
Contents
Shirur News: : बेकायदेशीर दारू विक्री करणारा आरोपी अटकेत!
Shirur News Illegal Daru Vikri Karanara Atake
शिरूर | दि. १३ जून २०२५| प्रतिनिधी |
” Shirur News: शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शिरूर पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. आरोपीकडून 2220 रुपयांचा मद्यसाठा जप्त. वाचा संपूर्ण बातमी.”
शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात बेकायदेशीररीत्या देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या एका आरोपीस शिरूर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. पोलिस अंमलदार भाउसाहेब शहाजी टेंगले (ब. नं. १७२२) यांच्या फिर्यादीवरून आरोपी स्वप्निल दगडू भंडलकर (वय २८, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडवगण फराटा येथील हॉटेल राजमुद्रा शेजारील पत्राशेडच्या आडोशाला—-
ही कारवाई दिनांक १३ जून २०२५ रोजी सकाळी १०:१० वाजता मांडवगण फराटा येथील हॉटेल राजमुद्रा शेजारील पत्राशेडच्या आडोशाला करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान आरोपी स्वप्निल भंडलकर याच्याकडून खालील प्रमाणे सीलबंद दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला:
जप्त माल—
✅टॅंगो पंच कंपनीच्या 180 मिलीच्या 24 सीलबंद बाटल्या, किंमत 1680 रुपये
✅मॅकडोनल नंबर वन रम कंपनीच्या 180 मिलीच्या 4 सीलबंद बाटल्या, किंमत 540 रुपये
एकूण मालाचा अंदाजे बाजारमूल्य 2220 रुपये इतका असून, सदर माल आरोपीकडे बिगर परवाना व विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल—-

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे (ब. नं. २४६३) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्हा नोंद करणारे अंमलदार पो.ह. कोथळकर (ब. नं. २५६०) असून, या कारवाईचे नेतृत्व शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. केंजळे यांनी केले.
या कारवाईमुळे परिसरात दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी सक्षमपणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरूर पोलिसांचे या कार्यवाहीबद्दल कौतुक होत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••••
https://www.mahapolice.gov.in — महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ
https://excise.maharashtra.gov.in — राज्य उत्पादन शुल्क विभाग
https://satyashodhaknews.com — सत्यशोधक न्यूज – शिरूरसाठी जागरूक पत्रकारिता
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून—-
Free Laptop योजना: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी वाट !
Title: Shirur Tourism 2025 : शिरुर पर्यटकासाठी गाईड!