
Contents
- 1 प्लास्टीक बंदी चा नियम धाब्यावर बसवला होता ? शिरुर नगरपालिकेने मग काय आणि कुणावर कारवाई केली ? वाचा सविस्तर. …
- 1.1 प्लास्टीक बंदी चा नियम आता शिरुरकरांना पाळावा लागेल ! नाहीतर…
- 1.1.1 शिरुर ,दिनांक 30 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 प्लास्टीक बंदी बाबत नगरपालिकेची कारवाई —
- 1.1.3 प्लास्टीक बंदी चा नियम मोडणार्यांकडुन 75,000 रुपयांचा दंड वसूल !
- 1.1.4 प्लास्टीक बंदी बाबत कारवाईत नगरपालिका कर्मचारी सहभागी !
- 1.1.5 शिरुर पोलीसांचा सहभाग !
- 1.1.6 कायदा जणु न पाळण्यासाठी असतो !
- 1.1.7 जगात काय चालले आहे?
- 1.1.8 तरुणाई फिदा रिल्सवर !
- 1.1.9 About The Author
- 1.1 प्लास्टीक बंदी चा नियम आता शिरुरकरांना पाळावा लागेल ! नाहीतर…
प्लास्टीक बंदी चा नियम धाब्यावर बसवला होता ? शिरुर नगरपालिकेने मग काय आणि कुणावर कारवाई केली ? वाचा सविस्तर. …
प्लास्टीक बंदी चा नियम आता शिरुरकरांना पाळावा लागेल ! नाहीतर…
शिरुर ,दिनांक 30 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
प्लास्टीक बंदी चा नियम धाब्यावर बसवला जात होता शिरुर मधे ! मात्र आता नगरपालिकेने यावर काय आणि कुणाकुणावर कारवाई केली ते वाचा सविस्तर या बातमीत ! त्यामुळे प्लास्टीक बंदी चा नियम आता शिरुरकरांना पाळावा लागेल हे नक्की ! नाहीतर दंड वसूल करण्यात येणार आहे. तशी कारवाई आज शिरुर नगरपालिकेने करत कायद्याचा बडगा कायदा धाब्यावर बसवणार्या नागरिकांना दाखवला आहे. तब्बल 75 हजार रुपयांचा दंड शिरुर नगरपालिकेने आज वसुल केला आहे.
Read more >>
‘अ अदानी ‘चा ही सरकारची नवी बाराखडी!: आप ची टीका !
प्लास्टीक बंदी बाबत नगरपालिकेची कारवाई —

शिरूर नगरपरिषदेने आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी शहरात प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई केली आहे.
प्लास्टीक बंदी च्या बाबतीत शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. प्रितम पाटील व पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांनी या कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३०/०१/२०२५ रोजी शिरूर नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
Read more >>
1 जुलै 2022 मध्ये भारत सरकार ने सिंगल युज प्लास्टीक बंदी कायदा आमलात आणला.एक वेळेस वापर करून आपण जी प्लास्टीक ची वस्तु,बग,इ.सामान वापरतो.त्याच्या वापरावर बंदी घातली. उदाहरणार्थ प्लॅस्टिक च्या बगमधुन आपण चिकन आणतो.पण त्यासाठी ते प्लास्टीक घातक आहे. त्याचा काही अंश त्या चिकन मधे जातो.नंतर आपल्या शरिरात जातो.शरिराला हे हानीकारक असते.ते प्लास्टीक पचवणे हे मानवी आतड्यास अपायकारक असते.अशा प्लस्टिकच्या अनेक वस्तु गाई,शेळ्या वगैरे प्राण्यांच्या पोटात गोळा होवुन राहतात.पर्यायाने तो प्राणी जीवास मुकतो.वगैरे अनेक हानिकारक परिणाम प्लॅस्टिक चे असतात.
प्लास्टीक बंदी चा नियम मोडणार्यांकडुन 75,000 रुपयांचा दंड वसूल !
यामध्ये सदर ठिकाणी जाऊन दुकानांची तपासणी करण्यात आली. १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीचे प्लास्टीक आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यात एकूण ७५,०००/- रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.तसेच या कारवाईत ६४ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले आहे.
Read more >>
प्लास्टीक बंदी बाबत कारवाईत नगरपालिका कर्मचारी सहभागी !
प्लास्टीक बंदी बाबत सदरची कार्यवाही करण्याकरता शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता निरिक्षक श्री. दत्तात्रय बर्गे, स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता श्री. आदित्य बनकर, स्वच्छता मुकादम श्री. मनोज अहिरे, श्री. सागर कांबळे, तसेच सफाई कर्मचारी श्री. मयूर जाधव, श्री. गणेश शेंडगे, श्री. रमेश चव्हाण, श्री. वामन जाधव, श्रीम.राणी गव्हाणे, श्रीम. इंदुबाई मोरे, श्रीम. विद्या म्हस्के. श्रीम. शितल घारु, श्री. काळूराम आसवले यांचा सहभाग होता.
शिरुर पोलीसांचा सहभाग !

शिरुर पोलीसांची देखील या कारवाई बाबत मदत घेण्यात आली. पोलिस अंमलदार श्रीम. मनीषा फंड व श्री. रघु हळनोर यांचे या शिरुर नगरपालिकेच्या कारवाई पथकास सहकार्य लाभले.
कायदे न पाळण्साठी सरकार बनवत असते.असा एक सार्वत्रिक गैरसमज समाजात आहे.
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
कायदा जणु न पाळण्यासाठी असतो !
म्हणुन कधीच कायदा न पाळणे हे लोकशाहीत नागरिकांचे कर्तव्यावर असते.असा जणु समज बेशिस्त असलेल्या आपल्या समाजाचा आहे हे पदोपदी आपल्या नजरेस दिसते. मग कधीतरी स्वतःला काही त्रास झाला की कायदे,नियम आपल्याला आठवतात.कायद्याची अंमलबजावणी करुन घ्यायची जबाबदारी प्रशासनाची असते.प्रशासन एरव्ही सुस्त असते.बेशिस्त लोक कर्मचार्यांशी अरेरावीने वागु लागतात.
जगात काय चालले आहे?
यु ट्यूब वर अनेक देशांतील गावे,शहरे,बाजार,वाहतुक तेथे प्रत्यक्ष जावुन सविस्तर पणे माहिती आपल्याला दाखवत असतात.त्यातुन घेण्यासारखे आहे. अगदी चीन,इस्राईल,अमेरिका, जर्मनी च काय पण किम जोंग उन च्या उत्तर कोरिया देखील पहायला मिळतो.
Read more >>
ब्रेकींग न्युज : 1कोटी 27 लाख 71 हजार रुपयांचा घोटाळा शिरुर तालुक्यात?
तरुणाई फिदा रिल्सवर !
पण आपण रिल पाहण्यात मग्न असतो तासनतास ! तरुणाई तर जणु वेडीच झाली आहे रिल पाहुन पाहुन ! अशा स्थितीत शिरुर नगरपालिका व शिरुर पोलीसांनी हे एक स्तुत्य काम नक्की केले आहे.