Shirur Nagarpalika Parking बाबत शिरुर नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष्य होत असल्याचे चित्र आहे. विशेषत: शिरुर बस स्थानकासमोर पार्कींग शिस्तीची ऐसीतैसी करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत. ' सत्यशोधक न्युज टिम' ने प्रत्यक्ष पाहुन हा रिपोर्ट देत आहे.
Shirur Nagarpalika Parking बाबत शिरुर नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष्य होत असल्याचे चित्र आहे. विशेषत: शिरुर बस स्थानकासमोर पार्कींग शिस्तीची ऐसीतैसी करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न नागरीक विचारत आहेत. ‘ सत्यशोधक न्युज टिम’ ने प्रत्यक्ष पाहुन हा रिपोर्ट देत आहे.
Shirur NagarpalikParking: शहरालाच आले ‘बकालपण’ !
Shirur Nagarpalika Parking: केवळ ‘बकालपण’!
शिरुर शहरात कोनतीच अशी एक वेगळी शिस्तबद्ध पार्कींगची जागा उपलब्ध करुन दिली गेलेली नाही. त्यामुळे शिरुर शहरातील बस स्थानकासमोर, पाच कंदिल चौक ,भाजी बाजार,हलवाई चौक,पोस्ट आफिस परिसर कुठेच जागा नाही. त्यामुळे वेगवेगळय़ा वाहनांसाठी ती पार्कींग करण्यासाठी कोनतीच व्यवस्था नाही.त्यामुळे आधीच सार्वजनिक वस्तु,ठिकाणे,सुविधा यांच्याबाबत बेशिस्त अंगात मुरलेले तमाम नागरिक वाटेल तसे पार्कींग करणार नाहीत तर काय ,’ स्वयंचलित’ पणे कोनती शिस्त पाळतील तरच नवल ! त्यामुळे शहरालाच एक ‘बकालपण’ आले आहे.
Shirur Nagarpalika Parking: कोणी ‘दानशुर’ ‘आका’ चा रिमोट कंट्रोल !
एकतर शिरूर नगरपालिकेत सध्या लोकांचे प्रतिनिधीच नाहीत.तीन वर्षे एखादी सार्वजनिक व्यवस्था म्हणजे नगरपालिका चालणे.हा एक बराच मोठा विनोद आहे. पण राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेव्हाच घेईल जेव्हा मुंबई सारखि एखादी मोठी आणि श्रिमंत महानगरपालिका ‘चरायला’ अनुकूल राजकिय परिस्थिति निर्माण होईल ! त्या नादात विना लोकप्रतिनिधींच्या नगरपालिका कशाही चालोत ! पण निर्णय़ असा घ्यायचा नाही. पण त्यामुळे सर्व राज्यातील नगरपालिकांमधे सर्व अस्ताव्यस्त चित्र आहे. त्यातलीच शिरुर नगरपालिका एक आहे.
एक भाग्य शिरुरच्या लोकांचे मोठे ! की म्हणे कोणी ‘दानशुर’ ‘आका’ चा रिमोट कंट्रोल कोणी प्रतिनिधि असोत वा नसोत वर्षानुवर्षे इथली माणसे कंट्रोल करतो.असे ऐकायला मिळते. रिमोट कंट्रोल वगैरे पद्धत लोकशाहीत नसते.पण इथला माणुस भित्रा व लालसी असल्याने तो रिमोट कंट्रोल चालतो म्हणतात.त्याचे ‘चमचे’ चालवतात कारभार कसाही ! तो शिरुरच काय परदेशात असला तरी हे प्युअर चमचे इथलं सगळं पाहतात.
Shirur Nagarpalika Parking: चमच्यांच्या हातात शिरुर?
Shirur Nagarpalika Parking: चमच्यांच्या हातात शिरुर —
मग प्रशासक असो की नगरसेवक असो.तसे ते नावालाच नगरसेवकपदी असतात.बाकी हा ,’ आका’ तसा चांगल्या स्वभावाचा असल्याची माहिती प्राप्त होते आहे.पण चमचे पक्के बनलेले !
यांच्या तावडीतुन शिरुरकरांची सुटका काही होण्याची शक्यता नाही. पण निदान एवढा बट्ट्याबोळ तरी नको ! बातम्यांच्या माध्यमातुन माहिती राज्यभर जाते. शिरुरचे नाव खराब होते. फोटो,व्हिडीओत इथलं चित्र महाराष्ट्राला नका पहायला देवु ! नावं ठेवतील शिरुरला !
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——- सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर. डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇 १) सम्यक् विद्रोहाचे साहित्य. २) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष. ३) ‘समा’कारांची पत्रकारिता. ४) प्रयोजन ? व इतर..👇 सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५
एकंदितच सातत्याने किमाण पार्कींग च्या बातम्या पाच कंदील चौक वगैरे ठिकाणच्या वारंवार सचित्र देउन देखील परिस्थिती जैसे थे! जे जनतेच्या कररुपी पैशातुन काम न करता ऐतखाऊपणे पगार घेऊन कामे करत नाहीत.त्यांना ‘मनाची ‘तरी शरम वाटावी !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com