
Contents
- 1 Waqf Board Jamin: वक्फ बोर्डाची जमीन गरीब/भूमिहीन मुस्लिमांसाठी कशी उपयोगी ठरू शकते?
Waqf Board Jamin: वक्फ बोर्डाची जमीन गरीब/भूमिहीन मुस्लिमांसाठी कशी उपयोगी ठरू शकते?
Waqf Board Jamin:वक्फ बोर्डाच्या जमीनीबाबत रचनात्मक व सकारात्मक दृष्टिकोनाची गरज !
(Satyashodhak News Aricle By Dr.Nitin Pawar, Editor 5 April 2025)
Waqf Board Jamin:वक्फ बोर्डाची जमीन गरीब/भूमिहीन मुस्लिमांसाठी कशी उपयोगी ठरू शकते? यावर विचार होवु शकतो.त्यामुळे
वक्फ बोर्डाच्या जमीनीबाबत रचनात्मक व सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे.या जमीनीच्या वादाच्या पार्शभुमीवर आमचे मत इथे मांडत आहोत.
वक्फ बोर्डाची जमीन गरीब/भूमिहीन मुस्लिमांसाठी कशी उपयोगी ठरू शकते?

भारतात मुस्लिम धार्मीक असणार्या वक्फ बोर्डाकडे बर्याच प्रमाणात जमीन आहे.ही धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कामासाठी राखीव ठेवलेली असते. मात्र सध्या अनेक ठिकाणी ही जमीन अपुऱ्या व्यवस्थापनाअभावी उपयोगात आणली जात नाही. जर ही जमीन योग्य पद्धतीने वापरात आणली तर ती भारतातील गरीब व भूमिहीन मुस्लिमांसाठी मोठे परिवर्तन आणणारी ठरू शकते.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
वक्फ बोर्डाच्या जमिनीचा वापर कसा वापर करता येवु शकतो?–
1. स्वस्त दरात गृहनिर्माण प्रकल्प:
वक्फ बोर्डाच्या या प्रचंड जमिनीवर गरीब मुस्लिमांनांसाठी मोफत किंवा कमी भाड्याची घरे बांधता येतील. सरकार व खाजगी कंपन्यांच्या मदतीने वाजवी दरात गृहनिर्माण योजना बनु शकते.
Read more >>
2. शैक्षणिक संस्था व तंत्रशिक्षण केंद्रांची निर्मिती:

वक्फ बोर्डाच्या जागांवर शाळा, महाविद्यालये व तंत्रशिक्षण केंद्रे उभी करुन गरीब मुस्लिम युवकांना मोफत किंवा माफक दरात शिक्षण देता येवु शकते.
3.तरुणांसाठी रोजगारनिर्मिती प्रकल्प निर्मिती:
लघु उद्योग, हस्तकला, टेलरिंग, कारागिरासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करता येवु शकतात.स्टार्टअप व स्वयंरोजगाराच्या इन्क्युबेशन सेंटर उभी करता येवु शकतात.
4. कृषी व शेती प्रकल्प निर्मिती:
वक्फ बोर्डाच्या जागेवर शाश्वत शेतीसाठी करण्यासाठी गटशेतीचा उपक्रम राबवता येवु शकतो.गरीब मुस्लिमांना शेतजमीन देऊन त्यांना कृषी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध करून देता येवु शकतात.
Read more >>
5. आरोग्य केंद्रे व रुग्णालये निर्मिती
गरीब व दुर्बल मुस्लिमांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा देण्यासठी आरोग्य केंद्रे उभी करता येवु शकतात.
काही अडचणी व उपाय —
या जमिनींचे अपारदर्शक व्यवस्थापन असणे .ही एक मोठी अडचण बाब आहे. बर्याच ठिकाणी अशा वक्फ बोर्डाच्या जमिनींचे योग्य व्यवस्थापनच नाही. यावर कठोर प्रशासनिक नियंत्रण निर्माण करणे आवश्यक आहे.
जमीन मोठ्या प्रमाणात अनधिकृत हस्तगत करणे:
अनेक वक्फ जमिनी बेकायदेशीररित्या हस्तगत केल्या गेलेल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया व सरकारने हस्तक्षेप करुन ही जमीन पुन्हा मिळवता येवु शकते.सरकारी किंवा खाजगी निधीचा अभाव: वक्फ बोर्डांच्या बऱ्याच जागांवर चांगले प्रकल्प उभे करण्यासठी सरकारी व खासगी संस्थांचा सहभाग करुन घेता येवु शकतो.
Read more >>
शांतीनगर झोपडपटटीत लिंगपिसाटाचा कारनामा ?
Shantinagar Zopadpatti ; शांतीनगर झोपडपटटी विनयभंगातील आरोपी फरार !
समारोप—

वक्फ बोर्डाच्या प्रचंड जागांचा उपयोग गरीब व भूमिहीन मुस्लिमांना झाला तर मुस्लिम समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळु शकते. सरकार,वक्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाने मिळून समजदारीने ही सध्याच्या वादाच्या पार्शभुमीवर संधी घेता येवु शकते.
ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत व सूचना आम्हाला कमेंटद्वारे कळवा!