
Contents
- 1 Shirur Taluka News: मेंढपाळाचा बकरी धुताना तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु!
- 1.1 Shirur Taluka News:शिरुर तालुक्यातील आंधळगाव येथील घटना !
- 1.2 सविस्तर घटना अशी—-
- 1.3 त्याला पोहता येत नव्हते—
- 1.4 आंधळगाव येथील वडाच्या तळ्यामध्ये बुडाला —
- 1.5 तळ्याच्या कडेला बकरी धुत होते—
- 1.6 काही एक हालचाल होत नव्हती—
- 1.7
- 1.8 खास भेट:
- 1.9 पोहता येत नसल्याने मृत्यु —
- 1.10 शिरूर पोलीस स्टेशन मधे नोंद —
Shirur Taluka News: मेंढपाळाचा बकरी धुताना तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु!
Shirur Taluka News:शिरुर तालुक्यातील आंधळगाव येथील घटना !
Shirur Taluka News 31 March 2025 :
( Satyashodhak News Report)
Shirur Taluka News: मेंढपाळाचा बकरी धुताना तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु झाला आहे. शिरुर तालुक्यातील आंधळगाव येथील ही घटना आहे.शिरुर पोलीस पुढील तपास करत आहेत.मृताचे नाव साहेबराव चांगदेव पांढरे असे आहे.
सविस्तर घटना अशी—-

मांडवगण फराटा दुरक्षेत्र येथे समक्ष हजर खबर देणार दादा सखाराम पांढरे ,वय- 33 वर्षे, व्यवसाय -शेती ,राहणार- आंधळगाव, तालुका- शिरुर, जिल्हा- पुणे यांनी जबाब दिला आहे.
त्याला पोहता येत नव्हते—
त्यानुसार ते वरील ठिकाणी राहणारा आहेत. शेती करुन कुटुंबाची उपजिवीका भागवितात. त्यांचा चुलत भाऊ साहेबराव चांगदेव पांढरे, वय -33 वर्षे, राहणार- आंधळगाव ,तालुका -. शिरुर, जिल्हा- पुणे हा त्यांच्या शेजारीच राहण्यास आहे. तो मेंढपाळ व्यवसाय करत करतो. त्याला पोहता येत नव्हते.
आंधळगाव येथील वडाच्या तळ्यामध्ये बुडाला —
दिनांक 30 मार्च 2025 रोजी दुपारी 2:00 वाजण्याच्या सुमारास ते भाऊ आण्णा सखाराम पांढरे, चुलत भाऊ साहेबराव चांगदेव पांढरे असे ते आंधळगाव येथील वडाच्या तळ्यामध्ये बकरी धुण्यासाठी गेलो होते.
तळ्याच्या कडेला बकरी धुत होते—
ते तळ्याच्या कडेला बकरी धुत होते.त्यांचा चुलत भाऊ साहेबराव हा त्याची बकरी धुत होता. अचानक तळ्यामध्ये तो बुडाला. तो तळ्यात बुडाल्याने त्याचा बुड्या घेवुन शोध घेतला गेला.पण तो सापडला नाही.
काही एक हालचाल होत नव्हती—
त्यानंतर त्यांनी सतीष आबा ठोंबरे यांना फोन करून बोलावुन घेतले. त्यानंतर सतिष याने तळ्यात बुडी घेवुन साहेबराव यास तळ्यातुन बाहेर काढले. तेव्हा त्याची काही एक हालचाल होत नव्हती.
त्यानंतर त्यांनी त्याला चारचाकी गाडीमध्ये टाकुन ग्रामीण रुग्णालय, न्हावरा येथे घेवुन गेले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन तो उपचारापुर्वी मयत झाले असल्याचे सांगितले.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
पोहता येत नसल्याने मृत्यु —
दिनांक 30 मार्च 2025 रोजी दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास आंधळगाव, तालुका- शिरुर,जिल्हा- पुणे या गावच्या हद्दीत वड्याच्या तळ्यामध्ये चुतल भाऊ साहेबराव चांगदेव पांढरे, वय -33 वर्षे, राहणार- आंधळगाव,तालुका- शिरुर,जिल्हा- पुणे हा बकरी धुत असताना त्याला पोहता येत नसल्याने तो तळ्यामध्ये पाण्यात बुडून मयत झाला आहे. त्याचे मरणाबाबत त्यांची कोणाविरुद्ध काहीएक तक्रार अथवा संशय नाही.
शिरूर पोलीस स्टेशन मधे नोंद —
शिरूर पोलीस स्टेशन मधे रजिस्टर नंबर- 34/2025 असा नोंद झाला आहे.तर बी एन एस एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री.बनकर हे आहेत.पुढील तपास पोलीस हवालदार श्री. खबाले हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.