Girl Friend VS Wife :’बॉयफ्रेंड’ किंवा ‘गर्लफ्रेंड’ खुप पण एक ‘पत्नी’ किंवा एक ‘पती’ मिळेना’ : (भाग -1) एक अभ्यासपूर्ण लेख.
Lifestyle:Boy Friend Girl Friend; 'बॉयफ्रेंड' किंवा 'गर्लफ्रेंड' - सध्या या नव्या युगात पदार्पण करताना भारतीय पारंपरिक समाज व अत्याधुनिक AI युगाकडे जाणारा समाज विशेषत: देशाच्या एकूण लोकसंख्येचा मोठा भाग तरुण वर्ग एक विचित्र स्थित्यंतरातून जात आहे.त्याचा घेतलेला एक मागोवा !
‘बॉयफ्रेंड’ किंवा ‘गर्लफ्रेंड’ शब्द ऐकुण मी फारसे त्याकडे लक्ष देत नव्हतो. पण एक घटना घडली. एक छान तरुण मुलगा ज्याची गर्लफ्रेंड Girlfriend होती. तिचा तो बॉयफ्रेंड Boyfriend होता. दोघांनाही लग्न करु वाटत होते. एवढा काळ त्याने त्याची ‘जात’ Caste सांगितली नव्हती. कारण ती आडवी येण्याची भिती ! पण मी स्वतः डिकास्ट Decaste 25 वर्षांपुर्वी झालो असलो तरी समाज तसा झालेला नाही. म्हणून मी ‘जात त्याने सांगुन टाकावी’ , असा सल्ला दिला. ‘जर खरचं Love प्रेम असेल तर ती घरदार सोडून येईल. नसेल तर ती विषय सोडून देईल,’ असे सांगितले.’ तसे झाले तर तुही विषय सोडून दे,’ असेही सांगितले. मग त्याने सांगितले. ते कुटुंब पांढरपेषा होते. शिक्षीत होते. तरी ‘इतर जातभाई काय म्हणतील’ या विचारांपुढे हरले. मग विषय संपला.मी विचार करु लागलो. हे विषय मी बरेच वर्षे आधी अभ्यासले होते. पण पुन्हा नव्याने विचार करु लागलो. तर दोन भागामधील एक लेखमाला तयार झाली. ती पुढीलप्रमाणे !
” सत्यशोधक न्युज “ 👉 “जिथे लोकांचा आवाज दाबला जातो, तिथे ‘सत्यशोधक न्युज’ आवाज उठवतो!” 👉 “तुमचं सत्य… तुमच्याच भाषेत… तुमच्या मनापासून!” 👉 “बघा, शेअर करा आणि सब्स्क्राईब करा – ‘सत्यशोधक न्युज’!” —– Join What’s App Number – 7776033958 ——
बॉयफ्रैंड व गर्लफ्रेंड या तशा अलिकडील संज्ञा व संकल्पना आहेत. प्राचीन कालखंडांत समाज स्रीसत्त्ताक Monoatric असल्याचे पुरावे मिळतात. नाईल Neil River नदीच्या खोर्यातील गुफाचित्रांमधे स्री Women शेती करतानाची चित्रे आहेत. भारतात कालीबंगन Kalibangan Site पुरातत्व साईटला देखील असे पुरावे मिळतात. टोळी समाजात Tribal मुल स्रीच्या पोटातून येत असल्याने टोळीतील पुरुषाची माता कोन? हे समजणे सोपे जायचे. पण पिता टोळीतील नेमका कोण आहे? हे समजायला कठिण जाई. त्यामुळे तीच्याकडे पुरुषांच्या तुलनेने जास्त तरुण असायचे. त्यामुळे स्रीची भुमिका महत्वाची असायची. हे ही महत्वाचे एक कारण आहे. त्यावेळी अर्थातच विवाहपद्धत Marriage System व Family Systemकुटुंब व्यवस्था नव्हती. म्हणजेच ‘बॉयफ्रैंड व गर्लफ्रेंड’असे कोणीच नव्हते. एकदम रन्डम Random प्रकार होता.
सिग्मड फ्राईडचे ‘मानसशास्त्र’ …..
सिगमंड फ्राईड Sigmund Fraed (आभार: विकीपिडिया):Girl Friend VS Wife
आजच्या Thyland थायलंड, Brahmadesh /Myanmar ब्रह्मदेश व भारतातील Keral केरळ सारख्या भागात स्त्री कुटुंबाची प्रमुख असते. अशी स्रीसतत्ताकतेचे अवशेष आजुनही जगाच्या काही भागात दिसुन येतात. तसे सिगमंड फ्राईड Sigmond Fraud म्हणतो, स्रीचा पहिला बॉयफ्रेंड तिचा बापच तर पुरुषाची पहिली गर्लफ्रेंड त्याची आईच असते. ते फार खोलवर जाऊन अभ्यास करणार्यांनाच समजु शकेल ! Subconsciouslevel सबकांशस लेवलला समजु शकते.
Achievements —-
आजीवन सभासद,विश्व मराठी परिषद,पुणे.
चंद्र. ..
“गर्लफ्रेंड: माझ्यासाठी तू चंद्र तारे तोडून आणशील का रे डार्लिंग?
बॉयफ्रेंड: अगं आधी मोबाईलचा चार्जर तर परत दे माझा, मग बघू चंद्र-तारे आणि सुर्य काय ते !’
Power सत्तेला महत्त्व आल्यावर पुरुषाकडील जास्त शारिरिक बळामुळे आणि स्री बर्याच काळ गर्भधारण स्थितीत Pregnant आणि मुलांचे संगोपन child care करण्यात गुतलेली असल्याने पुरुषांना तिच्याकडील सत्ता हस्तगत करणे अवघड गेले नाही. इथपर्यंत देखील बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड अशी संकल्पना नव्हती.
बायफ्रेंड गर्लफ्रेंड : अपेक्षा असते विश्वास आणि आधाराची !( Girl Friend VS Wife)
Ancient Script; प्राचीन ग्रंथांत उल्लेख……
तत्कालिन समाजातील right अधिकार आणि power सत्ता या संदर्भातील उल्लेख Ramayana रामायण महाभारतासारख्या Mahabharat ग्रंथांत Draupadi दौपदी ,Seeta सिता, Gandhari गांधारी,Kunti कुंती इ.महिला व्यक्तिरेखांमधे आढळतात. Kuntiputra Arjun कुंतीपुत्र अर्जुन ,Radheya Karna राधेय कर्ण, Gangaputra Bhishma गंगापुत्र भिष्म अशी स्री नावाने ओळखले जात होते. Niruti निऋती ही स्री गण प्रमुख असल्याचे अलिकडे संशोधनातुन सिद्ध (का.शरद पाटील) झाले असल्याचे दिसते. कित्येक Richa ऋचा लिहीणार्या स्रिया होत्या. यातही बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड सारखा प्रकार नव्हता.
एकंदरीत बराच काळ स्रीसत्ताक समाजअस्तित्त्वात होता. त्यानंतर पुरुषप्रधान व्यवस्थेने कुटुंब संस्था, विवाह संस्था, गणसंस्था, राज्यसंस्था, धर्मसंस्था आणि आता लोकशाही शासनसंस्था निर्माण केल्या. त्यांमधे स्री दुय्यम स्थानी गेली. बराच मोठा कालखंड स्रीदास्याचा female slavery आहे. जे जगभर घडले. कोणत्याही Religion धर्माची निर्मिती कोणा स्रीने केली नाही. हे लक्षनिय आहे.
प्रमुख धर्मवेत्ते पुरुषच male का ?……
Jesus येशु ख्रिस्त ( आभार:Google Play)
सर्व प्रमुख धर्मांचे निर्माणकर्ता पुरुषच दिसुनच दिसुन येतात. Jesus येशु ,Mohammod मोहमद पैगंबर इ. स्रीने जर धर्म सांगितला असता तर पुरुषव र्गाने तिचे अनुयायी होणे पसंत केले असते का? बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड याला कदाचित अपवाद ठरले असते !
आधुनिक काळातही तेच झाले—-
आजच्या आधुनिक काळातही Nation Chief राष्ट्रप्रमुख स्रिया असण्याची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. आधुनिक काळात प्रथम विशेषतः तंत्रज्ञान technology व औद्योगिक क्रांतीनंतर industrial revolution Europe युरोपियन समाजात कुटुंबव्यवस्था व पुरूषसत्ताक समाजव्यवस्थेला धक्के बसले.
बायफ्रेंड गर्लफ्रेंड : मैत्र शास्वत राहावे !(Girl Friend VS Wife)
First and Second World war पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांमधे फार कालखंडाचे अंतर नाही. ऐवढेच नाही तर पहिल्या महायुद्धाच्या नंतर लगेचच दुसर्या महायुद्धाची प्रक्रिया सुरु झाली होती. 1921 ते 1939 यांमधे काही फार अंतर नाही. मात्र या दोन महायुद्धांमुळे युरोपातील कुटुंब व्यवस्था कोलमडली. Collapse of Family System याचे प्रमुख कारण बहुतेक पुरुषवर्ग या लढाईमधे गुंतला गेला. मारला गेला. मग घरांमधील स्रियांना उपजिवीकेसाठी घराबाहेर पडणे भागच झाले. मोठ्या संख्येने स्रिया घराबाहेब मोकळा श्वास घेऊ लागल्या. ही स्रीमुक्तीच्या आधुनिक विचारसरणीचा पाया भरला जाण्याच्या सुरुवातीच्या काही कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. इथेच बायफ्रेंड व गर्लफ्रेंड संकल्पनेची Concept सुरुवात झाली. तशी आजच्या भारताची परिस्थिती आहे. कारणे आजची वेगळी असु शकतात. जसे पुरुषांमधील प्रचंड बेरोजगारी आणि स्रीयांना ‘ प्राधान्य'(?) आणि आधुनिक यंत्रांची निर्मिती इ. आहेत.
भारतीय तरुणाईला दोन हजार वर्षात प्रथमच मुक्ततेचा अनुभव !
आजचा भारत एक सर्वात ऐतिहासिक historical अशा संक्रमणातुन जात आहे. एक बाजुला देशाच्या लोकसंख्येत तरुणांची प्रचंड संख्या population आणि जागतिक बाजारपेठेतील सर्वात मोठी बाजारपेठ big market आणि जगातील सर्वात जास्त ग्राहकवर्ग customer ! त्यामुळे अत्याधुनिक तंत्रे आणि यंत्रे सहज गावागावातल्या पेठात उपलब्ध झाली. परंतु मेंदुमधे जुने विचार, प्रथा, परंपरा अर्थात software आणि एकदम आधुनिक AI, मोबाईलसारखी सर्वांना उपलब्ध होणारे यंत्र. मोबाईल फोनचा वापर नेमका कशासाठी करायचा? हे समजण्याआधीच भारतीय लोकांच्या हातात mobile phone मोबाईल फोन आला. नव्या software ने बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड संकल्पनेचा deta बिना हिचकिचाहक accept केला. कारण ते काम यंत्र करत होते. माणुस करत नव्हता.
त्याचा फायदा उचलण्यासाठी मग नफेखोर देशी आणि विदेशी उद्योजकांनी, माध्यमांनी एकदम या तरुणांच्या डोक्यावर बांबच टाकल्यासारखे झाले. स्री पुरुष यांच्या एकमेकांवरील अवलंबित्वाचा विकृत, अश्लील पण मार्केटमधे ‘चालणारा आशय content सतत डोळ्यासमोर’ धरला गेला .मग बॉयफ्रैंड व गर्लफ्रेंड यांच्या व्याख्या सोईनुसार व्हायला लागल्या. इथला तरुण एका गोंधळलेल्या मनस्थितीत सापडला !….(क्रमशः)
खास भेट ‘सत्यशोधक न्युज’ कडुन आमच्या वाचकांना वैचारिक खाद्य देण्यासाठी खास भेट !🙏
मावळाई प्रकाशन,शिरुर ; डॉ .सुभाष गवारी यांचे साप्ताहिक, ‘सत्यशोधक मार्क्सवादी ‘चा 22 वा अंक —-
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com