
शिरुर पोलिस स्टेशन
Contents
- 1 शिरुर मधुन 22 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता ! तर महाजन मळ्यातुन 39 हजार रुपये किंमतीच्या सात बॅट-या चोरीला !
- 1.1 शिरुर शहरातुन महिला बेपत्ता होण्याच्या घटना सुरुच ! तर चोर्यामार्याही सुरुच !
- 1.1.1 शिरुर, दिनांक 20 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
- 1.1.2 शिरुर मधुन 22 वर्षीय विवाहिता बेपत्ता —
- 1.1.3 बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे —-
- 1.1.4 शिरुर पोलीस करत आहेत पुढील तपास. …
- 1.1.5 शिरुर जवळच्या महाजन मळ्यातुन ट्रकच्या बटर्या चोरीला……
- 1.1.6 चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे —-
- 1.1.7 About The Author
- 1.1 शिरुर शहरातुन महिला बेपत्ता होण्याच्या घटना सुरुच ! तर चोर्यामार्याही सुरुच !
शिरुर मधुन 22 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता ! तर महाजन मळ्यातुन 39 हजार रुपये किंमतीच्या सात बॅट-या चोरीला !
शिरुर शहरातुन महिला बेपत्ता होण्याच्या घटना सुरुच ! तर चोर्यामार्याही सुरुच !
शिरुर, दिनांक 20 आगस्ट : (श्री.अनिल डांगे यांच्याकडून)
शिरुर मधुन 22 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे तर महाजन मळ्यातुन 39 हजार रुपये किंमतीच्या सात बॅट-या चोरीला गेल्या आहेत.बेपत्ता विवाहितेची मिसींग म्हणुन नोंद करण्यात आली आहे. तर महाजन मळ्यातील चोरीत अज्ञात चोरटयाविरूद्ध भारतीय न्याय संहितेनुसार शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर शहरात महिला बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. तर चोर्यामार्याही सुरुच आहेत.या घटनांचा तपास पोलीस निरीक्षक श्री. जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शिरुर मधुन 22 वर्षीय विवाहिता बेपत्ता —
शिरुर पोलीस स्टेशनला नोंद केल्याप्रमाणे हकीगत अशी की दिनांक १७/०८/२०२४ रोजी रात्री १०/०० वाजण्याच्या ते १८/८/२०२४ रोजी पहाटे ०५/०० वाजण्याच्या सुमारास राहणार- रम्यनगरी, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे गावच्या हृददीमध्ये रहात्या घरातून खबर देणार शहबाज निसार बागवान, वय -२४ वर्ष, व्यवसाय -फ्रुटविक्री ,राहणार – रम्यनगरी, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे यांची वहिणी गौरी अरबाज बागवान वय, २२- वर्ष ही कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. ती अदयाप पर्यंत घरी आली नाही. म्हणून ती बेपत्ता म्हणुन नोंद दाखल करण्यात आली आहे.‘शिरुर’
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे —-
गौरी अरबाज बागवान, वय -२२ वर्ष ,राहणार – रम्यनगरी ,शिरूर, तालुका – शिरूर ,जिल्हा- पुणे, केस लाब काळे, उंची ५ फुट, रंग गोरा, अंगाने मध्यम, अंगात फिक्कट पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात पैजण व जोडवे, कानात टॉप्स सोबत निळ्या रंगाची बॅग तर सोबत मो. में. एअरटेल कंपनीचे सीम नंबर ८६२४८९५५७९ हे आहे.
शिरुर पोलीस करत आहेत पुढील तपास. …
शिरुर पोलीस स्टेशनला मिसिंग र.नं.-९७/२०२४ अशी नोंद करण्यात आली आहे. दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. बनकर हे आहेत.पुढील तपास अधिकारी पोलीस हवालदार श्री. आगलावे हे आहेत. पोलीस निरीक्षक श्री.ज्योतीराम गुंटवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
————
शिरुर जवळच्या महाजन मळ्यातुन ट्रकच्या बटर्या चोरीला……

शिरुर मधे घडलेल्या घटनेत शिरुरच्या पोलीस स्टेशनला नोंद केल्याप्रमाणे हकिकत अशी की दिनांक १७/०८/२०२४ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते दिनांक १८/०८/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या दरम्यान शिरूर गावच्या हद्दीत पोतदार शाळेच्या पार्कीगमध्ये श्री. राहुल बापु गावडे ,वय -२८ वर्ष, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट राहणार – पोतदार शाळेजवळ, महाजनमळा, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे यांच्या लावलेल्या चार ट्रकच्या एकुन सात बॅट-या एकुन किंमत ३९,००० हजार रुपायाच्या असलेल्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन चोरून नेल्या आहेत . म्हणुन त्या अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करणेत आला आहे.
चोरीला गेलेला माल पुढील प्रमाणे —-
1 १०,०००/- ट्रक नं. एम एच १६ सी सी ७२४९ हिच्या दोन बॅट-या त्यांचे वर्णन एस एफ सोनीक १०० वेंट च्या दोन बॅट-या प्रत्येक बॅटरीची किंमत अंदाजे ५,००० हजार रु. प्रमाणे नु, वा.कि.अं.
2 ) ७,०००/- ट्रक नं. एम एच १४ डी एम ०६३७ हिची एक बैटरी तीचे वर्णन आर वॅटची बॅटरी ज.वा.कि.अं. को कंपनीची १३०
3 ) १०,०००/- ट्रक नं. एम एच १४ जी डी ६१८५ हिच्या दोन बॅट-या त्यांचे वर्णन इमीको कंपनीची १०० वॅटची एक बॅटरी व डाईनीस कंपनीची एक बॅटरी प्रत्येक बॅटरीची किंमत अंदाजे ५,००० हजार रु. प्रमाणे जु. वा. कि.अं.
4 ) १२,०००/- ट्रक न. एम एच १६ सी डी ७२९० हिच्या दोन बॅट-या त्यांचे वर्णन एक्साईड कंपनीच्या १२० वॅटच्या दोन बॅट-या प्रत्येक बॅटरीची किंमत अंदाजे ६,००० हजार रु. प्रमाणे जु.वा.कि.अं.असा एकुण३९,०००/-रुपये किंमतीचा तो माल आहे.
शिरुर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ७०२/२०२४ आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार सहायक फौजदार श्रीबनकर हे आहेत.पुढील तपास पोलीस हवालदार श्री.खेडकर हे करत आहेत.पोलीस निरीक्षक,श्री. जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ‘तपास सुरु आहे.