चिकित्सक आणि विचारांना चालना देणारा लेख! “
Girlfriend VS Wife But Why?
हा भाग 2 ! मी लिहीत आहे. blog किंवा article ! हे लिहीताना शब्दसंख्या एका मर्यादेत असावी,असा एक लिखीत/अलिखीत नियमच आहे.त्यात ही लिहून वर Publish करण्याची संधी Google महाराजांनी दिली.माझ्या पिढीत हा दिवस अनुभवायला मिळाला.हे विशेष.माझ्या पिढीचे मोठे भाग्य की फार कमी वेळात जास्त स्थित्यंतरे आम्हाला पहायला,अनुभवायला मिळाली.अगदी तो अनुमव चित्तथरारक, विस्मित करणारा व नशीबवानांनाच मिळेल असा.त्यावर पुढे कधीतरी लिहीन.
‘स्रीसत्ताक समाज’ही अस्तित्त्वात होता…..
प्राचीन कालखंडातील स्रीसत्ताक समाज ते AI पर्यंत आपण थोडक्यात पाहीले.हे सविस्तर वाचायला मिळेल. इव्हाल नोहा हरारी यांची पुस्तके कु कु एफ एम,स्टोरीटेलवर उफलब्ध आहेत.तर भारतातील प्रचंड संख्येने असलेला तरुण वर्ग एकुण लोकसंख्येच्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत सुमार दर्जाचा असल्याचे दिसुन येते.त्याचे कारण विज्ञानाचे फायदे घ्यायचे पण विज्ञानाची समज घ्यायचीच नसते असेच जणु काही इथली शिक्षणव्यवस्था विद्यार्थीना शिक्षण देत असते.अशा मानसिक स्थितीत आजच्या तरुण- तरुणीला ‘बॉयफ्रैंड व गर्लफ्रेंड’ या नव्या अनुभवाला सामोरे जावे लागले किंवा तो रोमांच अनुभवण्याचे भाग्य लाभले !
संकल्पनेचा चुकीचा अर्थ…..
अनेक अवैज्ञानिक प्रथा,उपक्रम शाळांमधेच राबवले जातात.उदाहरणार्थ, शाळांमधे तर संविधानातील प्रास्ताविकातील धर्मनिरपेक्षता हे तत्व शिक्षक ,प्राध्यापकांना clear नसल्याचे स्पष्ट दिसते.त्यामुळे अगदी सहजपणे शाळा,महाविद्यालये धार्मिक कार्यक्रम करतात.त्यात सरळसरळ कित्येक अंधश्रद्धा असतात.त्यामुळे अवैज्ञानिक प्रथा,परंपरा या चुकीच्या आहेत,याची साधी कल्पनाही या विद्द्यार्थ्यांना,शिक्षकांना,आणि प्राध्यापकांना नसते.अशा स्थितीत काहीशी वैज्ञानिक अशीच ही ‘बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड’ संकल्पना स्विकारताना तरुण तरुणींची कसरत होताना दिसते.तर चाळीसी ओलांडलेल्यांना ‘बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड’ आपल्यालाही मिळावेत असे वाटू लागले.त्याच प्रेरणे(?)युन ‘तशा’ काही टिव्हीवर मालिका,चित्रपट,नेटफ्लिक्सवर विषय येउ लागले.
शिक्षण व्यवस्था. ….
लोकशाही मुल्ये मुल्ये समाजात रुजवण्यासाठी यांना जनतेचा पैसा पगार म्हणून दिला जातो,याचा विसर पडतो.शिकवणार्यांची ही अवस्था तर शिकणार्यांची काय अवस्था होत असेल.त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होण्याचे प्रमाण फार कमी आहे. पर्यायाने IQ सुमार दर्जाचा दिसुन येईल.यांचे एकदा व्यापक देशव्यापी सर्वेक्षण केले तर बरे होईल ! पण ते कोण करणार? कारण सगळे सारखेच आहेत. मग काय परदेशातुन प्रशिक्षक आणणार?
मी संगणक शिकवणारे असे बहाद्दर पाहिले आहेत.की त्यांना click करायला पटापट जमते पण इथेच click का करायचे हे सांगता येत नाही.
तरुण तरुणींमधे Clarity नाही…..
आता मुख्य विषय जो आहे या लेखाचा की बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड भरपुर मिळतात.पण एक पत्नी किंवा पती मिळवणे कठिण झाल्याचे चित्र जे समाजात दिसते ते का आहे.गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड याचा संकल्पना काय आहेत याचीही clearity या तरुणांमधे नसल्याचे दिसते.निसर्गनियमानुसार तरुण तरुणींना एकमेकांबर बोलावे,बसावे,मैत्री करावी,शिक्षण घेत असताना तरुण तरुणींनी एकत्र आपल्या चर्ची,भावना,विचार,सुख,दु:ख शेअर करावे यासाठी पुर्वी जी पद्धत फक्त तरुणांनी तरुणांशीच ,तरुणींनी तरुणींशीच करावी असे होते.
निखळ मैत्री व आनंद. …..
नाही तर तरुणाची मैत्रीण नसावी अशी काही जरुरी नाही.किंवा तरुणींना फक्त तरुणीच मैत्रीण असावी असे काही जरुरी नाही.हे आधुनिक मानसशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ व लैंगिक एक्सपर्टस ना समजले.पश्चिमेकडे आधी समजते.नंतर पुर्वेकडे प्रामुख्याने भारत,चीन या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशांमधे समजते.आणि मग मित्र म्हटले तर एखाद्याला जास्त समजून घेईल तो जास्त जवळचा मित्र ! मग हेच बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड शी असणारे नाते जे मैत्रीचे असते ते अभिप्रेत आहे.ते प्रेम किंवा लैंगिक संबंधाच्या अर्थाने नाही किंवा लग्न करण्यापुर्वीची अवस्था असाही नाही.
‘लग्न’ व्यापक पण जबाबदारीचा प्रकार. …
लग्न हे अधिक जास्त जबाबदाऱ्या आयुष्यभर लैंगिक संबंधांसह असते.कायद्यानेही अनेक गोष्टीची बंधने ,मर्यादा असणारे असते.पण फ्रेंडशिप आणि लग्न याबाबतीत तरुण तरुणींमधे गोंधळाची स्थिती आहे. बॉयफ्रेंड बरोबर लग्न नाही केले किंवा गर्लफ्रेंड बरोबर लग्न नाही केले तर आपण ‘धोका’ देणारे ठरु का? किंवा तसे केले तर आपण बदफैली ठरु का?असा एक अवघड प्रश्न तरुणांपुढे आहे.आणि बर्याच प्रमाणात या कारणामुळे तरुण तरुणी लग्न टाळत राहतात.त्यामुळे बॉयफ्रेंड,गर्लफ्रेंड असते पण पती किंवा पत्नी निश्चित करता आलेली नसते.
‘जात’ महत्वाचा घटक…..
यात एक घटक जातीचाही असतो.बायफ्रेंड, गर्लफ्रेंड दुसर्या जातीचा असेल तर? तर आपले ‘सैराट’ मधल्या परशा आणि आर्ची सारखे तर होणार नाही ना?अशी भिती वाटल्याने बरेच बायफ्रेंड, गर्लफ्रेंड हे आपल्या जातीचेच ठरवून केले जातात.म्हणजे इथे पुन्हा शिक्षणाच्या,आधुनिक वगैरे सगळ्या मुल्यांचा बट्ट्याबोळ ! वैचारिक दिवाळखोरी ! त्यात IQ कमी म्हणून विवेकवादाची ऐसीतैसी ! तो तर फार लांबची गोप्ट आहे. अर्थात हे काही रोखावे किंवा बंदी घालावी असा विषय नाही. most natural बाब आहे.
परंपरांनी केले ‘दमन’…
परंतु गेल्या दोन अडीज हजार वर्षात तारुण्य कधी अनुभवायला मिळालेच नाही ! बालपणी किंवा नातलगांनी ठरवलेले विवाह ज्याच्यात मापदंडच वेगळे व नैसर्गीक इच्छा आकांशाचे दमन करणारी पद्धती दिर्घकाल प्रचलित होती.ज्या भावना जेवढया जास्त दडपुन ठेवल्या जातात,त्या तितक्याच तास वेगाने व ताकतीने उफाळुन बाहेर येतात.क्रिया आणि प्रतिक्रिया बल समान असते विज्ञानात तसे ! आणि आजचे तरुण तरुणी सतत कानाला फोन लावून असतात.तो असाच प्रकार भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसत आहे !
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••••
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com