
रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन, कारेगाव.
Shirur Taluka News: सनसनाटी घटना ; 5 कोटी कर्ज मिळवुन देण्यासाठी 48 लाख कमिशन दिले पण आत्महत्या करावी लागली !वाचा सविस्तर. ..
Shirur Taluka News:कमिशन खावुन कर्ज मिळवुन दिले नाही ! शेवटी केली आत्महत्या !
Shirur Taluka News 4 April 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka News: सनसनाटी घटना ; 5 कोटी कर्ज मिळवुन देण्यासाठी 48 लाख कमिशन दिले पण एका इसमाला शेवटी आत्महत्या करावी लागली ! दलालांनी कमिशन खावुन कर्ज मिळवुन दिले नाही ! शेवटी आत्महत्येला कारणीमभुत ठरले आहेत.रांजणगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे व पुढील तपास करत आहेत.
सविस्तर बातमी अशी आहे—-
दिनांक 29 मार्च 2025 रोजी 10:30 वाजण्याच्या सुमारास 30मार्च 2025 रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत, लांडेवस्ती, जमिनगट नंबर 1352 मधील जे एम एन इंजिनिअरींग प्रा.ली कंपनीच्या खोलीत, तालुका,शिरूर, जिल्हा- पुणे येथे फिर्यादी
फिर्यादी-
श्रीमती जनाबाई संग्राम सातव, वय-42 वर्षे, व्यवसाय-गृहीणी, राहणार, शेळके वस्ती, मराठीशाळे पाठीमागे, रांजणगाव गणपती, तालुका- शिरूर, जिल्हा-पुणे यांचे
पती संग्राम आबुराव सातव, वय-46 वर्ष , राहणार, राहणार- शेळकेवस्ती, मराठीशाळे पाठीमागे, रांजणगाव गणपती, तालुका- शिरूर, जिल्हा,पुणे यांना इंजिनिअरींग प्रा.ली. कंपनी वाढविण्या करीता
1) इंडोस्टार हाऊसिंग फायनान्स, शाखा खराडी, पुणे चे मॅनेजर उपेंद्र यांनी पाच कोटी रूपये कर्ज मिळवुन देण्याचे बदल्यात 40 लाख रुपये कमीशन, तसेच
2) विशाल घाटगे याने 50 लाख रूपये कर्ज मिळवुन देण्याचे बदल्यात पाच लाख रूपये कमिशन व
3) झंजाड नावाच्या व्यक्तीने पण कर्ज करून देण्याचे बदल्यात तीन लाख रूपये कमीशनची मागणी केली.
रहात्या घरावर कर्ज काढले!पण…
त्या प्रमाणे फिर्यादीचे पती यांनी रहात्या घरावर कर्ज काढले. तसेच लोकांकडुन उसने पेसे घेतले. त्या सर्वांना ठरल्या प्रमाणे कमीशन दिले आहे.परंतु त्यांनी अदयाप पर्यंत ठरल्या प्रमाणे कर्ज मंजुर केलेले नाही. त्यावरुन त्यांनी फिर्यादीची फसवणुक केली असल्याचे दिसुन आले.
मानसिक त्रास देवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले—
म्हणुन त्यांचे पती संग्राम सातव यांनी त्यांना त्या बाबत फोन केला.तेव्हा ते तिनही लोक त्यांचा फोन न घेता, न भेटता फिर्यादीच्या पतीला मानसिक त्रास देवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.फिर्यादीचे पती संग्राम आबुराव सातव यांनी आत्महत्या केली आहे. म्हणुन फिर्यादीने वरील तिनही इसमां विरूध्द कायदेशीर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे.
गुन्हा दाखल —
रांजणगाव पोलिस स्टेशन मधे आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 108 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री.नागरगोजे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. तिडके हे करत आहेत. प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
एका आरोपी अटकेत —-
यातील आरोपी उपेंद्र यशवंत पाटील, राहणार- थेरगाव पुणे व आरोपी मच्छिंद्र पोपट झंजाड, राहणार -सांगवी सूर्या, तालुका -पारनेर, जिल्हा- अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली आहे. व 5/4/2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.