
Contents
घरफोडी : शिरूर तालुक्यातील मलठण येथे बंद घर फोडून 37,500 रुपयांचा माल चोरीला
शिरुर तालुक्यात घरफोडी !
दिनांक 2 जुलै २०२५ | प्रतिनिधी |
घरफोडी : शिरूर तालुक्यातील मलठण येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ₹37,500 चा माल लंपास केला. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू.

📌 गुन्हा दाखल : शिरूर पोलीस स्टेशन, गु. र. नं. 464/2025
📅 घटना कालावधी : 30/06/2025 दुपारी 3:30 ते 01/07/2025 सकाळी 8:30 दरम्यान
📍 ठिकाण : मौजे मलठण, ता. शिरूर, निमगाव दुडे-शिंदेवाडी रोडलगत, गट नं. 1186/1
🧾 घटना तपशील —-
शिरूर तालुक्यातील मलठण येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ₹37,500/- किमतीचा घरगुती माल चोरी केला. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.
फिर्यादी—–
सौ. स्मिता शाम गलांडे (वय 46 वर्षे), व्यवसाय – गृहिणी, रा. विन्स एन्क्लेव्ह, तुळजाभवानी नगर, खराडी, पुणे.
चोरीस गेलेला माल—–
1. ₹5000 किमतीची स्टीलची भांडी, पिजन कंपनीची गॅस शेगडी आणि HP कंपनीचा गॅस सिलिंडर
2. ₹30,000 किमतीचा किंग साईज लाकडी बेड, गादी, उशी, चादरी, चटया, इलेक्ट्रिक वायर, स्विचेस, खिडक्यांचे पडदे
3. ₹500 हिटर कॉईल
4. ₹1000 एलईडी आरसा
5. ₹1000 दोन एलईडी मरकरी लाईट
👮♂️ पोलिस तपास—–
या प्रकरणी पो. हे. खेडकर यांनी गुन्हा दाखल केला असून पो. हे. वारे तपास अधिकारी म्हणून नेमले गेले आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे कार्यरत आहेत.
फिर्यादी स्मिता गलांडे यांनी सांगितले की, त्यांचे मलठण येथील घर काही काळ बंद होते. चोरट्यांनी त्या संधीचा फायदा घेत कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि वरीलप्रमाणे सामान चोरून नेले.
📣 नागरिकांसाठी आवाहन—–
शिरूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या आजूबाजूला संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🔗
महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
पोलीस भरती व नागरिक सुविधा माहिती
गुन्हा नोंदणी ऑनलाइन FIR माहिती
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून •••
Shirur Crime News: शिरुरमधील कोल्ड स्टोरेजमध्ये मोठी चोरी : तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल