
Shirur News : आषाढी एकादशी निमित्त ‘ओन्ली वूमन जीम’ तर्फे फराळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम
Shirur News Ashadhi Ekadashi
📍शिरूर प्रतिनिधी | दिनांक: 6 जुलै 2025 |
Shirur News : शिरूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने ओन्ली वूमन जीम व भाजप महिला आघाडीच्या प्रिया बिरादार यांच्या वतीने महाआरती आणि फराळ वाटपाचा उपक्रम संपन्न. शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
शिरूर शहरात आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने ‘ओन्ली वूमन जीम’ आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या वतीने सामाजिक आणि धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीदत्त मंदिराजवळ श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची महाआरती पार पडली आणि यानंतर शाबुदाणा खिचडी व केळींचा फराळ भक्तांना वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाआरती करण्यात आली, ज्यामध्ये शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रिया बिरादार म्हणाल्या, “आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, सेवाभाव आणि एकतेचं प्रतीक. या दिवशी आम्हाला भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणं हेच आमचं खऱ्या अर्थाने पुण्य आहे.”
या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर—
• भाजप तालुकाध्यक्ष राहुलदादा पाचर्णे
• माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर
• माजी सभापती संतोष शितोळे
• सामाजिक कार्यकर्ते बापू सानप, प्रितेश फुलडाळे
• पत्रकार सतिश धुमाळ, संतोष शिंदे, अर्जुन बढे
• शिवसेना महिला आघाडीच्या सुजाता पाटील
• मनसे महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे
• डॉ. संतोष पोटे (मीरा नर्सिंग होम)
• शशिकला काळे (आदिशक्ती महिला मंडळ)
• उषाताई वाखारे (वात्सल्य सिंधू फाउंडेशन)
• प्रमोद जोशी, नीलमधू शर्मा (अध्यात्मिक आघाडी)
• भाजप उपाध्यक्षा सुष्टि करंजुळे, विजयलक्ष्मी उपाध्याय
• कविता बोरगे, मीरा परदेशी, सना शेख, सुशीला गोसावी
• हरीश शर्मा, श्याम पाटील, सुवर्णा चिपाडे, गणेश चिपाडे
फराळ वाटपानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे स्वागत प्रिया बिरादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवसेनेच्या सुजाता पाटील यांनी मानले.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना ••••
🌐
https://mr.wikipedia.org/wiki/आषाढी_एकादशी
https://www.maharashtra.gov.in/