
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
‘शिरुर’ च्या बँक ऑफ इंडिया शाखेत पैसे मोजुन देतो असे म्हणुन 19000 रुपये लांबवले ! तर बाबुरावनगर जवळ पोलिसांना अक्टिवा गाडीत कोयता सापडला !
‘शिरुर’ तालुक्यातील उरळगाव येथे शेतीवरुन वाद व मारहाण ?
शिरुर,दिनांक 7 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
‘शिरुर’ च्या बँक ऑफ इंडिया शाखेत पैसे मोजुन देतो असे म्हणुन एका अज्ञात चोरावे 19000 रुपये लांबवले आहेत.पिडीत वृद्ध व्यक्ती आहे. तर बाबुरावनगर जवळ पोलिसांना अक्टिवा गाडीत कोयता सापडला आहे.शिरुर तालुक्यातील उरळगाव येथे शेतीवरुन वाद व मारहाण केली असल्याचीही घटना शिरुर पोलिस स्टेशनला नोंदवली गेली आहे. शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.
‘शिरुर’ च्या बँक ऑफ इंडिया शाखेत वृद्धास लुबाडले !
‘शिरुर’ पोलिस ठाण्यात नोंद केल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 05/08/2024 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी फिर्यादी अभिमन्यु शंकरराव कांबळे, वय- 69 वर्षे, व्यवसाय- सुखवस्तु,राहणार- आंबळे, तालुका, शिरूर, जिल्हा- पुणे यांनी न्हावरा, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत बँक ऑफ इंडीया या बँकेमधुन 50,000/- रूपये काढुन बँकेमध्ये असलेल्या बॅंचवर मोजत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या शेजारी येवुन बसला. या पैशामध्ये नकली नोटा आहेत का?हे तो चेक करून देतो असे म्हणुन फिर्यादी- अभिमन्यु शंकरराव कांबळे कडील 50,000/- रूपये घेवुन त्यामध्यील हातचलाकीने 19,000/- काढुन घेवुन अभिमन्यु शंकरराव कांबळे
यांची फसवणुक केली आहे.म्हणुन या अज्ञान व्यक्तीवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘शिरुर’ मधील या घटनेतील अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. 675/2024 हा तर भारतीय न्याय सं 318,316(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार श्री. थेऊरकर हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. गवळी हे करत आहेत. प्रभारी अधिकारी श्री. जोतीराम गुंजवटे,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
2.शिरुर तालुक्मयातील उरळगाव मधील घटना …
शिरुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 06/08/2024 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास उरळगाव (गिरमकर बस्ती), तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे येथे
1) गणेश चांगदेव गिरमकर
2) चांगदेव सोपान गिरमकर
3) अंजनाबाई चांगदेव ग्रम
अशा सर्वजनांनी फिर्यादी नितीन गोरख गिरमकर ,वय -33 वर्ष, व्यवसाय -शेती, राहणार – गिरमकर वस्ती, उरळगाव, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे, यांच्याआई वडीलांना शिवीगाळ केली. वडिलांना खाली ढकलून दिले. म्हणून फिर्यादी व त्यांचे भाऊ संजय असे त्यांना तुम्ही आमच्या आई वडिलांना शिवीगाळ का करता ? असे विचारले त्यावेळी चुलते चांगदेव यांनी फिर्यादी नितीन यांना,’ तुम्ही तुमच्या विहीरीत बोर लावल्यामुळे विहरीतील दगडे आमच्या रानात पडले होते. ते दगडे तुम्ही का उचलले नाहीत? व काल दिनांक 05/08/2024 रोजी दुपारी आमचे रानातून ट्रक्टर का घातला ?’ असे नितीन यांनी विचारले. तेव्हा त्यांना ‘आपला शेजार धर्म आहे, आपल्याला एकमेकांच्या रानातून जायला लागते’ असे फिर्यादी नितीन यांनी सांगितले. त्यावेळी त्यांना राग आला. गणेश चांगदेव गिरमकर याने फिर्यादी नितीनच्या मांडीवर लाथ मारून त्यांना पकडले. त्याच्या वडिलांनी ऊसाने फिर्यादी नितीन यांच्या पाठीत मारहाण केली. गणेश चांगदेव गिरमकर यांनी त्यांचे राहणार, बुर्केगाव, तालुका- हवेली ,जिल्हा- पुणे तथील
पाहुणे आले भांडणात…..
पाहुणे
(1) नवनाथ राघु गायकवाड,
2) अभिषेक नवनाथ गायकवाड
3) सिमा राजाराम गायकवाड़
4) स्वप्नाली नवनाथ गायकवाड
असे बोलेरो गाडीतून सायंकाळी 5:00 वाजण्याच्या सुमारास उरळगाव फाट्यावर बोलावून घेतले. चांगदेव त्यांचा मुलगा गणेश यांच्या बरोबर झालेल्या भांडण्याच्या कारणावरून नवनाथ गायकवाड याने फिर्यादी नितीनच्या अवघड जागी लाथ मारली. ते खाली पडले. तेव्हा अभिषेक गायकवाड याने बांबूच्या काठीने फिर्यादी नितीन चा भाऊ संजय याला उजव्या हातावर मारहाण केली. त्यावेळी सिमा गायकवाड व स्वप्राली गायकवाड यांनी देखील लाथाबुक्यांनी मौरहाण केली. म्हणुन फिर्यादी नितीन यांनी
1) गणेश चांगदेव गिरकर
2) चांगदेव सोपान गिरकर
3) अंजनाबाई चांगदेव गिरमकर
4) नवनाथ राघु गायकवाड,
5) अभिषेक नवनाथ गायकवाड
6) सिमा राजाराम गायकवाड़
7) स्वप्राली नवनाथ गायकवाड.
अनुक्रमांक क्र 1 ते 3 राहणार- उरळगाव (गिरमकर वस्ती) ,तालुका- शिरूर,जिल्हि-पुणे व अनुक्रमांक क्र 4 ते 7 राहणार, बुर्केगाव, तालुका- हवेली ,जिल्हा -पुणे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.शिरुर पोलीस स्टेशनला आरोपींविरोधात गुन्हा रजि नंबर तर शिरूर पोलिस स्टेशन गु.र. नं. 678/2024 तर भारतीय न्याय संहिता कलम189(2),191(1),191(3),190,118(1),115(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस इनस्पेक्टर चव्हाण हे करत आहेत.
दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री. गवळी हे आहेत.
प्रभारी अधिकारी,श्री.जोतीराम गुंजवटे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
—–
शिरुर मधील बाबुरावनगर येथे बेकायदा हत्यार वाहन चालकाकडे? —-
शिरुर पोलिस ठाण्यात नोंद केल्यानुसार
हकीकत अशी की दिनांक 6/08/2024 रोजी 15:10 वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत बाबुरावनगर, टाटा चैकात पेट्रोलींग दरम्यान वाहनांची तपासणी करीत असताना पांढर्या रंगाची अॅक्टीवा गाडी नं. एम एच 12 व्ही.पी. 6315 ची तपासणी केली.त्यावेळी असताना फिर्यादी पोलिस रघुनाथ भीमराव हाळनोर, नेमणूक- शिरूर पोलिस स्टेशन यांनी गाडी वरील चालक (अल्पवयीन) राहणार – कैकाडी आळी, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे याने त्याच्या ताब्यातील सॅकमध्ये बेकायदेशीर रित्या कोयता बाळगलेला असताना सापडला आहे.
जप्त करण्यात आलेला माल पुढील प्रमाणे आहे.
1) 200/- किंमतीचा एक लोखंडी कोयता गोलाकार लाकडी मुठ असलेला त्याची लांबी 12 से.मी. लोखंडी पाते 25 से.मी. लांब असलेला 5 से.मी. रूदींचे लोखंडी पाते असुन लोखंडी पाते एक बाजुला धारधार टोकाला निमुळते आहे. जुवा की अं
2) 20,000/- एक पांढरे रंगाची अॅक्टीवा गाडी नं. एम एच 12 व्ही.पी. 6315 असा असलेली जु वा की अं 20,200/-
शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं. 677/2024 तर आहे.तर भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 नुसार अमोल काळुराम गायकवाड याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हणुन त्याच्या विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलिस नाईक श्री. जगताप हे करत आहेत.
दाखल अंमलदार पोलिस नाईक श्री.गवळी हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री.जोतीराम गुंजवटे , पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
1 thought on “‘शिरुर’ च्या बँक ऑफ इंडिया शाखेत पैसे मोजुन देतो असे म्हणुन 19000 रुपये लांबवले ! तर बाबुरावनगर जवळ पोलिसांना अक्टिवा गाडीत कोयता सापडला !”