
Contents
- 1 What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय?
- 1.0.1 सिद्धांत एक अद्वितीयच!What is Narlikar Theory?
- 1.0.2 नारळीकर सिद्धांताची पार्श्वभूमी—
- 1.0.3 What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय?
- 1.0.4 C-Field म्हणजे काय?—–
- 1.0.5 नारळीकर सिद्धांताचे महत्त्व—-
- 1.0.6 टीका व मर्यादा—
- 1.0.7 डॉ.जयंत नारळीकर यांचे योगदान—
- 1.0.8 निष्कर्ष काय निघतो?—
- 1.0.9 अधिक अभ्यास व माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
- 1.0.10 About The Author
What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय?
(Article By Dr.Nitin Pawar,Pune. 22 May 2025)
What is Narlikar Theory? जागतिक खगोल वैज्ञानिक जगतात डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे नाव अत्यंत सन्मानाने घेतले जाते. त्यांचे संशोधन, विज्ञान प्रसार व लेखन हे विज्ञान क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. पण त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैज्ञानिक कार्य म्हणजे “नारळीकर सिद्धांत” (What is Narlikar Theory?) हा आहे.

सिद्धांत एक अद्वितीयच!What is Narlikar Theory?
हा सिद्धांत एक अद्वितीय तसाच क्रांतिकारी संकल्पना मांडतो. जो पारंपरिक ‘बिग बँग थिअरी’ च्या काही भागांना चक्क आव्हान देतो .मग चला तर मग आपण सविस्तर पाहूया “What is Narlikar Theory?” म्हणजे नेमकं काय विज्ञान आहे ते !
नारळीकर सिद्धांताची पार्श्वभूमी—
डॉ. जयंत नारळीकर हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्या काळात ‘बिग बँग थिअरी’ ही ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबाबतची मुख्य मान्यताप्राप्त थिअरी होती. आजही आहे.पण हॉयल व नारळीकर यांनी या कल्पनेला आव्हान देत पर्यायी सिद्धांत मांडला.त्याला “Steady State Theory” ; “स्थिर स्थिती सिद्धांत” म्हणतात.ही ब्रम्हांडाची स्थिती आहे.हे समजुन घ्या.त्यात आपण आहोत.म्हणजे आपल्या स्थितीशी तिचा कधीच तुटु न शकणारा ‘संबंध’ आहे. याच संकल्पनेतून पुढे ‘नारळीकर सिद्धांत’ विकसित झाला.
What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय?
“What is Narlikar Theory?” ह्या प्रश्नाचे उत्तर आहे – ब्रह्मांडाची उत्पत्ती,स्थिती व वाढीविषयीची एक वेगळी संकल्पना ही थिअरी मांडते.ही बिग बँग सिद्धांताला पर्यायी मानली जाते. या सिद्धांतात असं मानलं जातं की—-
1. ब्रह्मांड निरंतर वाढत असले तरी पण त्याचा घनतेचा दर मात्र स्थिर राहतो.
2. नवीन वस्तुमान (mass) तयार होत राहते .ज्यामुळे ब्रह्मांडाची घनता कमी होत नाही.
3. ही वस्तुमाननिर्मिती फक्त गुरुत्वाकर्षणासंबंधी नाही. ती एका नवीन प्रकारच्या क्षेत्रा (C-field) द्वारे होते.
4. ब्रह्मांडाला सुरुवात नव्हती. ते सदैव अस्तित्वात आहे. ते भविष्यकाळातही अस्तित्वात असेल.
अर्थात ही संकल्पना ‘बिग बँग थिअरी’ च्या “सिंग्युलॅरिटी” म्हणजे एका सुक्ष्मतम बिंदूपासून झालेल्या महाप्रचंड स्फोटाच्या थिअरीला विरोध करते.
C-Field म्हणजे काय?—–
नारळीकर सिद्धांतामध्ये “C-field” ही संकल्पना महत्त्वाची आहे. C म्हणजे Creation Field. या क्षेत्राच्या माध्यमातून वस्तुमानाची (Mass) निर्मिती होते. म्हणजेच जिथे काहीही नाही तिथे देखील वस्तुमान निर्माण होऊ शकते.
या सिद्धांतामुळे ऊर्जा-स्थिरतेच्या नियमाला आव्हान दिलं जाते.पण हे नवीन भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे.संशोधनात प्रत्येक शक्यता गृहित धरुन पाडताळली जाते.
नारळीकर सिद्धांताचे महत्त्व—-
✅ तो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबद्दल नवा विचार सुचवतो.
✅ ‘बिग बँग’ सिद्धांतातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करतो.उदा. सिंग्युलॅरिटी, डार्क मॅटर/एनर्जीच्या संकल्पनांसाठी गरजा देतो.
✅ गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा विस्तार – हा सिद्धांत आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादावर आधारित आहे. पण त्यात सुधारणा सुचवतो.
टीका व मर्यादा—
नारळीकर सिद्धांत एक क्रांतिकारी विचार जरी असला तरी मुख्य प्रवाहातील शास्त्रज्ञांनी ‘बिग बँग सिद्धांता’ लाच अधिक पुरावा असल्याचे मान्य केले आहे.
‘कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड’ (CMB) या ‘सिद्धते’ला ‘बिग बँग सिद्धांता’ ची पुष्टी देणारा महत्त्वाचा एक पुरावा मानतात . परंतु जयंत नारळीकर सिद्धांत याचे वेगळे स्पष्टीकरण देतात.
डॉ.जयंत नारळीकर यांचे योगदान—
डॉ.जयंत नारळीकर हे विज्ञानाचे खऱ्या अर्थाने प्रसारक होते. त्यांनी अनेक विज्ञानकथा, लेख, व पुस्तके मराठी, इंग्रजी भाषेत लिहिलेली आहेत. त्यांचे लेखन सामान्य माणसाला समजणारे व वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे आहे.भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ व ‘पद्मविभूषण’ पुरस्कारांनी गौरवान्वित केले आहे.
निष्कर्ष काय निघतो?—
What is Narlikar Theory? हा प्रश्न फक्त एका वैज्ञानिक असलेल्या सिद्धांताचा शोध नाही. तर विज्ञानाच्या स्वातंत्र्याचा, विचारशक्तीचा व कल्पनाशक्तीचा एक सन्मान आहे. या सिद्धांतामुळेसुद्धा आपण ‘बिग बेंग ‘प्रमाणे ब्रह्मांडाकडे एका नव्या दृष्टीकोनातून पाहायला लागतो. विज्ञान सतत निखळ सत्य शोधण्याची प्रक्रिया असते.ती अंतिम, ‘ उत्तर ‘ मिळेपर्यंत चालते.आधीचा एखादा सिद्धांत पुरावे व प्रयोगाद्वारे खोडला गेला तर विज्ञान तो स्विकारतो.
‘बिग बँग थिअरी ‘ जरी आजच्या काळात अधिक मान्यताप्राप्त असली तरी ‘नारळीकर सिद्धांत’ आपल्या वैज्ञानिक वैविध्याची , भारतातील बुद्धिमत्तेची साक्ष निश्चित देतो.म्हणुन तो नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
अधिक अभ्यास व माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा—-
https://en.wikipedia.org/wiki/Steady_State_theory
https://www.ias.ac.in/describe/article/reso/020/09/0849-0856 (Resonance Journal)
https://www.narlikar.com (डॉ. नरळीकर यांची अधिकृत वेबसाईट)
1 thought on “What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय? ”