
Contents
- 1 ST Pass Direct to Your School : महाराष्ट्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी बस पास योजना सुरू – आता शाळेतच मिळणार पास!
ST Pass Direct to Your School : महाराष्ट्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी बस पास योजना सुरू – आता शाळेतच मिळणार पास!
ST Pass Direct to Your School Scheme
📅 शिरूर | 21 जून 2025 | सत्यशोधक न्यूज टीम |
ST Pass Direct to Your School : महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी ‘ST Pass Direct to Your School’ योजना सुरू केली आहे. आता बस पास थेट शाळेत मिळणार. मुलींना मोफत पास. सवलतीच्या दरात प्रवास.
महाराष्ट्र सरकार आणि एस.टी. महामंडळ (MSRTC) यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचे नाव आहे “ST Pass Direct to Your School”, ज्याअंतर्गत आता विद्यार्थ्यांना बस पास मिळवण्यासाठी एस.टी. आगारात रांगेत उभे राहण्याची गरज नाही!
✅ योजनेचे वैशिष्ट्ये—-
विद्यार्थ्यांना 66.66% सवलतीत बस पास मिळणार. म्हणजेच फक्त 33.33% भाडं द्यावं लागेल.
✅1 वी ते 12 वीच्या सर्व मुलींना ‘पूर्णतः मोफत’ बस पास दिला जाईल. ही सुविधा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना अंतर्गत दिली जाईल.
✅स्थानिक शाळांमध्येच MSRTC अधिकारी जाऊन बस पास वाटप करतील, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार.
✅विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, शिक्षणात अडथळे दूर करणे हे मुख्य उद्दिष्ट.
🏫 कशी होईल अंमलबजावणी?—–
👉शाळा/कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांची यादी MSRTC ला द्यायची आहे.
👉त्यानंतर बस पास वितरणासाठी अधिकृत कर्मचारी शाळेत येतील.
👉पालक व विद्यार्थ्यांना वेगळ्या ठिकाणी जाऊन वेळ खर्च करावा लागणार नाही.
🎯 शासनाची भावना—
महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे की, शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे आणि परिवहन हे शिक्षणाचा एक मूलभूत भाग आहे. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना वरदान ठरेल.
📢 शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!—–
शालेय शिक्षणाच्या सुलभतेसाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली आहे. या योजनेमुळे शिरूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.
🔗 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
स्थानिक एस.टी. आगार अधिकारी / शाळा प्रशासन / msrtc.maharashtra.gov.in
🔍
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा खालील लिंकवर क्लिक करून —-
Shirur To Pune: शिरूर ते पुणे- महत्वाची व उपयुक्त आकडेवारी !