
Contents
- 1 विजेची थेट चोरी उघड – १२ महिन्यांत ₹१२,८१० ची वीज वापरून महावितरण कंपनीची फसवणूक!
विजेची थेट चोरी उघड – १२ महिन्यांत ₹१२,८१० ची वीज वापरून महावितरण कंपनीची फसवणूक!
विजेची थेट चोरी उघड : वाचा सविस्तर बातमी मधे कायद्याच्या माहितीसह !
दिनांक ७ ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी |
शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथे सोमनाथ गायकवाड या व्यक्तीने डीपीमधून थेट वायरने वीज वापरून मागील १२ महिन्यांत ७०७ युनिट्स विजेची चोरी केली. महावितरणकडून दाखल तक्रारीनुसार ₹१२,८१० रकमेच्या वीजचोरीप्रकरणी विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरू आहे.
🔍 • गुन्हा क्रमांक: 572/2025
• कायद्याचा प्रकार: विद्युत कायदा 2003 चे कलम 135
• घटना कालावधी: 27 मे 2024 ते 26 मे 2025
• घटनास्थळ: मौजे गोलेगाव, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे
📌 घटनेचा तपशील—
शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथून विजेची थेट चोरी करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. महावितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता सोनाली समीर टोकेकर (वय – 44 वर्ष , राहणार -वारजे माळवाडी, पुणे) यांनी यासंदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
“आज पण रामलिंग रोड, बाबुराव नगर इ. शिरुर शहरातील भागात अनेक ठिकाणी ‘महावितरण’ चे काही वायरमन, कर्मचारी ५-१० हजार रुपये घेऊन डायरेक्ट लाइट कॅन्क्शन देत असल्याची माहिती देखील ‘सत्यशोधक’ ला प्राप्त होत आहे. त्याचाही तपास संबंधीत अधिकारी व पोलिस प्रशासनाने घ्यावा,अशी नागरिकांकडुन मागणी होत आहे. लाईट बिले अचानक एखाद्या महिन्यात ‘अव्वाच्या सव्वा ‘येतात.ती ‘दुरुस्त'(?) केली जातात.त्यासाठी पैसे घेतले जातात. असेही एक नागरिकाचे म्हणणे आहे.”
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार संबंधित परिसरात कोणताही वीजमीटर न आढळला नाही.म्हणुन तपास करण्यात आला.त्यावेळी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीजवळील डीपी मधून वायरच्या सहाय्याने थेट वीज वापर केली जात असल्याचे निदर्शनास आले.
⚠️ कायद्याचा भंग—
सदर वीजवापर मंजूर न करता विना मीटर थेट करण्यात आल्यामुळे हे कृत्य विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत वीजचोरी म्हणून गणले जाते. आरोपी सोमनाथ यशवंत गायकवाड (राहणार – गोलेगाव) याला याबाबत मौखिकरित्या कल्पना देण्यात आली आहे.
📷 साक्षी व पुरावे—
• महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.त्यावेळी खालील पुरावे संकलित केले आहेत.अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.शिरुर पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला.त्यात या घटनेसंदर्भात पुढील काही पुरावे तपासून पाहण्यात आले.पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.
👉 काही फोटोग्राफ्स तपासले जात आहेत.
👉 घटनास्थळ पंचनामा (दि. 26/05/2025) करण्यात आला.
👉 स्थळ तपासणी अहवाल (क्र. 24250B) तपासण्यात आल्याचे समजते.
👉 असेसमेंट शीट तपासून पाहण्यात येत आहे.
👉 वीजचोरीचे बिल इद्यादी माहिती तपासून पाहण्यात येत आहे.
या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीने मागील १२ महिन्यांत ७०७ युनिट्स वीज वापरल्याचे स्पष्ट झाले आहे .असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याची एकूण किंमत ₹१२,८१०/- इतकी आहे.असेही फिर्यादीत नमुद आहे. सदर बिल देखील न भरल्यामुळे गुन्हा अधिक गंभीर स्वरूपाचा ठरत आहे.
👮 गुन्हा दाखल—

महावितरणच्या वतीने दाखल झालेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे भारतीय विज कायदा कलम 135 नुसार शिरुर पोलिस प्रशासनाने हा गुन्हा दाखल करण्यात केला आहे.मात्र शिरुर शहर व तालुक्यातील नागरिकांच्याच शिरुर शहरातील ‘महावितरण’च्या कारभाराच्या अनेक तक्रारी व नाराजी आहे.
• दाखल अमलदार: पोलिस हवालदार दीपक पवार हे आहेत.
• तपास अधिकारी: पोलिस हवालदार मोरे हे आहेत.
• प्रभारी अधिकारी: श्री. संदेश केंजळे (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
📢 सामाजिक संदेश—
‘वीज’ ही सार्वजनिक मालमत्ता आहे.म्हणजे जनतेचीच मालमत्ता आहे. तिचा विनामूल्य व बेकायदेशीर वापर म्हणजे समाजाचा आणि शासनाचा विश्वासघातच आहे.हे देखील लक्षात घेतले पाहिजे.अशा या प्रकारामुळे प्रामाणिकपणे वीजबील भरणार्या वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार येत असतो . अशा प्रकरणांची माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ महावितरण किंवा पोलिसांना संपर्क करावा.हे कायदेशीर व योग्य असते.लोकशाहीत हक्क व कर्तव्येही सर्व नागरिकांनी पाळावी लागतात.
🔎 काय आहे विद्युत कायदा कलम 135?—
विद्युत अधिनियम कायदा कलमे 135 महाराष्ट्रात लागु असलेले एक वीजविषयक कायद्यातील महत्वाचे कलम आहे.या Electricity Act, Section 135 नुसार कुणीही वीजमीटरला छेद करून, छेडछाड करून किंवा थेट वायर लावून वीज वापरत असेल तर त्यास ‘वीजचोरी’ म्हणून शिक्षा दिली जाते.शिक्षा होवु शकते.याची माहिती वीज वापरकर्त्या नागरिकांना असणे आवश्यकत आहे.
या गुन्ह्यामधे खालील प्रमाणे शिक्षा होवु शकते—-
• दंड भरावा लागु शकतो.
• शिक्षा देखील ३ (वर्षांपर्यंत तुरुंगवास) अशी होवु शकते.
• वापरलेली वीज बिलासह भरपाई केली जावु शकते.
📈 आर्थिक फटका—
या वीजचोरी प्रकरणात
• चोरी झालेली वीज: 707 युनिट्स.
• एकूण रक्कम: ₹12,810/-
• बिल न भरल्याने कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांंना••••
🔗
2. विद्युत कायदा 2003 – कलम 135
3. पुणे ग्रामीण पोलीस – संपर्क सूची
📲 आवाहन—
“आपल्या परिसरात वीजचोरी दिसल्यास त्वरित 1912 किंवा स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधा.”
‘सत्यशोधक ‘ च्या आणखीन बातम्या व लेख इथे वाचा••••
शिरूरमध्ये ३.५६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू जप्त – एकाला अटक
Prahaar Sanghatana News: शिरूरच्या कारेगाव येथे शेतकरी कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन