
Contents
नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते ‘द बेस्ट’सलोन चे उद्धाटन !
‘द बेस्ट’ सलोन च्या उद्घाटनासाठी पिंपरी चिंचवड नाभिक समाज कार्यकर्ते सहभागी !
शिरुर,दि.21 नोव्हेंबर : (प्रकाश करडे यांच्याकडुन)
नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते ‘द बेस्ट’सलोन चे उद्धाटन करण्यात आले आहे. या ‘द बेस्ट’ सलोन च्या उद्घाटनासाठी पिंपरी चिंचवड नाभिक समाज, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड अध्यक्षांची उपस्थिती….
दिनांक 18/20/2024 रोजी पुणे ,वाकड , येथे ‘द बेस्ट` सलोन या शॉप चे उद्घाटन संपन्न झाले. त्या वेळेस नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री. गणेश वाळुंजकर यांचे हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.हा नविन शॉप अभिनेते श्री.रागदास राऊत,शिरुर यांची पिंपरी चिंचवड येथील शाखा आहे.रामदास राऊत हे अभिनेते,सामाजिक, राजकीय अशा विभिन्न क्षेत्रात कामगिरी करत असतात.
द बेस्ट सलोन’ वाकड येथे. ..
यावेळी त्यांनी पिंपरीची शहर अध्यक्ष नाभिक समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानले. इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
पुणे,वाकड येथे भव्य दिव्य अशा आधुनिक पद्धतीच्या ‘द बेस्ट सलोन’ या शॉपचे उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्याचा श्री.रामदास राऊत परिवाराकडून सन्मान करण्यात आला.
नाभिक समाजाचे पदाधिकारी उपस्थित. …
उपस्थितांमधे श्री. हेमंत श्रीखंडे अध्यक्ष (नाभिक समाज) वाकड, श्री .संभाजी रायकर, वाघोली, श्री.राजेश जगताप, उद्योजक,श्री. प्रदीप जगताप, उद्योजक , श्री.किरण जगताप, उद्योजक,श्री.शंकर वाघेरे, उद्योजक ,श्री. महादेव बुरगुडे, उद्योजक, श्री.निलेश शितोळे,श्री. नामदेव
मारकड, C.A श्री.देवाजी गुप्ता, श्री.दिनेश कुसोजी,श्री. मारुती खोत, श्री. रवींद्र कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.रामदास राउत,सौ.रंजना रामदास राऊत या दांपत्याने सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णकांत रामदास राऊत व पायल कृष्णकांत राउत यांनी केले .