
संतापजनक घटना : शिरूर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी ? ; अखेर आज दिनांक 3 डिसेंबर रोजी माऊली आबा कटके यांच्या हस्तक्षेपानंतर शिरुरमधे शांतता !
शिरूर शहरात सकल हिंदू समाजाची ‘बंद’ ची हाक ! तर नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांची उद्या शिरूर शहरात नियोजित भेट !
शिरूर, दिनांक 2 डिसेंबर : ( देवीदास राठोड यांच्याकडुन)
संतापजनक घटना घडलेली आहे. शिरुर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी (?) करण्यात आली असल्याचे तेथे सापडलेल्या वस्तुंवरुन दिसत आहे . या घटनेनंतर
शिरूर शहरात सकल हिंदू समाजाने ‘बंद ‘ ची हाक दिली आहे. दरम्यान नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांची उद्या शिरूर शहरास भेट होत आहे. त्यामुळे या विषयावरून उद्या शिरूर शहरातील वातावरण तंग होण्याची चिन्हे दिसायला लागलेली आहेत.अखेर आज दिनांक 3 डिसेंबर रोजी माऊली आबा कटके यांच्या हस्तक्षेपानंतर शिरुरमधे शांतता !
शिरूरमध्ये एक जुने राम मंदिर आहे. आणि ते राममाळी परिसरामध्ये आहे. हे राम मंदिर तसे दुर्लक्षित आहे. या मंदिराची वाईट अशी दूरवस्था झालेली आहे. या ठिकाणी सर्व अस्ताव्यस्तता आहे.
त्याची काही दुरुस्ती करण्याची अपेक्षा शिरुर शहरातील आणि परिसरातील राम भक्तांना असून देखील या विषयाकडे फारसे गंभीर्याने कोणी घेतलेले दिसत नाही. अशा या दुर्लक्षित राम मंदिरामध्ये अज्ञात व्यक्तींनी पार्टी साजरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंमध्ये मटन, चिकन वगैरे पदार्थांचे तुकडे वगैरे सापडलेले आहेत.
“दरम्यान आज दिनांक 3 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांनी या राम मंदिराला भेट देऊन कार्यकर्ते,भाविक,नागरिकाना संयम पाळण्याचे आवाहन केले. राम मंदिर संबंधीत ट्रस्ट व इतर कायदेशीर बाजु तपासुन राम मंदिरात मद्यपान,पार्टी करणार्या आरोपींना शोधून काढण्याच्या सुचना पोलिस अधिकार्यांना दिल्या आहेत. राम मंदिर,शिरुर याच्या जिर्णोध्दाराचे कामही लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शेवटी शिरुर शहरातील बंद पाळणार्या व्यापारी, नागरिकांना भेटुन बंद आंदोलन थांबण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक भाविक,नागरिक,कार्यकर्ते,ट्रस्टी,पत्रकार,पोलिस अधिकारी यांच्यासमवेत राम मंदिरात आरती व घोषणा करण्यात आल्या.”
ही बातमी शिरूर शहरातील सकल हिंदू समाज कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जावुन त्या ठिकाणी पाहणी केली. आणि त्यानंतर त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. अशा प्रकारची कृती करणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांचा शोध घेतला जावा अशी मागणी व अपेक्षा व्यक्त केलेली आहे.
त्यानंतर सकल हिंदू समाजाने उद्या शिरूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन शिरुर शहरातील जनतेला केलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिरुर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे कृत्य करून कोणत्याही समूहाच्या धार्मिक भावना दुखावण्याचे अशा प्रकारचे हे काम ज्या कोणी केलेले असेल त्यांना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साह्याने तपास करून शोधून काढता येऊ शकते. असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
संतप्त कार्यकर्त्यांनी यानंतर सामंजस्य भूमिका घेत उद्या शिरूर शहर बंद ठेवण्याचे आवाहन केलेले आहे.
दरम्यान उद्या शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार श्री. माऊली आबा कटके यांचा शिरूर शहराला भेट देण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाणात त्यांचे चाहते सहभागी होतील. सर्व येथील नागरिक सहभागी होतील.पहिल्यांदा ते आमदार झाल्यानंतर शिरूर शहराला भेट देत असल्याने शिरुर शहरातील लोकांच्या अनेक समस्या अडचणी लोक त्यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे. आणि माऊली आबा कटके त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा नागरिक बाळगून शहरातील नागरिक आहेत. शिरूर शहरातील त्यांचे चाहते त्यांच्या या दौऱ्यामुळे आनंदित आहेत.
याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारची घटना घडलेली आहे. मात्र सर्वांनी संयम ठेवावा अशी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेली असून अशा प्रकारचे कृत्य करणारे जे कोणी असतील त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा भावना कार्यकर्त्यांनी ‘सत्यशोधक न्यूज’ कडे व्यक्त केलेले आहे.