
Contents
शिरूर मध्ये टॅम्पोतून 53 हजार रुपयांचा पॉपकॉर्न चोरीला !
शिरुर तालुक्यात चोरीच्या घटनांची मालिका सुरुच !
शिरुर, दिनांक ८ ऑगस्ट २०२५ | प्रतिनिधी |
शिरूर मध्ये टॅम्पोतून 53 हजार रुपयांचा पॉपकॉर्न चोरीला. बाबुरावनगर, कोळपे हॉस्पीटलजवळ घडलेली घटना. पोलिस तपास सुरू, CCTV फुटेजमध्ये चोरटा कैद.
शिरूर शहरातील बाबुरावनगर येथील कोळपे हॉस्पिटल शेजारी अशोक लेयलंड टॅम्पो उभारी होता.त्यात 53,532 रुपयांचा पॉपकॉर्न होता. हा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील तक्रारदार दत्तात्रय भाउसाहेब देवकर ,वय- 31वर्षे, धंदा- चालक, राहणार- चांडोली, ता. खेड, जि. पुणे हे आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 581/2025 असा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2) अंतर्गत हा गुन्हा शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल झाला आहे.
घटना कशी घडली?—-
घटना 6 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10.30 वाजल्यापासून ते 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5.10 वाजेदरम्यान घडली. तक्रारदार देवकर यांनी सांगितले की, त्यांचा अशोक लेयलंड टॅम्पो (MH14 JP 6786) बाबुरावनगर,शिरुर येथे कोळपे हॉस्पीटलजवळ उभा होता. यामध्ये SNN अल्ट्रा जम्बो पॉपकॉर्न असलेल्या 15 सिलबंद गोण्या (प्रत्येकी 30 किलो वजन) आणि 14 किलो वजनाचा पॉपकॉर्न बॉक्स असा एकूण 464 किलो पॉपकॉर्न माल ठेवलेला होता. प्रत्येक गोणीवर वेगवेगळ्या किंमती नमूद केलेल्या होत्या.
सकाळी टॅम्पो तपासताना त्यांना हा माल चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरी झालेल्या मालाची किंमत अंदाजे ₹53,532 इतकी आहे.
पोलिस तपास सुरू —-
तक्रारदारांनी घटनेनंतर आजूबाजूच्या CCTV फुटेजची पाहणी केली.त्यावेळी अज्ञात चोरट्याने टॅम्पोतून माल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलिस स्टेशन मधे हजर होऊन तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार श्री. भगत हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. हवालदार भगत हे करत आहेत.या प्रकरणाचे प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे आहेत.
गुन्हा दाखल पुढील प्रमाणे-नोंद–
• गुन्हा क्रमांक: 581/2025
• कलम: भा. न्या. सं. 303(2)
• गुन्हा दाखल दिनांक: 07/08/2025
• एन्ट्री नंबर: 74/2025
• वेळ: रात्री 10.20
पोलीसांचे आवाहन—–
शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, CCTV फुटेज, संशयास्पद हालचालींची माहिती किंवा चोरीच्या मालासंबंधी कोणतीही माहिती असल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, ज्यामुळे आरोपीला लवकर पकडता येईल.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
🔗 पुणे ग्रामीण पोलीस अधिकृत संकेतस्थळ
‘सत्यशोधक’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••
Shirur Crime News : एस.टी. आगारात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !