
शिरुर मधे सायबर गुन्हेगार सापडले असल्याची चर्चा?
शिरुर (ता. शिरुर, पुणे) – 5 मे 2025 : (प्रकाश करडे यांच्याकडुन)
शिरुर मधे सायबर गुन्हेगार सापडले असल्याची चर्चा?: शिरुर शहरात सध्या एकच चर्चा जोर धरताना दिसत आहे.ती अशी की शिरुर शहरात सायबर गुन्हेगार सापडले आहेत.शिरुरमधील एका भागात पोलीसांनी तपास केला आहे. काही संशयित सायबर गुन्हेगार सापडले आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे.विविध सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अथवा आणि कयास केले जात आहेत.
Contents
- 1 कर्ज देणारा एक इ मेल पहा…
- 1.1 असा कर्ज देणारा इ मेल दररोज येत आहे !
- 1.2 पोलिसांनी अचानक छापा टाकला?—
- 1.3 सायबर गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता—–
- 1.4 पोलिसांचा तपास सुरु,पण अधिकृत माहिती नाही!—-
- 1.5 सायबर क्राइमचा वाढता धोका—-
- 1.6 नागरिकांनी काय काळजी घ्यावी?——
- 1.7 निष्कर्ष——
- 1.8 ” शिरुर मधे सायबर गुन्हेगार सापडले असल्याची चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जरी पोलिसांनी अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नसली तरी नागरिकांनी सतर्क राहणे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहणे गरजेचे आहे.” ——
- 1.9 सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
- 1.10 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
- 2 • शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
कर्ज देणारा एक इ मेल पहा…
असा कर्ज देणारा इ मेल दररोज येत आहे !
पोलिसांनी अचानक छापा टाकला?—
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी शिरुर शहरातील एका निवासी भागात पोलिसांनी अचानक छापा टाकला. या छाप्याच्या दरम्यान काही संगणक, मोबाईल फोन व सायबर गुन्ह्यांमध्ये वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. हा संपूर्ण प्रकार गोपनीय ठेवण्यात आला आहे,अशी चर्चा आहे. ते योग्यही असु शकते. कारण आणखिन तपासात अडचण येण्याची शक्यता असते. तरी आता तो स्थानिक नागरिकांमधे चर्चीला जात आहे. पोलिस योग्य तो तपास करतीलच ! मात्र हा प्रकार प्रथमच शिरुर मधे घडत आहे.
सायबर गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता—–
शिरुर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बनावट बँक खात्यांद्वारे ऑनलाईन फसवणूक, KYC अपडेटच्या नावाखाली OTP मागणे, तसेच लॉटरी जिंकल्याचे फसवे फोन येणे यासारखे प्रकार वाढले होते. त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या अड्ड्याचा उलगडा होण्याचे संकेत नागरिक देत आहेत.
पोलिसांचा तपास सुरु,पण अधिकृत माहिती नाही!—-
पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या काहीच जाहीर केलेले नाही. शिरुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे समजते. असता त्यांनी सांगितले, “तपास सुरु आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.”असे सांगितल्याचे बोलले जात आहे.
सायबर क्राइमचा वाढता धोका—-
सायबर गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असते. यापुर्वी अशा आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी झाल्या होत्या.त्यामुळे सायबर सुरक्षेची गरज अधिक तीव्र झाली आहे. शिरुरसारख्या छोट्या शहरात अशा गुन्हेगारांचा ‘अड्डा'(?) सापडल्यास हे धोक्याचे लक्षण आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?——
• अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
• OTP, पासवर्ड, बँक माहिती कोणालाही देऊ नका.
• शासकीय अधिकारी म्हणवणाऱ्यांच्या कॉलवर सतर्क रहा.
• सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलकडे तक्रार करा.
निष्कर्ष——
” शिरुर मधे सायबर गुन्हेगार सापडले असल्याची चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जरी पोलिसांनी अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नसली तरी नागरिकांनी सतर्क राहणे आणि अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहणे गरजेचे आहे.”
——
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…