
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर.
Contents
- 1 शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ !
शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ !
शिरुर पोलिसांसमोर अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान !
शिरूर,दिनांक 8 डिसेंबर: (प्रकाश करडे यांच्याकडुन)
शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ असण्याचा योग घडला आहे. मात्र शिरुर पोलिसांसमोर अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान असतेच नेहमी ! पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटना: 1 इनोव्हाची मोटर सायकल ला धडक !

शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केल्याप्रमाणे हकीकत अशी की दिनांक १७/११/२०२४ रोजी दुपारी ४:०० वाजण्याच्या सुमारास बोराडे मळा, गणेश मंदिरा समोर, शिरूर,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हदि्दत पुणे नगर हायवे पुणे बाजुकडुन नगर बाजुकडे फिर्यादी रिंकू माणिकचंद राठोड, वय- 45 वर्ष, व्यवसाय -पेंटर, राहणार- यशवंत कॉलनी, पाण्याची टाकी,शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे हे व त्यांचे मित्र रोहीदास नानाभाउ फरगडे, वय -३८ वर्ष,असे त्यांच्या मोटार सायकल होंडा शाईन तिचा नंबर -एम.एच. १२ पी.एम. ९८७३ वरून जात असताना त्यांच्या पाठीमागुन भरधाव वेगाने एक पांढर्या रंगाची ईन्व्हा तिचा नं. एम.एच.१२ टी.एच.७१८६ हीने त्यांच्या मोटारसायकलीस जोरात धडक दिली. त्यामुळे मोटार सायकलचे नुकसान करून झाले. फिर्यादी व त्यांचा मित्र रोहीदास नानाभाउ फरगडे वय- ३८ वर्ष यांना किरकोळ व गंभीर दुखापत झाली.त्यांना कोणतीही मदत न करता अज्ञात चालक निघुन गेला. म्हणुन फिर्यादी ईन्व्हा तिचा नं.एम.एच.१२ टी. एच.७१८६ हिच्यावरील अज्ञात चालकाविरूध्द शिरुर पोलीस स्टेशनला कायदेशिर तक्रार दाखल केली आहे.
शिरुर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरूध्द 981/2024 ,BNS -281,125(a),125(b),324(4).MV ACT 184 प्रमाणे कायदेशीर गुन्हा
दाखल करण्यात आला आला आहे.’शिरुर‘
अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी हे आहेत.
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.भगत हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंदळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
घटना : 2 परप्रांतीयाची अक्टिवा गाडी चोरीला !

शिरुर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक २३/११/२०२४ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या ते ६:४० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी नीरज कुमार सरोज वैद्य, व्यवसाय -कापड विक्री, राहणार- सरद वाडी, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे, राहणार- रामदुलारे सरोज,डेरावा, कटरामपुरा, नवाबगंज ,इलाहाबाद ,उत्तर प्रदेश
हे शिरूर,तालुका-शिरूर, जि.पुणे ,गावच्या हदि्दत मुथा पेट्रोल पंपाच्या समोर असणार्या रोड लगत त्यांचा मित्र मन्नान यासिन खान, राहणार-भाजी बजार, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे यांच्या नावावर असणारी सिल्वर रंगाची अॅक्टीवा गाडी न.एम.एच १२ ई.ई.५२९४ ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेली आहे. म्हणुन त्यांनी गाडी चोरून नेणार्या अज्ञात चोरटयाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशनला कायदेशिर तक्रा दाखल केली आहे.
गेलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.
माल –
१) ३०,०००/- रू किमतीचे सिल्वर रंगाची अॅक्टीवा गाडी तिचा आर.टी.ओ.नं.एम.एच १२ ई.ई.५२९४ तिचा चॅसी नं.एमई ४जेएफ०८३के८८५१९४६९, इंजिन नं. जेएफ ०८ई५५५०९१३ असा असलेली जु.वा.कि.अ.अशाप्रकारे.
अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशनला
गु.र.न.982/2024 असा आहे. तर BNS 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री.गवळी हे आहेत.पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. टेंगले हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंदळे, पोलीस निरीक्षक, शिरुर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटना -3 इलेक्ट्रिक मोटार चोरीला !

शिरुर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत अशी की दिनांक 5/12/2024 ते 6/12/2024 रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान (वेळ नक्की माहीत नाही), न्हावरे, तालुका-शिरुर, जिल्हा- पुणे गावच्या हद्दीत शेत गट नं 520 मधील विहरीमध्ये टाकलेली ULTIMA U- 7 कंपनीची 3 एच.पी. ची इलेट्रीक पाणबुडी मोटार कि.अ.12000/- रु किमतीची कोणीतरी अज्ञात इसमाने स्वताच्या चोरुन नेली आहे.
म्हणुन फिर्यादी जालिंदर विठ्ठल भुजबळ, वय- 37 वर्ष, व्यवसाय -शेती, राहणार- गणेश नगर,नाव्हरा, तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे मोबाईल यांनी अज्ञात इसमाविरुद्द शिरुर पोलीस स्टेशनला कायदेशिर तक्रार दाखल केली आहे.
गेलेला माल पुढील प्रमाणे-
1) 12,000/- अल्टिमा यु सात कंपनीची तीन एचपी इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर जु. वा.की. अ.असा आहे.
अज्ञात चालकाविरूध्द शिरुर पोलीस स्टेशनला
गु.र.न 980/2024 असा आहे. तर Bns 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. गवळी हे आहेत. पुढील तपास अंमलदार सहायक सब इन्पेक्टर श्री.बनकर आहेत. प्रभारी अधिकारी श्री.संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरुर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एकंदरीत चोरीच्या घटना व बेदरकारपणे वाहन चालकांच्या वागण्याने नागरिकांना मात्र त्रास व नुकसान होत आहे. शिरुर पोलीसांनी अशा घटनांना आळा घालण्याची गरज आहे. अशी नागरिकांची अपेक्षा आहे हे नक्की!