
Contents
- 1 Wife’s Murderer Arrested : बायकोचा खुन करुन पोलिसांना गुंगारा देत होता.पुढे काय घडले ते वाचा. …
- 1.1 Wife’s Murderer Arrested: रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी सापळा लावून आरोपीला ठोकल्या बेड्या !
- 1.1.1 Wife’s Murderer Arrested: पोलिसांना गुंगारा देत होता—-
- 1.1.2 Wife’s Murderer Arrested :नातेवाईकाच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात—
- 1.1.3 आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांवर—
- 1.1.4 खास भेट :
- 1.1.5 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.6 तो त्याच्या मुळ गावी येणार आहे?
- 1.1.7 वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई—-
- 1.1.8 About The Author
- 1.1 Wife’s Murderer Arrested: रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी सापळा लावून आरोपीला ठोकल्या बेड्या !
Wife’s Murderer Arrested : बायकोचा खुन करुन पोलिसांना गुंगारा देत होता.पुढे काय घडले ते वाचा. …
Wife’s Murderer Arrested: रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी सापळा लावून आरोपीला ठोकल्या बेड्या !
Shirur Taluka Crime News 12 March 2025:

Wife’s Murderer Arrested: पोलिसांना गुंगारा देत होता—-
बायकोचा खुन करुन पोलिसांना गुंगारा देत होता.पुढे काय घडले ते वाचा या बातमीमधे ! तर रांजणगाव एम आय डी सी पोलीसांनी सापळा लावून आरोपीला ठोकल्या बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी माऊली गांगुर्डे याने दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ला पत्नी मिनाबाई गांगुर्डे हिचा नातलगाच्या लग्नास जाण्यास नकार देते.याचा राग मनात धरुन तिचा रस्सीने गळा आवळुन गणेगाव खालसा येथे खुन केला होता.रांजणगाव एम आय डी सी पोलीसांना तो सतत गुंगारा देत होता. अखेर त्याच्या मुळ गावी त्याला पलिसांनी सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत.
Read more >>
Shirur Crime : भाऊ,भावजय व आईकढुन एक इसम व त्याच्या पत्नीस मारहाण !
Wife’s Murderer Arrested :नातेवाईकाच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात—
रांजणगाव एम आय डी सी क्षेत्रातील गणेगाव खालसा गावी दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ला रात्री उस तोडण्यासाठी आले ला हा कामगार माऊली उर्फ आत्माराम गांगुर्डे,मुळ गाव- ठडपिंपरी,तालुका -चाळीसगाव,जिल्हा – जळगाव याने त्याची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय -27 वर्षे हिचा माहेरी नासिक येथे त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन तिचा रस्सीने लोखंडी बाजेला गळा आवळुन तिला ठार मारले होते. म्हणुन महिलेचा भाऊ ताराचंद सुखलाल मोरे,राहणार – गणेगाव खालसा, मुळ राहणार – सिद्धवाडी,तालुका -चाळीसगाव,जिल्हा -जळगाव याने रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधे फिर्याद केली होती. खुन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला होता.
Read more >>
आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांवर—
वरिष्ठ पोलिस अधिकारी पंकज देशमुख यांनी खुनाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीस पकडण्यासंबंधी योग्य त्या सुचना रांजणगाव एम आय डी सी पोलीसांना दिल्या होत्या.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे तीन वेगवेगळी पोलिस पथके तयार करुन आरोपीचा कसुन शोध घेण्यास सुरुवात केली होती. या पथकाने आरोपीचा मलठण,पिंपरी दुमाला ,परिसरातील साखर कारखाने व कारखान्यांच्या आजुबाजुला राहणार्या उसतोड मजुर कामगारांकडे शोध घेण्यास सुरुवात केली होती.संगमनेर,कोपरगाव,श्रिगोंदा,येथेही जावून तेथील उस तोडण्यासाठी असलेल्या कामगारांकडे,हॉटेल व्यावसायिकांकडे,काही शेतकऱ्यांकडे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आरोपी सापडत नव्हता.पाचोरा,जिल्हा -जळगाव येथेही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या मुळ गावी दढपिंपरी येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच
दौंड व यवत येथील उसाच्या गुर्हाळ्यावरही शोधले.पण आरोपी पोलिसांना गुंगारा देत होताच.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
तो त्याच्या मुळ गावी येणार आहे?
शेवटी दिनांक १२/०३/२०२५ पोलिसांना तो त्याच्या मुळ गावी येणार आहे.अशी गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी,पोलिस कॉन्स्टेबल प्रविण पिठले,पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड यांचे एक पथक मुळ गावी रवाना केले.वेशांतर करून व सापळा लावून आरोपी लपतछपत येत असताना शिताफिने त्याला ताब्यात घेतले. तो मोबाईल वापरत नसल्याने त्याला पकडणे अवघड न्यायालयाने आरोपीला न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस सस्टडी दिली.
पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर शिवाजी मुंडे हे करत आहेत.
Read more >>
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई—-
पंकज देशमुख, पोलिस अधिक्षक,पुणे जिल्हा, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ,शिरुर उपविभाग प्रशांत ढोले या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राजणगाव गणपती एम आय डी सी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे,
पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात ,पोलिस हवालदार विजय सरजीने ,पोलिस हवालदार संदिप जगदाळे,पोलिस हवालदार विलास आंबेकर ,पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, प्रविण पिठले,किशोर शिवणकर यांनी ही कारवाई पार पाडली.