
Contents
- 1 Trump as Dictator? : ट्रंफ यांचे नवीन terrif धोरण हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे का ?
- 1.1 Trump as Dictator ? : नरेंद्र मोदी ट्रंफ यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला धोरणाला शरण जातील का?
- 1.1.1 Trump as Dictator ? : डोनाल्ड ट्रंफ अमेरिकन जनतेला 21वे शतक वैभवाचे देणार ?
- 1.1.2 Trump as Dictator ? : ट्रंफ यांच्या अमेरिकन जनतेला खुश करण्यासाठी घोषणा !
- 1.1.3 Trump as Dictator ? : ट्रंफ यांनी मोदींची ‘नस’ पकडली !
- 1.1.4 Trump as Dictator ?: जनतेचे लक्ष इतरत्र वेधने !
- 1.1.5 Trump as Dictator ?: गाझा पट्टी , पॅलेस्टाईन वर आफत येणार?
- 1.1.6 Trump as Dictator ? : खरा खेळ oil तेलाचाच !
- 1.1.7 Trump as Dictator ? : जगाला consumption economy उपभोग अर्थव्यवस्था बनवण्याचे प्रयत्न !
- 1.1.8 भारताला हवे युनोत कायमस्वरुपी सदस्यत्व :
- 1.1.9 About The Author
- 1.1 Trump as Dictator ? : नरेंद्र मोदी ट्रंफ यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला धोरणाला शरण जातील का?
Trump as Dictator? : ट्रंफ यांचे नवीन terrif धोरण हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे का ?
Trump as Dictator ? : नरेंद्र मोदी ट्रंफ यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला धोरणाला शरण जातील का?
Pune , Shirur , 22 February 2025 :
( Satyashodhak News Editorial )

Trump as Dictator ? : अमेरिकेचे पुनर्निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंफ यांचे भारतविषयक नवीन terrif धोरण हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे का ? तसेच Trumph as Dictator सारखे वागत आहेत का ? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रंफ यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या धोरणाला शरण जातील का? असे प्रश्न नरेंद्र मोदींच्या अलीकडील अमेरिका दौर्यानंतर भारतात वादाचा विषय बनले आहेत . याचे कारण म्हणजे डोनाल्ड ट्रंफ यांनी युएसए मध्ये भारतीय उत्पादनांवरील टेरिफ/टॅक्स/कर आता बदलणार आहेत.असे जाहीर केले. ते भारत अमेरिकन मालावर 100℅ tax लावतो.तसे ते अमेरिकेत भारतीय मालाला लावणार आहेत.असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्यात मोदी यांच्यासमक्ष सांगितले. त्यामुळे भारतात नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. असे दिसते की या हुकूमशाही वृत्तीमुळे नरेंद्र मोदी ट्रुफच्या दबावाखाली आहेत ! याची चर्चा या लेखात आम्ही करत आहोत.
Read more>>
Sex to Superconciousness संभोगातुन समाधीकडे जाता येते का ? एक चिंतन !
• 2024-
अमेरिकेचा भारतासोबतचा एकूण वस्तू व्यापार 129.2 अब्ज डॉलर्सचा अंदाज होता.
• अमेरिकेच्या वस्तूंची भारतात निर्यात 41.8 अब्ज डॉलर्स.
• भारतातून एकूण 87.4 अब्ज डॉलर्सची आयात झाली.
• अमेरिकेची भारतासोबतची वस्तू व्यापार तूट 45.7 अब्ज डॉलर्स.
Trump as Dictator ? : डोनाल्ड ट्रंफ अमेरिकन जनतेला 21वे शतक वैभवाचे देणार ?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंफ हे आता WHO, WTO, NATO, BRISK, T20 अशा जागतिक संघटना पुन्हा नव्याने बांधत आहेत. ते एक नवीन world order तयार करत आहेत. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना जवळ करण्याचे धोरत बाळगताना दिसत आहेत. त्याद्वारे ते चीनला काउंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेन युद्ध थांबवण्याचे धोरण त्यांनी स्विकारले आहे. कारण या युद्धात अमेरिकेचे करोडो डालर खर्ची पडले आहेत. युक्रेन रशिया विरुदध युद्ध जिंकु शकत नाही. ते लांबतच आहे. युक्रेन चे झेलेंस्की काही माघार घ्यायला तयार नाहीत. नाटो देशांनाही मोठी आर्थिक झळ रशियाला नामोहरम करण्याच्या प्रयत्नात बसली आहे. तर रशियाने कालबाह्य expiry झालेली शस्त्रे संपवुन त्याचा शस्रभांडार स्वच्छ केला आहे.
Trump as Dictator ? : ट्रंफ यांच्या अमेरिकन जनतेला खुश करण्यासाठी घोषणा !

तसे आजपर्यंत अमेरिकेने कंबोडिया, व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक इत्यादी ठिकाणी लाखोंच्या संख्येने माणसे मारली आहेत.असा इतिहास आहे. तो त्याच्या गरजेनुसार धोरण बदलतो.असा इतिहास आहे. आता भारताने परिस्थिती कशी हाताळायची हा प्रश्न आहे. 21 व्या शतकातील अमेरिका उभारणी करताना आता ट्रंफ सरकार त्यांच्या देशातील नोकरशाहीवरील खर्च, विविध ठिकाणी दिला जाणारा मदत निधी , घ्यावे लागणारे कर्ज,इतर देशांमधुन अमेरीकेत होणारे स्थलांतर यांवर कडक कृती करणार आहे. मात्र इस्राएलवर खास मर्जी ठेवत गाझा पट्टीतील लढाईत इस्राईल वर 21 दशलक्ष डॉलर्स खर्च झालेले असताना मदतीचे धोरण कायम ठेवणार आहे.
Read more>>
एकनाथ शिंदे आता नाचविणार मोदी शहा यांना !
Trump as Dictator ? : ट्रंफ यांनी मोदींची ‘नस’ पकडली !
डोनाल्ड ट्रंफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत नस पकडली आहे. अदानी प्रकरण हे मोदींसाठी फार महत्त्वाचे निश्चित आहे. पण डोनाल्ड ट्रंफ यांचे म्हणणे जग मानणार आहे का ? याची जाणीव ट्रंफ यांना नसेल असे नाही. पण अमेरिकन लोकांसाठी निवडणुकीत जी आश्वासने ट्रंफ यांनी दिली होती. त्या अमेरिकन जनतेला खुश करण्यासाठी अशी राजकीय विधाने ट्रंफ करत आहेत. प्रत्यक्षामध्ये ते अमेरिकेतील बेरोजगारी, महागाई, स्थलांतरीत इ.प्रश्न सोडवु शकणार नाहीत. पण एक आशा, दिलासा ते अमेरिकन जनतेला अशा घोषणांनी देत आहेत. आणि काही काळ गेला की लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधुन जनतेच्या मुळ प्रश्नांना दुर्लक्षित करतील .

Trump as Dictator ?: जनतेचे लक्ष इतरत्र वेधने !
हे कौशल्य ते भारतातील त्यांचे मित्र मोदीजी आणि त्यापूर्वीच्या सरकारांकडुन खास शिकलेले नसतील असेही नाही. कारण अमेरिका जगभर महासत्ता असताना हे प्रश्न अमेरिकेन जनतेचे होतेच ना !
Trump as Dictator ?: गाझा पट्टी , पॅलेस्टाईन वर आफत येणार?
गाझा पट्टीतील भुमीबाबत त्यांचे वर उल्लेख केलेले हुकुमशाही प्रवृत्तीचे धोरण मात्र ‘खतरनाक’ आहे. पॅलेस्टाईन चा पुर्ण भागच निसर्गरम्य , सुंदर असा आहे. तेथुन पॅलेस्टिनींना पुर्ण दुसरीकडे हलवण्याचे जे बोलले जात आहे. ते कठोर आहे. पॅलेस्टाईन व गाझा पट्टीतील भुभाग दुबईमसारखा रूपांतरीत करणे असा तो आहे.तो आर्थिक कॉरिडॉर बनवणे, गुंतवणूक वगैरे करवुन पॅलेस्टिनीला जॉर्डन, इजिप्तमध्ये हलवणे असा असल्याची चर्चा आहे. त्यासाठी गाझावरील इराणचे धोरण बदलण्याची दबाव इराण वर आणला जात आहे.
Read more>>
पाकिस्तान ‘तबाही’ च्या मार्गावर का आहे ?
Trump as Dictator ? : खरा खेळ oil तेलाचाच !
खरे तर तेल Oil हा घटकच पुर्वीप्रमाणे या घडामोडींमागे काम करत आहे. याचे केंद्र इराण आहे. त्यावर नियंत्रण आणणे हा प्रमुख उद्देश आहे. तेथील तेलाचे प्रक्रियेनंतरचे उत्पादन, वितरण, किंमतीवर नियंत्रण प्रस्थापीत करण्यासाठी हे सगळे चालु आहे.
एका वेळी दोन युद्धे लढण्याना अमरीका घायाळ होत आहे. त्यामुळे इराणवर दबावाखाली वाढवुन
युक्रेन युद्ध थांबवण्याचे धोरण ट्रंफ अर्थात अंकल सम चे धोरण आहे. निवडणूकीत मात्र अमेरिकन जनतेला वेठीस धरत आश्वासने ट्रंफ यांनी दिली होती.
Trump as Dictator ? : जगाला consumption economy उपभोग अर्थव्यवस्था बनवण्याचे प्रयत्न !
ती पुर्ण करताना ट्रंफ यांची कसरत होणार आहे . जगातील सर्व देशांना consumption economy उपभोग अर्थव्यवस्था बनवण्याचे मात्र घडत आहे. पण चीनला शह त्यांना देता येईल का? औषधे , इलेक्ट्रॉनिक इ.अनेक बाबतीत चीन शक्तिशाली आहे. भारताने मात्र सावध पवित्रा घेतला आहे. किमाण भारतातील तज्ञ तरी तशी भुमीका घ्यावी असा इशारा मोदी सरकार ला देत आहेत. भारताकडे मोठे सैन्य आहे. आधुनिक शस्त्रे आहेत. लोकसंख्या भरपुर आहे. मोठी 140 कोटी ग्राहकांची बाजारपेठ आहे. म्हणुन तो बार्गेनिंग करु शकतो. मोदी सरकार करु शकते.करत आहे.
अमेरिकेसाठी भारत महत्त्वाचा इंडोपॅसिफिक व्यापक व रणनीती साठी अमेरिकेला चीनवर दबाव आणण्यासाठी गरजेचा आहे. भारताने नेहमी लष्करी युती नाकारली आहे. कोनतीही लष्करी गटात भारत सामिल झालेला नाही. त्याला आपल्याकडे खेळण्याचा डावही ट्रंफ सरकार चा आहे. त्याबदल्यात संयुक्त राष्ट्रसंघात कायमस्वरुपी सदस्य बनवण्यास राजी होईल !
Read more>>
भारताला हवे युनोत कायमस्वरुपी सदस्यत्व :
चीनचा याला विरोध आहे. त्याच्यामते भारत या जबाबदारीसाठी अजुन तयार, प्रगल्भ झालेला नाही. असे कारण चीनने कायमच दिले आहे. मात्र आता ते स्वरुप भारताचे नाही. हे भारतानेच ठामपणे जगाला पटवुन द्यावे लागेल. ट्रंफ यांना हाताळण्यात संयम भारताने ठेवावा असे या विषयातील तज्ञ सांगत आहेत. दोन वर्षांत ट्रंफ हे स्वतःच्याच सापळ्यात अडकतील. आणि त्यांची dictatorship संपुष्टात येईल. ते स्वतः च त्यांच्या या प्रवृत्ती मुळे अडकतील.ते अमेरिकेत रोजगार निर्मिती करु शकणार नाहीत. स्वस्तात कामगार अमेरिकेला भारत,आशिया व आफ्रिकी देशांतुन मिळतात. त्यांची गरज मात्र संपणार नाही.कारण मुक्त अर्थव्यवस्थेत नफा महत्त्वाचा असतो.
भारतासारखे इतर विषयांकडे लक्ष वळवून ते वेळ काढतील ! Terrif धोरण भारतीय अर्थव्यवस्थेला नूकसानकारक होईल.पण चीनी अर्थव्यवस्थेला बळकटी देईल.हे अमेरिकाही जाणते. म्हणुन एक राजकिय घोषणा या पलिकडे हे काही नाही. भारताच्या पंतप्रधान यांनी वैयक्तिक मैत्री किंवा अडाणी मुद्दा नाही तर राष्ट्रहित महत्वाचे मानणे आवश्यक आहे. सध्या तरी नेट अंड वाच करावे. असा तज्ञांचा सुर आहे.
एकंदरीत येणारे दशक अमेरिका,रशिया, चीन व भारत यांच्यासाठी मौलिक आहे.भारताने विचारपुर्वक व संयमाने पावले टाकणे आवश्यक आहे. असे दिसते.