
Shirur News: शिरूरमध्ये जंगलात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा छापा; सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Shirur News अंतर्गत जुगारींवर शिरुर पोलीसांची कारवाई!
📍 ठिकाण: मलठण, ता. शिरूर, जि. पुणे
📅 घटना घडल्याची तारीख: 05 ऑगस्ट 2025, सायं. 5 वा.
📄 गुन्हा दाखल झाल्याची वेळ: रात्री 10.51 वा.
📜 कायदेशीर कलम: महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम 12 (अ)
शिरूर ,दिनांक ६ ऑगस्ट 😐 प्रतिनिधी |
Shirur News : शिरूर तालुक्यात मलठण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर तीन पत्ती जुगारावर पोलिसांनी छापा टाकत सहा आरोपींना अटक केली. महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल.
शिरूर तालुक्यातील मलठण गावाच्या हद्दीत असलेल्या फॉरेस्टच्या मोकळ्या जागेत पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीरपणे सुरू असलेला ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार उध्वस्त केला. या कारवाईत सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल संतोष सुभाष बनसोडे (ब.नं. 1481) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मलठण येथील मोकळ्या जागेत इसम आबा विठ्ठल शिंदे (50), लक्ष्मण सिताराम शिंदे (33), दादा रकमा कोळपे (38), अकबर अब्बास पटेल (64), शिवाजी कृष्णा शेंडगे (50), आणि कारभारी मच्छिंद्र डांगे (54) हे बेकायदेशीरपणे तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले.
या छाप्याची नोंद शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 565/2025 नुसार करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पो.ह.वा. 2436 बनकर हे करत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पीआय संदेश केंजळे हे काम पाहत आहेत.
पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कारवाईमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून जुगाराच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होत असल्याचा विश्वास वाढीस लागला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळां••••
🔗1.https://www.livemint.com/news/india – राष्ट्रीय गुन्हे आणि कायदा वृत्त
2. https://www.punekarnews.in – पुणे जिल्ह्यातील स्थानिक बातम्या
3. https://www.mha.gov.in – गृहमंत्रालय, भारत सरकार
4.https://maharashtrapolice.gov.in – महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
‘सत्यशोधक’च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंकवर क्लिक करुन •••••
कारेगाव येथे शेततळ्यात दुर्दैवी अपघात: दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू, दोन जखमी
1 thought on “Shirur News: शिरूरमध्ये जंगलात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर पोलिसांचा छापा; सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल”