
Contents
- 1 Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल !
Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल !
Shirur Taluka Ranjangaon Sandas News 19 April 2025 🙁Satyashodhak News Report )
Shirur Taluka Ranjangaon Sandas News:रांजणगाव सांडस येथे शेतातून जात असताना रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून रणदिवे कुटुंबावर पाच जणांनी एकत्र येऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 258/2025 अन्वये BNS कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत!
“हा रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का?”—
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी प्रशांत सुरेश रणदिवे (वय- 34 वर्षे , व्यवसाय – शेती हे वडील सुरेश रणदिवे यांच्यासह १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गट नंबर 105/1 मधून मोटारसायकलवरून जात असताना आरोपी दशरथ गुलाबराव शितोळे, तानाजी बाळासो शितोळे, संभाजी दशरथ शितोळे, नंदकुमार बाळासो शितोळे आणि बाळासो गुलाबराव शितोळे या पाच जणांनी त्यांना अडवून “हा रस्ता काय तुमच्या बापाचा आहे का?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
Read more >>
पोटावर आणि पाठीवर मारहाण—
संभाजी शितोळे याने लाकडी काठीने प्रशांत रणदिवे यांना गुडघ्यावर, नाकावर आणि छातीवर मारहाण केली. तसेच वडील सुरेश रणदिवे यांना पोटावर आणि पाठीवर मारहाण करण्यात आली.यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेली प्रशांत यांची आई सुमन रणदिवे आणि चुलते मधुकर रणदिवे यांनाही मारहाण करण्यात आली. सुमन रणदिवे यांच्या हातावर तर मधुकर रणदिवे यांच्या पोटावर व छातीवर लाकडी काठीने हल्ला करण्यात आला.
Read more >>
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपींविरुद्ध तक्रार–
या घटनेनंतर प्रशांत रणदिवे यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये वरील पाचही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. गुन्हा BNS 189(2), 191(2), 190, 118(2), 115(2), 352, 351(2)(3) या कलमांनुसार दाखल करण्यात आला असून याप्रकरणाचा पुढील तपास सा.फो. बनकर हे करत आहेत.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …