
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
- 1 Shirur Taluka Crime News:मोराची चिंचोली येथे एका कुटुंबाने रस्त्याचे काम अडवले ! आत्महत्या करण्याची दिली धमकी !
- 1.1 Shirur Taluka Crime News: शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल!
- 1.2 Shirur Taluka Crime News:सविस्तर हकिकत —-
- 1.3 जे. सी. बी समोर आडवे उभे राहिले–
- 1.4
- 1.5 खास भेट:
- 1.6 शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
Shirur Taluka Crime News:मोराची चिंचोली येथे एका कुटुंबाने रस्त्याचे काम अडवले ! आत्महत्या करण्याची दिली धमकी !
Shirur Taluka Crime News: शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल!
Shirur Taluka Crime News 27 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime News:मोराची चिंचोली येथे एका कुटुंबाने रस्त्याचे काम अडवले!तसेच कुटुंबासह आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शिरुर पोलिस स्टेशन मधे या कुटुंबावर दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Shirur Taluka Crime News:सविस्तर हकिकत —-
या घटनेची सविस्तर हकीकत अशी आहे. दिनांक 25 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी माधुरी वसंत बागले, वय -44 वर्षे, धंदा- कर्मचारी,राहणार – 157 ,गणेश पेठ, 411002 ,पुणे आणि ग्राममहसुल अधिकारी अनुजा घुगे, ग्राममहसुल सेवक प्रिती नानेकर, ग्राममहसुल अधिकारी रामदास आरदवाड असे स्टाफसह गेले.
Read more >>
शिरूर : हिट-अँड-रन प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा; आरोपी चालक जळगाव येथून ताब्यात
जे. सी. बी समोर आडवे उभे राहिले–
तेव्हा तेथे पार्वतीबाई बबन उकिर्डे व त्यांची दोन्ही मुले व दोन्ही सुना (नावे माहीत नाहीत) हे तेथे आले. जे. सी. बी समोर आडवे उभे राहिले. तसेच जे. सी. बी च्या बकेट मध्ये बसले. येथुन ‘रस्ता खुला करायचा नाही’, असे बोलुन ‘जर तुम्ही रस्ता खुला केला तर आम्ही सर्वजण अंगावर पेट्रोल ओतुन घेवुन आत्महत्या करू’ असे बोलले.
म्हणुन त्यांनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे. म्हणुन फिर्यादींनी त्यांच्या विरुध्द सरक रतर्फे कायदेशीर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे केली आहे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८
फिर्यादी –
माधुरी वसंत बागले, वय -44 वर्षे, धंदा-शासकिय कर्मचारी, राहणार – 157, गणेश पेठ, 411002 ,पुणे
आरोपी –
पार्वतीबाई बबन उकिर्डे व त्यांची दोन्ही मुले व दोन्ही सुना (नावे माहीत नाही)
Read more >>
Danewadi Mauli Gavhane Murder Case: सागर गव्हाणे व शुभम मांडगे होते समलैंगिक?
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
शिरूर पोलीस स्टेशन मधे
गुन्हा रजिस्टर नंबर – 209/2025 असा आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 221,189(2,190) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. टेंगले हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. वारे आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात येत आहे.
Read more >>