
Contents
- 1 Shirur Police Appeal: शिरुर पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?
Shirur Police Appeal: शिरुर पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?
Shirur Police Appeal To Citizens
दिनांक 18 जुन 2025 | प्रतिनिधी |
” Shirur Police Appeal: शिरूर पोलिसांनी शाळेच्या वेळेत निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करत पालकांना वाहने योग्य ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन केले आहे. नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे.”
Shirur Police Appeal: शिरूर शहरात शालेय वेळांमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिरूर पोलिसांकडून पालकांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला, विद्याधाम चौक, निर्माण प्लाझा आणि सीटी बोरा कॉलेज रोड या परिसरात शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर वाहतूक गती खोळंबते आहे.
दुचाकी वाहने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केल्या जातात—-
या भागामध्ये बऱ्याच पालकांकडून त्यांच्या ताब्यातील दुचाकी वाहने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केली जात आहेत. तसेच काही पालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे एस.टी. स्टँडकडे आणि बाबुराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गंभीर वाहतूक कोंडी होत आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे आवाहन —-

यावर उपाय म्हणून शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नागरिकांना ‘Shirur Police Appeal’ द्वारे आवाहन केले आहे, की सर्व पालकांनी आपल्या वाहनांची योग्य आणि ठरवलेल्या जागेतच पार्किंग करावी. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
शाळा प्रशासनाची जबाबदारीही वाढली—
या विषयावर अधिक कारवाई करण्यासाठी विद्याधाम प्रशालेच्या प्राचार्यांशी चर्चा करण्यात आली आहे. पालकांसाठी अधिकृत पार्किंग जागा उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांची शाळा थोड्या-थोड्या अंतराने सुटावी अशी विनंती शाळा प्रशासनाला करण्यात आली आहे. यामुळे शाळा सुटण्याच्या वेळी होणारी गर्दी टाळता येईल, आणि वाहनांची गती सुरळीत राहील.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढते आणि त्यामुळे एकही अपघात होऊ नये यासाठी अधिक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पालकांशी थेट संवाद—
वाहतूक पोलिसांनी या संदर्भात पालकांशी थेट संवाद साधून त्यांना नियमांचे पालन करण्याबाबत सजग केले आहे. काही पालकांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांच्या सहकार्यामुळे शिरूर शहरातील शाळा वेळेतील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुकर होईल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक नियम पाळा, सुरक्षित रहा—

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंगसाठी ठरवलेल्या जागा आहेत. त्या जागांव्यतिरिक्त कुठेही वाहन उभे करणे हे नियमबाह्य आहे. यामुळे केवळ वाहतूकच अडत नाही तर इतर वाहनचालकांनाही अडथळा निर्माण होतो. पालकांनी वाहतुकीबाबत जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे.
निष्कर्ष —
शिरूर पोलीस दलाने या Shirur Police Appeal अंतर्गत पालकांसोबत स्थानिक शाळा प्रशासन, वाहन चालक आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत संयुक्तरित्या काम करून शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेचा एक आदर्श घालून द्यावा, हीच अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी भेट ज्या खालील संकेतस्थांळांना—
🌐
Maharashtra Police Traffic Rules
Google Maps – Vidyadham Chowk, Shirur
RTO Maharashtra Traffic Guidelines
तुमच्याकडे यासंदर्भात प्रतिक्रिया, सूचना किंवा शंका असल्यास शिरूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सत्यशोधक न्यूज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून —
Shirur Nagar Palika : एक झपाट्याने वाढणारे नगर ! माहितीपूर्ण लेख |
Title: Shirur Tourism 2025 : शिरुर पर्यटकासाठी गाईड!
1 thought on “Shirur Police Appeal: शिरुर पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?”