
Contents
- 1 Atul Bhatkhalkar BJP News :भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची काँग्रेस नेत्याची मागणी
- 2 Atul Bhatkhalkar BJP News संदर्भातील विवादित ट्विट लिंक:
Atul Bhatkhalkar BJP News :भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची काँग्रेस नेत्याची मागणी
Atul Bhatkhalkar BJP News 23 May 2025: (Satyashodhak News Report )
Atul Bhatkhalkar BJP News संदर्भात भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी X (माजी ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर केलेले ट्विट अत्यंत आक्षेपार्ह, द्वेषजन्य आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. सदर ट्विटमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.
Atul Bhatkhalkar BJP News:काँग्रेस नेते धनंजय रामकृष्ण शिंदे यांची लेखी तक्रार —

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दादर पोलीस स्थानकात श्री. भातखळकर यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
‘अशा वर्तनामुळे सामाजिक शांतता धोक्यात येते’- धनंजय शिंदे, काँग्रेस.
शिंदे यांनी नमूद केले की, “एक लोकप्रतिनिधी म्हणून श्री. भातखळकर यांच्यावर समाजात सौहार्द निर्माण करण्याची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्या सोशल मिडिया वर्तनातून सातत्याने द्वेषपूर्ण आणि विभाजनवादी मजकूर प्रसारित केला जातो. त्यांच्या अशा वर्तनामुळे सामाजिक शांतता धोक्यात येते.”
Atul Bhatkhalkar BJP News संदर्भातील विवादित ट्विट लिंक:
https://x.com/bhatkhalkara/status/1925130462118531179?s=46
Atul Bhatkhalkar BJP News नुसार “गुन्हा दाखल केला जावा”- धनंजय शिंदे
शिंदे यांनी पुढे सांगितले की, श्री. भातखळकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला जावा:
• कलम १९६ – धार्मिक वा सामाजिक गटांमध्ये तेढ निर्माण करणे
• कलम ३५२ – वैरभावना किंवा सार्वजनिक तेढ निर्माण करणारी विधाने
• कलम ३५१(१) – शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान
• कलम ३५६ – बदनामी करणे
• माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, कलम ६७/६९A – ऑनलाइन द्वेषपूर्ण मजकूर
शिंदे यांनी पोलिसांना विनंती केली आहे की, या गंभीर प्रकरणी तातडीने कारवाई करावी व संबंधित व्यक्तीस अटक करावी, जेणेकरून समाजात शांतता व सलोखा टिकवून ठेवता येईल.
यापूर्वीही अर्णव गोस्वामी संदर्भात काँग्रेस ची होती मागणी —-
काँग्रेसने यापूर्वीही अर्णव गोस्वामी (पालघर घटना, २०२०) आणि अमित मालवीय यांच्याविरोधात सोशल मिडियावरील खोट्या व बदनामीकारक मजकुरासाठी कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवरही सध्याच्या घटनेवर तत्काळ कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
जिज्ञासु वाचकांसाठी ; अधिक माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा—-
1. Indian Penal Code (Bharatiya Nyay Sanhita 2023):
https://prsindia.org/billtrack/bharatiya-nyaya-sanhita-2023
(भारतीय न्याय संहिता २०२३ बद्दल सविस्तर माहिती)
2. Information Technology Act, 2000 (Legal Overview):
https://www.meity.gov.in/content/information-technology-act
(माहिती तंत्रज्ञान कायद्याचे अधिकृत पृष्ठ)
3. Fact Check & Digital Safety Tools:
https://cybercrime.gov.in/
(सायबर गुन्हे तक्रार नोंदणीसाठी भारत सरकारचे पोर्टल)
4. Social Media Platform Guidelines (Twitter/X Policies):
https://help.twitter.com/en/rules-and-policies
(X/Twitter वरील नियम व अटींचे अधिकृत दस्तऐवज)
5. News Report on Palghar Incident (2020) – The Hindu:
https://www.thehindu.com/news/national/other-states/congress-files-complaint-against-amit-malviya-for-defamatory-post/article25678912.ece
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून. ….