
Contents
Swargate Bus Rape case Datta Gade : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुनाट येथे तपास सुरू !
Swargate Bus Rape case Datta Gade : आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईल फोन मधे आहेत बरीच रहस्ये?
Shirur 12 March 2025: (Satyashodhak News Report)
Swargate Bus Rape case Datta Gade : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुनाट येथे तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या तपासासाठी त्याला गुनाट गावात आणले गेले आहे. पांढर्या रंगाच्या पोलिसांच्या गाडीत तो दिसला आहे.याचे मुख्य कारण आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईल फोन मधे बरीच ‘रहस्ये’ असल्याची खात्री गुन्हे तपास पथकाला खात्री वाटते. त्या दृष्टीने ही ताजी महत्वाची घटना आहे.
महाराष्ट्रात गाजत असलेल्या स्वारगेट महिला बलात्कार प्रकरणामध्ये आता स्वारगेट पोलिसांकडुन हा तपास गुन्हे अन्वेशन शाखेकडे सुपुर्त करण्यात आला आहे. दरम्यान पिडीत महिला व आरोपी यांचे लोकेशन स्वारगेट सोडुन इतरत्र कोठे सापडलेले नाही.अशी माहिती मिळत आहे. आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याने तो पोलिसांना तपास कामात भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. आधी त्याने तो समलैंगिक असल्याचे सांगितले होते. पण वैद्यकिय अहवालात हे खोटे ठरलेले आहे.त्याचा गुन्ह्याच्या वेगळा मोबाईल कुठे आहे ते तो सांगत नाही.त्यावरुन सर्व माहिती उघड होऊ शकते. म्हणुन दत्ता गाडे हा ,’शातीरपणा’ करत आहे. असे पोलिसांना वाटते.तो मोबाईल फोन त्याने शेतात कुठेतरी पुरुन ठेवला असण्याची शक्यता आहे. म्हणुन त्याला त्याच्या गावात तपासासाठी आणले आहे.
त्याचा एक फोटो पोलिस गणवेशात असलेला प्राप्त झाला आहे. त्यावरुन तो पोलिस किंवा कंडक्टर ड्रायव्हरचा वेश परिधान करून गुन्हे करत होता का ? त्याचा कोणी पोलिस मित्र आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत.
पिडीत महिलेची बाजु प्रख्यात वकील अॅड. असिम सरोदे यांनी मांडण्यासाठी पुढे आल्याने हे प्रकरण म्हणजे तुंबळ वकिली लढाईचे एक उदाहरण ठरण्याची चिन्हे आता दिसु लागली आहेत. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाने खिळुन राहिले आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या महिलेवरील बलात्कार प्रकरणात आता हा नवा तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला त्याच्या मूळ गावात, गुनाट , तालुका – शिरुर,जिल्हा – पुणे येथे नेले आहे.
तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला त्याचा मोबाईल फोन कोठे लपवण्यात आला आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम गुनाट येथे पोहोचली आहे.
तपासात नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती ? —

स्वारगेट पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा केल्यानंतर आपला मोबाईल फोन नष्ट केला की कुठेतरी लपवला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र हा मोबाईल फोन या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा असू शकणार आहे. हा फोन पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याद्वारे आरोपीचे लोकेशन, त्याने कोणा कोणाशी संपर्क केला होता? तसेच गुन्हा घडल्यानंतर तो कुठे गेला होता? याची अधिक माहिती मिळू शकते.
गुनाट येथे पोलिसांची पुन्हा शोध मोहीम सुरू–

पोलिसांनी प्राथमिक तपासात आरोपीच्या कुटुंबीयांची आणि स्थानिकांची परत चौकशी सुरू केली आहे. गावातील काही लोकांच्या मते, आरोपी काही दिवसांपूर्वी येथे आला होता. मात्र मोबाईलबाबत कोणालाही काही माहिती नाही. पोलिसांनी गावातील काही परिसर आणि संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
CCTV फुटेज ल डिजिटल तपास—-
याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या मागील कॉल रेकॉर्ड्स, इंटरनेट वापर, आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. तसेच आरोपीने गुन्हा घडल्यानंतर मोबाईलचा वापर केला होता का? आणि तो कोणत्या लोकेशनवर शेवटी सक्रिय होता? याबाबत तांत्रिक तपास देखील सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे निवेदन—
पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती असू शकते. त्यासाठी आम्ही त्याला गुनाट येथे आणले आहे. लवकरच त्याचा शोध लागेल ,अशी आम्हाला अपेक्षा आहे.” अशी ताजी माहिती उपलब्ध होत आहे.
स्वारगेट महिला बलात्कार प्रकरणामधे आरोपीला कडक शिक्षा होणार?
या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून हा गुन्हा जलदगतीने तपासून न्यायालयात सादर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.हे स्पष्ट आहे.
एकंदरीत दत्ता गाडे हा काही पोलिसांना संपुर्ण खरी माहिती देत नाही. पोलिसांची तपासात दिशाभुल करत आहे, असे दिसते.मात्र तपास अजुन सुरु आहे. विषय न्याय प्रविष्ट आहे.म्हणुन माध्यमांनी संबंधित पिडीत महिलेची बदनामी होईल असे वातावरण निर्माण करू नये अशी अपेक्षा आहे. शेवटी दुध का दुध आणि पाणी का पाणी हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
1 thought on “Swargate Bus Rape case Datta Gade : स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुनाट येथे तपास सुरू !”