
Contents
- 1 Shirur Madhe Dahashaticha Kahar:शिरूरमध्ये दहशतीचा कहर: रस्त्यावर पाठलाग करून तरुणावर हल्ला !
Shirur Madhe Dahashaticha Kahar:शिरूरमध्ये दहशतीचा कहर: रस्त्यावर पाठलाग करून तरुणावर हल्ला !
Shirur Madhe Dahashaticha Kahar:सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल!
शिरूर (पुणे), 6 मे 2025: (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
Shirur Madhe Dahashaticha Kahar:शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील मळगंगा लॉन्सजवळ एका 25 वर्षीय तरुणाचा रस्त्यावर पाठलाग करून गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मळगंगा लॉन्सजवळ शिवीगाळ, धमकी आणि मारहाण—–
फिर्यादी सूरंजन बिजेन गव्हाणे (वय 25, रा. आण्णापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विशाल रसीक पवार, अजय प्रकाश गव्हाणे, अक्षय (पूर्ण नाव अज्ञात) व अन्य चार अज्ञात व्यक्तींनी 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4:00 वाजण्याच्या सुमारास मळगंगा लॉन्सजवळ शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केली.
“एमआयडीसीमध्ये काम दिलं नाही”—
फिर्यादीच्या मते, आरोपींनी “तू मला एमआयडीसीमध्ये काम दिलं नाही” या कारणावरून दमदाटी करत त्यांच्या आई-बहीण यांच्याबाबत अश्लील शिवीगाळ केली. यानंतर अक्षय या आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हाताला पिरगळून मारहाण केली.
आमदाबाद फाट्यावर स्विफ्ट कारमधून पाठलाग—
त्याचदिवशी सायंकाळी 4:50 वाजता आण्णापूर-आमदाबाद फाट्यावर स्विफ्ट कारमधून पाठलाग करून आरोपींनी गाडीवर दगडफेक केली. यामध्ये फिर्यादीच्या वाहनाचे नुकसान केले गेले आहे.या प्रकरणी खालील कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —-
भारतीय दंड संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2), 351(3) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत.
तपास अधिकारी: पो. हवा.बनकर
दाखल अंमलदार: पो. हवा. शिंदे
प्रभारी अधिकारी: पो.नि. संदेश केंजळे (मो. 7738601191)
——-
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवारी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
1 thought on “Shirur Madhe Dahashaticha Kahar:शिरूरमध्ये दहशतीचा कहर: रस्त्यावर पाठलाग करून तरुणावर हल्ला !”