
Shirur News MIDC : 3300 ब्रास मुरूम चोरीचा गंभीर प्रकार! शिरूर MIDC परिसरातील लाखोंचा मुरूम अज्ञात व्यक्तीकडून चोरी
Shirur News MIDC Murum Chori
शिरुर , दि. 28 मे 2025 | सत्यशोधक न्युज |
Shirur News मधे शिरूर तालुक्यातील करडे MIDC परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या जमिनीतून तब्बल 3300 ब्रास मुरूम अज्ञात व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे चोरून नेण्यात आला आहे. या चोरीची अंदाजे किंमत 19,80,000 रुपये असून याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔍 घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —-
▪️ फिर्यादी – मिलिंद रामचंद्र कासार (वय 56), रा. मीतिला नगरी, पिंपळे सौदागर, पुणे
▪️ गुन्हा दाखल – गु.र.नं. 361/2025
▪️ कलम – भारतीय दंड विधान कलम 379 (चोरी)
▪️ गुन्ह्याची घटना – दिनांक 16 मे 2025, दुपारी अंदाजे 4 वाजता, करडे MIDC, शिरूर
▪️ गुन्हा दाखल तारीख – 27 मे 2025, रात्री 9:25 वा.
▪️ पोलिस अधिकारी – तपास: पो.ह.वा. भोते (1252), दाखल: पो.ह.वा. शिंदे (2463), प्रभारी: संदेश केंजळे
📌 चोरीचा स्वरूप—-
▪️ MIDC मालकीची जमीन – गट क्र. 115/A, 115/B, 115/6 (एकूण 4.08 हेक्टर), गट क्र. 107 (5.07 हेक्टर)
▪️ एकूण चोरी – 3300 ब्रास मुरूम
▪️ चोरीची किंमत – प्रति ब्रास ₹600 प्रमाणे ₹19,80,000/-
▪️ साधने – जेसीबी आणि डंपरचा वापर
मुरूम अनधिकृतपणे खणून वाहून नेण्यात आला—
सदर मुरूम अनधिकृतपणे खणून वाहून नेण्यात आला असून याबाबतची पंचनामा कार्यवाही दिनांक 23 मे 2025 रोजी मंडळ अधिकारी निमोणे, शिरूर यांच्यासमक्ष पार पडली. त्यानंतर फिर्यादीने अधिकृत तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दिली.
📣 प्रशासन व पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा—

या गंभीर प्रकारामुळे औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले असून संबंधित आरोपींना लवकरात लवकर शोधून योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहेमहामंडळाच्या जमिनीवरून जेसीबी व डंपरच्या साह्याने बेकायदेशीर उत्खनन.
— सत्यशोधक न्युज, महाराष्ट्र बातम्या, पुणे बातम्या, शिरुर बातम्या, गुन्हेगारी बातम्या
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. ..
1. https://www.mahapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
2. https://punepolice.gov.in – पुणे ग्रामीण पोलीस अधिकृत संकेतस्थळ
3. https://midcindia.org – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
4. https://www.india.gov.in – भारत सरकारचे अधिकृत पोर्टल
5. https://satyashodhaknews.com – सत्यशोधक न्यूज (ताज्या मराठी बातम्यांसाठी)
✍️ आपण या घटनेबद्दल काय मत व्यक्त करता? आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नोंदवा!
जर तुम्हाला ही बातमी उपयोगी वाटली असेल तर ‘सत्यशोधक न्यूज’ च्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब पेजला नक्की फॉलो करा!
सत्यशोधक न्युज च्या आणखीन उपयुक्त व माहितीपुर्ण बातम्या खालील लिंक वर क्लिक करुन वाचा…
Shirur Missing News: मलठण गावातील ४० वर्षीय अजित अल्हाट बेपत्ता, कुटुंबीयांची मदतीची विनंती
2 thoughts on “Shirur News MIDC : 3300 ब्रास मुरूम चोरीचा गंभीर प्रकार! शिरूर MIDC परिसरातील लाखोंचा मुरूम अज्ञात व्यक्तीकडून चोरी ”