Girl friend vs wife concept showing two women sitting near sea representing modern relationships and marriage comparison in IndiaGirl Friend VS Wife: आधुनिक भारतीय समाजातील नातेसंबंध आणि विवाहाचा ज्वलंत प्रश्न

Girl Friend VS Wife: गर्लफ्रेंड भरपूर मिळतात पण पत्नी मिळेना?

पुणे / शिरूर |  29 मार्च 2026 ( Previously Written Article Updated)

Girl Friend VS Wife हा विषय आजच्या भारतीय समाजात अत्यंत संवेदनशील व चर्चेचा ठरलेला मुद्दा आहे. आधुनिक काळात ‘बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड’ ही संकल्पना झपाट्याने वाढताना दिसते. दुसरीकडे पारंपरिक विवाहसंस्था आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी धडपड करत आहे.

पुणे व शिरूर परिसरात अलीकडील काही घटनांनी हा प्रश्न अधिक ठळकपणे पुढे आणला आहे. प्रेमसंबंध व विवाह या दोन वेगळ्या संकल्पनांमध्ये आजचा तरुण नेमका कुठे उभा आहे? Girl Friend VS Wife क्रायसेस काय आहे. हे समजून घेण्याची प्रयत्न करु.

अलीकडेच पुणे जिल्ह्यातील एका तरुणाच्या आयुष्यात घडलेल्या घटनेने या विषयाला वास्तवाचा आधार दिला. त्या तरुणाचे आपल्या गर्लफ्रेंडसोबत दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहाचा विचार करत होते. मात्र जात ही सामाजिक भिंत त्यांच्या नात्यामध्ये अडथळा ठरली.

शिक्षित व तथाकथित प्रगत कुटुंब असूनही ‘समाज काय म्हणेल’ या विचारामुळे ते नाते तुटले. ही घटना केवळ एक उदाहरण नाही. आजही भारतीय समाजात पारंपरिक बंधने किती मजबूत आहेत? हे दर्शवणारी आहे. यासंदर्भात भारतातील आंतरजातीय विवाहाबद्दल अधिक माहिती https://en.wikipedia.org/wiki/Intercaste_marriage येथे पाहता येते.

इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर मानवी समाज नेहमीच विवाहसंस्थेवर आधारित नव्हता. अनेक अभ्यासांनुसार प्रारंभी काही समाजांमध्ये स्त्रीसत्ताक व्यवस्था अस्तित्वात होती. टोळी काळात कुटुंबाची ओळख आईवरून होत असे. नातेसंबंध अधिक मोकळे व लवचिक होते.

केरळमधील काही समुदायांमध्ये आजही त्याचे काही अंश दिसतात. या विषयावर अधिक माहिती https://en.wikipedia.org/wiki/Matrilineality येथे उपलब्ध आहे. कालांतराने समाजाची रचना बदलली. आर्थिक व राजकीय सत्तेचा केंद्रबिंदू पुरुषांकडे गेला. विवाहसंस्था अधिक कठोर व नियमबद्ध झाली.

Girl Friend VS Wife
सिगमन्ड फ्रायड

मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर मानवी नातेसंबंधांची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिगमन्ड फ्रायड यांनी असे मत मांडले आहे की, व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली भावनिक नाती व वर्तन ही त्याच्या बालपणातील पहिली 7/8 वर्षातील अनुभवाशी निगडित असतात. त्यांच्या मते, पुरुषासाठी आई ही पहिली भावनिक आकर्षणाची व्यक्ती असते.

तर स्त्रीसाठी वडील. या संकल्पनेमुळे प्रौढ वयातील नातेसंबंधांवर बालपणीच्या अनुभवांचा प्रभाव कसा पडतो, हे समजते. याबाबत अधिक माहिती https://en.wikipedia.org/wiki/Sigmund_Freud येथे वाचता येईल. Girl Friend VS Wife Crysis समजण्यासाठी सिगमन्ड फ्रायड मदत करु शकतात. आर्थर मेकियाव्हेली आन्ख खोलने का काम करु शकतात.

आधुनिक काळातील बदलांचा विचार केला तर औद्योगिक क्रांतीनंतर व विशेषतः युरोपातील महायुद्धांनंतर समाजव्यवस्थेत मोठे परिवर्तन झाले. पुरुष युद्धात गुंतले गेल्यामुळे किंवा मृत्यूमुखी पडल्यामुळे महिलांना कामासाठी घराबाहेर पडावे लागले. त्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. पण पारंपरिक कुटुंबव्यवस्थेला तडा गेला.

या बदलांमुळे वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रेमसंबंध ‘बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड’ या संकल्पना अधिक बळकट झाल्या. या ऐतिहासिक बदलांबद्दल अधिक माहिती https://en.wikipedia.org/wiki/Industrial_Revolution येथे पाहता येते.

भारतातील सध्याची परिस्थिती वेगळी असली तरी बदलाची दिशा साधारणपणे समान दिसते. पुणे, शिरूर व महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये तरुणांची मोठी संख्या आहे. डिजिटल युगामुळे माहिती आणि तंत्रज्ञान प्रत्येकाच्या हातात आले आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया यांनी नातेसंबंधांची व्याख्या बदलली आहे.

यासंदर्भात https://en.wikipedia.org/wiki/Smartphone आणि https://en.wikipedia.org/wiki/Social_media येथे सविस्तर माहिती मिळू शकते. मात्र या आधुनिकतेसोबतच पारंपरिक विचारसरणी अजूनही मजबूत आहे. त्यामुळे तरुण पिढी दोन टोकांच्या विचारांमध्ये अडकलेली दिसते.

माध्यमांचा व बाजारपेठेचा प्रभाव देखील या बदलांमध्ये मोठी भूमिका बजावत आहे. चित्रपट, वेब सिरीज व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नातेसंबंधांचे आकर्षक व अनेकदा अवास्तव चित्रण केले जाते. त्यामुळे तरुणांच्या अपेक्षा वाढतात. पण वास्तव वेगळे असल्यामुळे निराशा, गोंधळ निर्माण होतो. प्रेम, आकर्षण व जबाबदारी यामधील फरक ओळखणे कठीण जाते.

या पार्श्वभूमीवर ‘Girl Friend VS Wife’ हा वाद अधिक तीव्र होतो. एका बाजूला ‘गर्लफ्रेंड’ ही संकल्पना स्वातंत्र्य, भावनिक जोड व कमी जबाबदाऱ्या यांचे प्रतीक मानली जाते, तर दुसऱ्या बाजूला ‘पत्नी’ ही संकल्पना स्थैर्य, कुटुंब व सामाजिक मान्यता यांच्याशी जोडली जाते. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, आधुनिक तरुणांना स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे वाटते की स्थैर्य?

पुणे आणि शिरूर परिसरातही अशा प्रकारच्या अनेक घटना दिसून येतात. जिथे प्रेमसंबंध आणि विवाह यामध्ये संघर्ष निर्माण होतो. शिक्षण, नोकरी, कुटुंबीयांचा दबाव, सामाजिक अपेक्षा यामुळे तरुणांना योग्य निर्णय घेणे कठीण जाते. विशेषतः बेरोजगारी व आर्थिक अस्थिरता यामुळे विवाहसंस्थेचा विचार पुढे ढकलला जातो आहे. तर भावनिक नातेसंबंध वाढतात.

शेवटी या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष असा निघतो की समाज एका संक्रमण अवस्थेतून जात आहे. ना पारंपरिक मूल्ये पूर्णपणे संपलेली आहेत. ना आधुनिक विचार पूर्णपणे स्वीकारले गेले आहेत. या दोन्ही टोकांमध्ये संतुलन साधणे हीच खरी गरज आहे. मात्र यासाठी समाज, शिक्षण व्यवस्था व प्रशासन यांनी एकत्र येऊन तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात नातेसंबंधांबाबत अधिक गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गुन्हेगारी देखील यातून वाढेल.


अधिक वाचा इथे:

Sexual Freedom in India: Hidden Truths About Law, Society ; Human Behavior

Sexual Freedom Debate India: स्वातंत्र्य, कायदे आणि समाजातील वास्तव

Sex is Meditation – ओशो | लैंगिकता, ध्यान आणि सजगतेचा अर्थ

About The Author