
Contents
Bajrang Dal Godan Shrur: शिरूर तालुक्यात गोप्रेमाचे अनोखे उदाहरण : शेतकऱ्यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून ५ गोवंश गोशाळेत केले सुपूर्द !
Bajrang Dal Godan Shrur 5 Govansha
📅 दिनांक: 06/06/2024 |🖊️ प्रतिनिधी | शिरूर |
” Bajrang Dal Godan Shrur: रामलिंग व कान्हूर मेसाई येथील शेतकऱ्यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून ५ गोवंश गोशाळेत सुपूर्द करत गोप्रेमाचे सुंदर उदाहरण सादर केले. हा उपक्रम शिरूर तालुक्यातील गोरक्षणासाठी प्रेरणादायक ठरतोय.”
शिरूर तालुक्यातील रामलिंग व कान्हूर मेसाई येथील शेतकऱ्यांनी आपल्या गोप्रेमाचे असामान्य उदाहरण सादर करत, एकूण ५ गोवंशांचे गोदान बजरंग दलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोशाळेत सुपूर्द केले.
रामलिंग येथील शेतकरी साहिल घावटे—-

रामलिंग येथील शेतकरी साहिल घावटे यांनी स्वतःची गाय व वासरू बजरंग दल शिरूरच्या माध्यमातून गोशाळेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच कान्हूर मेसाई येथील शेतकरी अविनाश भोकनल यांनीही गोदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
गोवंशांचा सांभाळ व्हावा ही इच्छा —-
गोवंशांचा जन्मापासून मृत्यूपर्यंत चांगला सांभाळ व्हावा ही या शेतकऱ्यांची प्राथमिक अट होती. “आम्हाला एकही रुपया नको, पण आमच्या गोवंशाचा प्रेमाने शेवटपर्यंत सांभाळ व्हावा,” असे भावनिक शब्दात या शेतकऱ्यांनी आपले गोप्रेम व्यक्त केले.
उपक्रमामध्ये बजरंग दल शिरूरचे, गोरक्षा विभाग—-
या संपूर्ण उपक्रमामध्ये बजरंग दल शिरूर गोरक्षा विभागाचे सहप्रमुख प्रतिकजी शर्मा, शेखरजी भंडारी, रोहितजी पटवा, गणेशजी राक्षे, यांचा सक्रिय सहभाग होता. शिरूर पोलीस स्टेशन, श्री गोरक्षण पंजरपोळ संस्था, तसेच तुकारामजी पुंडे आणि कृष्णा तौर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
बजरंग दलाच्या या गोरक्षण मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गोवंशासाठी योग्य व सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला असून, हा उपक्रम शिरूर तालुक्यात आदर्शवत ठरत आहे.
आणखीन माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना—
1. https://bharatiyagauseva.org/ – भारतीय गौसेवा संस्थेची अधिकृत वेबसाईट
2. https://goseva.net/ – गोसेवा आणि गोशाळा माहिती
3. https://pashudhan.net/ – पशुधन व्यवस्थापन संबंधित माहिती
4. https://www.bajrangdal.org/ – बजरंग दलची अधिकृत वेबसाईट
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंक वर क्लिक करुन —-
AI चा थरकाप : Shut Down Command नाकारणारे मॉडेल्स, ब्लॅकमेलिंग, आणि हत्या करण्याचे सल्ले!
Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक