
Contents
शिरूर : आठ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल – जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात मारहाण आणि शिवीगाळ
मोराची चिंचोली येथील घटना !
शिरूर, 12 मे 2025 –(Satyashodhak News Report)
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, मोराची चिंचोली (तालुका शिरूर, जिल्हा पुणे) येथे 11 मे रोजी सकाळी 11 वाजता आठ अनोळखी व्यक्तींनी पुण्यातील एका गृहिणीवर मारहाण करून शिवीगाळ केली, अशी तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात अंजली शुभम तांदळे (वय 25, रा. आत्मा नगर हाऊसिंग सोसायटी, खराळवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्रमांक 317/2025 अन्वये BNS कलम 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी त्यांच्या गाडीचा (MH12XX0992) आणि दुसऱ्या कारचा (MH12VV7662) फोटो काढल्यावर दोन अनोळखी महिला, त्यांच्यासोबतचे चार पुरुष आणि दोन लहान मुले – एकूण आठ अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत शिवीगाळ आणि मारहाणीचा समावेश असून पो. ह. व. जगताप यांनी प्राथमिक नोंद केली आहे, तर तपास पो. ह. व. वारे करत आहेत.