
Contents
- 1 शिरुर तालुक्यात एकास लाथा बुक्यांनी मारहाण ! आज व पत्नीस शिवीगाळ !
- 1.1 शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
- 1.1.1 शिरुर, दिनांक 25 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार हकीकत पुढील प्रमाणे आहे.
- 1.1.3 जीवे मारण्याची धमकी दिली !
- 1.1.4 फिर्यादी –
- 1.1.5 आरोपी- 1) संकेत विठ्ठल ढोमे 2) रोहीत बन्शी पोखरकर , दोघे ,राहणार – पिंपरखेड ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे हे आहेत.
- 1.1.6 शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
- 1.1.7 माणुस हिंसा करण्यास सहज प्रवृत्त का होतो ?
- 1.1.8 याला विलाज काय असु शकतो ?
- 1.1.9 ध्यान साधना Meditation हा एक मार्ग ?
- 1.1.10 About The Author
- 1.1 शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरुर तालुक्यात एकास लाथा बुक्यांनी मारहाण ! आज व पत्नीस शिवीगाळ !
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
शिरुर, दिनांक 25 जानेवारी : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
(Thanks for featured Image to pixabay.com )

शिरुर तालुक्यात एकास लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याच्या आई व पत्नीस शिवीगाळही केली गेली आहे. जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.ही घटना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली आहे.शिरुर पोलीस स्टेशन मधे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार
हकीकत पुढील प्रमाणे आहे.
दिनांक- 22/01/2025 रोजी रात्री 08:30 ते 9:00 वाजण्याच्या दरम्यान कोयमहालेवस्ती, गणपती मंदिर, पिंपरखेड, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे या ठिकाणी एक घटना घडली आहे. येथील संकेत विठ्ठल ढोमे याने त्याच्या वडीलांना शेतीच्या बांधावरून जावू न दिल्याच्या कारणावरून फिर्यादी सिध्देश अर्जुन पोखरकर, वय -22 वर्षे ,व्यवसाय- शेती, राहणार – पिंपरखेड, तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे यांना उसाच्या टिपराने मारहाण केली आहे.
जीवे मारण्याची धमकी दिली !

तसेच लाथाबुक्याने देखील मारहाण केली आहे.तसेच रोहीत बन्शी पोखरकर याने फिर्यादीला शिवीगाळ केली. जिवे ठार मारण्याची धमकीही दिली आहे. तसेच त्यांनी फिर्यादीची आई व पत्नी यांना शिवीगाळ केली. घराच्या दरवाजावर दगड मारला. दरवाजाचे नुकसान केले आहे. म्हणुन फिर्यादी यांची
1) संकेत विठ्ठल ढोमे,
2) रोहीत बन्शी पोखरकर ,
दोघे राहणार – पिंपरखेड ,तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे ;
यांच्या विरूध्द रितसर तक्रार शिरुर पोलीस स्टेशन मधे केली आहे.
Read more >>
शिरुर मधे धारदार हत्याराने वार ? तर तालुक्यातील दुसर्या घटनेत 28 वर्षीय तरुण अपघातात मृत्युमुखी !
फिर्यादी –
सिध्देश अर्जुन पोखरकर, वय- 22 वर्षे, व्यवसाय -शेती, राहणार – पिंपरखेड तालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे हे आहेत.
आरोपी-
1) संकेत विठ्ठल ढोमे 2) रोहीत बन्शी पोखरकर ,
दोघे ,राहणार – पिंपरखेड ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे हे आहेत.
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल !
आरोपींवर शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर -55/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 118 (1), 115 (2),352,351(2)(3), 324(4),3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
शिरुर मधील बहुचर्चित ‘असिफ खान हल्ला प्रकरणा’ तील आरोपीस अखेर अटक !
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. वारे हे करत आहेत.
प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे , शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
Read more >>
माणुस हिंसा करण्यास सहज प्रवृत्त का होतो ?
शिक्षण कमी असणे किंवा अजिबात नसणे हे एक कारण असतेच.पण कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असते.ते ती पार पाडत नाहीत.हे दुसरे महत्वाचे कारण आहे. लोकांनी करस्वरुपात दिलेल्या पैशातुन ते कार्य पार पाडण्याचे काम पोलिस व तत्सम यंत्रणांकडे लोकशाही व्यवस्थेत दिलेले असते.याचे भान ना या यंत्रणांना आहे ना नागरिकांना आहे.बेफिकीरीपणा हा सामान्य माणसांचा एक दुर्गुण कायमच असतो.परिणामी गुन्हा्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.
Read more >>
आदर्श शिक्षिका पुरस्कार ‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल’ कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल कांचन सोनवणे पाटील !
बायोलॉजिकल कारण काय आहे?
अगदीच वैज्ञानिक व बायोलॉजिकल कारण पाहिले तर माणुस हा मुळ एक पशुच आहे.त्यामधे उत्क्रांती झाली.ती अजुनही होते आहे.उदाहरणार्थ सांगायचे तर आजची लहान मुले जास्त चलाख दिसतात.वीस वर्षांपूर्वीची मुले बहुदा शांत असत.पण आधुनिक औषधे जी गरोदर महिलांना दिली जातात.त्याचा हा परिणाम आहे.पुर्वी अशी औषधे नव्हती.आणि तो मुळचा पशु असल्याने पाशवी वृत्ती उफाळुन वर यायला वेळ लागत नाही. हिंसेची हार्मोन्स अजुन मानवी शरिरात तयार होतच असतात. इतर वेळेस समंजसपणा दाखवणारा मानव स्वतः च्या मनासारखे काही झाले नाही तर हिंसक होतो.ते मानवी जिन्समधेच असावे.
Read more >>
AI अर्थात आर्टिफिशल इंटेलीजेंस, कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे.
याला विलाज काय असु शकतो ?
यावर भरपुर अभ्यास सायन्स व अध्यात्मात केला गेलेला आहे. मेडीकल सायन्स मधे मेडिसीन उपलब्ध असतात.पण ती केमिकल्सवर आधारित असतात. मानवी उत्क्रांतीच्या फारच अलिकडील काळात हा मार्ग निर्माण झाला आहे.लाखो वर्षांचा या केमिकल्सचा अनुभव मानवी शरिराला नाही.तर नैसर्गीक organic वस्तुंचा अनुभव मानवी शरिराला आहे.त्यामुळे केमिकल्सच्या अनुभवाशी जुळवुन घ्यायला कित्येक वर्षे लागणार असतात.कारण उत्क्रांती फार संथ गतीने होते. क्रांती रात्रीत होवु शकते.याचा अनुभव मानवी प्रजातीला आहे.विशेषत: राजकीय क्षेत्रामध्ये तर नक्कीच आहे. पहाटेचा शपथविधी आणि सकाळी परत तो रद्द होण्याचा अनुभव आपण घेतला आहे. किंवा एखादा हुकुमशहा रात्रीत तख्तापलट करतो.अशी उदाहरणे जगभर आहेत.त्याला क्रांती म्हणतात. पण उत्क्रांतीला लाखो,करोडो वर्षे लागतात.हे विज्ञान आहे.
Read more >>
ध्यान साधना Meditation हा एक मार्ग ?

अर्थात मेडिटेशन किंवा ध्यान करणे.सातत्याने करणे.हा एक उपाय आहे. हे मेडीकल सायन्स देखील सांगते.ध्यान म्हणजे मनाला एक सकारात्मक व्यायाम देणे असते.तो संयम ठेवण्यासाठीचा सराव असतो.मन स्थिर ठेवण्याचा सराव असतो. मध्यम मार्ग आचरणाचे मनाला दिलेले शिक्षण व सराव असतो. Practice makes perfect असे म्हणतात. म्हणुन मेडिटेशन, ध्यान किंवा योग अशा अनेक पद्धती जगभर विकसित केल्या गेलेल्या आहेत.तो मार्ग आचरणे आवश्यक आहे. असो.सत्यशोधक न्युज केवळ बातम्या देत नाही. तर प्रबोधन करण्यासाठी निर्माण केले गेले आहे.तो ब्लाग देखील आहे. हे आमच्या वाचकांनी समजुन घ्यावे,ही नम्र विनंती. त्यामुळे बातमीपेक्षा अधिक बरेच इथे वाचायला मिळेल. त्याचा लाभ घ्यावा.