
Contents
Shirur News Domestic Violence: शिरूरमध्ये विवाहितेचा 11 वर्षांपासून छळ – पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल!
Shirur News Domestic Violence Since 11 Years
दिनांख 27 जु2025 | शिरूर (प्रतिनिधी) |
“शिरूर तालुक्यातील करडे येथे एका विवाहितेने 11 वर्षांच्या मानसिक आणि शारीरिक छळानंतर पती व सासूविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण घटना, गुन्हा तपशील आणि कायदेशीर कारवाई जाणून घ्या.”
एक स्त्री गेल्या 11 वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ सहन करत होती. अखेर तिने आपल्या पती व सासूविरुद्ध शिरूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही करडे (ता. शिरूर) येथे घडली असून, पोलिसांनी भादंवि कलम 85, 118(1), 115(2), 352, 351(2), (3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
📌 घटनेचा तपशील —-
▶️ गुन्हा क्रमांक – 452/2025
▶️ तक्रारदार – सौ. पूजा ज्ञानेश्वर लोखंडे (वय 28, व्यवसाय – गृहीणी),
मूळ गाव – मरकळ, ता. खेड, जि. पुणे | सध्या – करडे, ता. शिरूर
▶️ आरोपी –
1. ज्ञानेश्वर विनायक लोखंडे (पती)
2. शोभा विनायक लोखंडे (सासू)
(दोघे रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे)
▶️ घटना दिनांक – 17 जून 2025 रोजी संध्याकाळी 07.30 वा
▶️ तक्रार दाखल – 26 जून 2025 रोजी, वेळ 18:26 मिनिटे, एन्ट्री नं. 24
▶️ पोलिस ठाणे – शिरूर पोलिस स्टेशन
▶️ तपास अधिकारी – पो. ह. पवार
▶️ प्रभारी अधिकारी – पो.नि. संदेश केंजळे
💬 तक्रारीतील गंभीर आरोप —-
तक्रारीनुसार, दि. 27/11/2014 ते 17/06/2025 या कालावधीत वेळोवेळी तिला शिवीगाळ, दमदाटी, शारीरिक मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागला.
दि. 17 जून 2025 रोजी, पतीने किरकोळ कारणावरून तिला लहान मुलांचे खेळण्याचे बॅट वापरून मारहाण केली. तसेच, दि. 19 जून रोजी तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
या सर्व प्रकारामुळे तिने पती व सासूविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात कायदेशीर तक्रार नोंदवली.
⚖️ कायदेशीर कारवाई सुरू —-
शिरूर पोलिसांनी महिलेस दिलेले मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन, संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. ह. पवार करत आहेत.
📢 संपादकीय टिप्पणी —-
या घटनेमुळे अजून एकदा स्पष्ट होते की, स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचार अजूनही समाजात खोलवर रुजलेला आहे. अशा महिलांनी पुढे येऊन न्यायासाठी आवाज उठवावा, हे अत्यंत गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
1. https://ncw.nic.in/ – राष्ट्रीय महिला आयोग
2. https://mahilaayog.maharashtra.gov.in/ – महाराष्ट्र राज्य महिला आयोग
3. https://punepolice.gov.in/ – पुणे पोलीस अधिकृत संकेतस्थळ
1 thought on “Shirur News Domestic Violence: शिरूरमध्ये विवाहितेचा 11 वर्षांपासून छळ – पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल!”