
Contents
- 1 Shirur Loksabha Election 2025: शिरुर लोकसभा निवडणूक : तेच चेहरे पुन्हा ! मग काय ढेकळं बदल होणार?
- 1.1 Shirur Loksabha Election 2025
- 1.1.1 शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणुक 2024—
- 1.1.2 शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक : मुख्य प्रवाहातील मिडीया एक्पोजड्…..
- 1.1.3 शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणुक आणि ईव्हीएम—
- 1.1.4 उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात—
- 1.1.5 देशाचे काही का होईना ?—
- 1.1.6 तीच घराणेशाही,तेच जातीपातींचे गणित—
- 1.1.7 ‘पहिला प्याला’ पण कोण ?—
- 1.1.8 खर्या समस्या कायम…..
- 1.1.9 तेच चेहरे पुन्हा ! मग काय ढेकळं बदल होणार ?—
- 1.1.10 अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••••
- 1.1.11 About The Author
- 1.1 Shirur Loksabha Election 2025
Shirur Loksabha Election 2025: शिरुर लोकसभा निवडणूक : तेच चेहरे पुन्हा ! मग काय ढेकळं बदल होणार?
Shirur Loksabha Election 2025
” Shirur Loksabha Election 2025 : शिरुर लोकसभा निवडणुक 2024″ या लेखात राजकारणातील ढोंगीपणा, माध्यमांची पक्षपाती भूमिका, मतदान यंत्रणांवरील शंका, आणि निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्ट पद्धती यांचा सखोल आढावा घेतलेला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव, तरुणांच्या मतप्रक्रियेतील सहभाग आणि समाजाच्या वैचारिक थकव्यावर ही टीका आहे. शिरुर मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा असून, लोकशाहीचे खरे स्वरूप आणि भविष्य काय असावे, यावर विचारमंथन घडवणारा लेख.”
शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणुक 2024—

शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात अखेर झाली आहे.गेल्या काही वर्षांत भारतातील राजकारण करण्याच्या पद्धतीने अगदी खालचा दर्जा गाठला गेला.असे एका बाजुने म्हटले जात राहिले.दुसर्या बाजुने काही उत्तरच द्यायचे नाही असे जणु ठरवून आपली कार्यपद्धती चालुच ठेवण्यात आली. आता प्रिंट मिडीया आणि डिजीटल मिडीयाबरोबरच सोशल मीडियाही अत्यंत प्रभावी झाला आहे. चोहोबाजुंनी ववेगवेळी मते मतांतरे व्यक्त होत राहिली.पुर्वीपेक्षा आजचा भारतीय समाज ‘माहीतीपुर्ण’ किंवा ‘माहितीसज्ज’ असा बनत असल्याचं चित्र आहे.पण माहितीचे विश्लेषण करण्याच्या बौद्धीक क्षमतेच्या पातळीवर अजुन गेलेला नाही.
शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक : मुख्य प्रवाहातील मिडीया एक्पोजड्…..
मुख्य प्रवाहातील मिडीया लोकांसमोर एव्हाना expose झाला आहे. तो खोटे पण रेटून रेटून एकच बाजू सांगत राहिला. चोहोबाजुंनी मारा करु लागला.पक्षपाती झाला. विकला गेला किंवा दहशतीखाली गेला हे देशानेच नाही तर परदेशातही दिसले.त्यात काही पोटनिवडणुका,विधानसभा निवडणुका झाल्या.त्यातही सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे श्री.शरद पवार यांच्यासारख्या जबाबदार राष्ट्रीय नेत्याने कालपरवा म्हटले आहे.अगदी मतदान यंत्राच्या बाबतीतही असलेल्या आक्षेपांना पुरक असे प्रकार आप,चंदीगढ वगैरे प्रकरणात म्हटले गेले. EVM हे भुत अजुन भारतीयांच्या मानगुटीवर बसलेले आहेच.
शिरुर लोकसभा मतदारसंघ निवडणुक आणि ईव्हीएम—
त्यामुळे किमान ते सुरु केल्यापासुन म्हणणे चार लोकसभा निवडणूका ह्या खर्या निवडणुका EVM नेच जिंकल्या गेल्या असे मानणारा वर्ग काही कोटींच्या संख्येत भारतात आहे.त्याविरोधातील आंदोलनांना मुख्य प्रवासातील मिडीया प्रसिद्धी देईल अशी कोणी आशाही करणार नाही. बोगस पोल दाखवून,बोगस लोकांच्या प्रतिक्रिया घेउन आगोदरच वातावरण निर्मीती करणे आणि पोलप्रमाणेच निकाल आले आहेत ,असे ऊर बडवून बडवून हाच मुख्य प्रवाहातील मिडीया दाखवणार आणि त्यानंतरचा विजयोत्सवही असा दाखवणार की अगदी योग्य असा कौल मतदारांनी दिला आहे . लोक हे पहात रासणार आणि विसरुन जाणार . वास्दविक करोडोंचा विरोध असताना तातडीने EVM पद्धत बंद केली जायला पाहीजे होती. जशी अगदी अमेरिकन सरकारनेही केली आहे.पण इथला इतिहासच लोकांना फसवण्याच्या आहे.आणि कोनतीही शरम न बाळगता ही पद्धत चालुच राहीली आहे .
आता परत त्याच पद्धतीने देशात लोकसभा निवडणूक होत आहे. त्याधी केजरीवालांची अटक,अमेरिका, जर्मनी,संयुक्त राष्ट्र संघाकडून प्रतिक्रिया आली. तेव्हा खा.संजय यांचा जामिन मंजूर करून सारवासारव केली गेली.ही एकदम ताजी बातमी ! असो.
उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात—
शिरुर लोकसभा मतदारसंघामधे आताच्या घडीला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.सर्व प्रमुख पक्ष,नवीन निर्माण झालेले पक्ष,काही संघटना,अपक्ष वगैरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.अजुन काही उतरतील.पण एवढी सारी बोंब झाल्यानंतर मतदारांसमोर पुर्वीचेच चेहरे आले आहेत.काही मिडीया हाउसेस कुणा एका किंवा एकापेक्षा जास्त उमेदवारांकडुन ‘सुपारी’ घेतल्याप्रमाणे अगदी कायम करत असलेल्या पद्धतीने उदा.मतदारसंघ अमुक अमुक यांचा राहणार का नाही अशा प्रकारे लेखन, बातम्या द्यायला देणे वगैरे उतावीळपणे सुरु झाले .
देशाचे काही का होईना ?—
देशाचे काही का होईना ? आपले ‘काम’ झाले पाहिजे. हीच वेळ आहे. परत निवडणुका काही सारख्यासारख्या येत नाहीत.म्हणून Package मागुन बातम्या द्यायला लागली आहेत. प्रचंड खर्च करणारे उमेदवार सर्वांना माहीत असतात. त्यांच्याच नावाने मग त्यांच्याच बातम्या देणे सुरु झाले आहे.दोन तीन अशाप्रकारचे उमेदवारांना या प्रवृत्तीचा नेहमी फायदा होतो. मग ते सहज असे थोड्या थोड्या किंमतीची जणु ‘सुपारी’च द्यायला तयार असतातच . विभिन्न प्रिंट माध्यमातील लोक तर आधीच या धंद्यात मुरलेले आहेत.ते अशाच दोन तीन उमेदवारांच्याच बातम्या देतात.समाजाचे नुकसान हे होते की एखादा योग्य उमेदवार उभा आहे हे माहीतसुद्धा होत नाही.अशीच सवय लोकांना लागते.परिणामी सगळेच आज ते करत आहेत तर मी एकट्यानेच करुन काही उपयोग होणार नाही. अशा विचाराने, निराशेने त्याच वातावरणात प्रामाणिकही मिसळुन जातात. सगळेच जिथे ‘लबाड’ असतात. तिथे ‘प्रामाणिक’ हा ‘लबाड’ ठरतो.’लबाड’ प्रामाणिक ठरतो.
आक्षेप आहे तो यामुळे की इथं निवडणुक नेमकी अशी जिंकली जाते,त्या पद्धतीमुळे.कोणीतरी एकच जिंकणार असतो.पण तो कसा जिंकतो , हे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे समाजही दाखवायला लागतो म्हणून . सर्वात महत्वाचे म्हणजे याचे दूरगामी परिणाम त्या लोकशाही मुल्यांवर होतो. जी व्यक्ती आणि समाज यांना उच्चतर जीवनाची हमी देत असतात .
तीच घराणेशाही,तेच जातीपातींचे गणित—
ती मुल्ये समाजापर्यंत पोहोचुही नयेत याची काळजी (?) मग अशी व्यवस्था घेत असते. आता याच लोकांनी गेल्या काही वर्षांमधे ‘धावपळ’केली.’पळापळ’केली.फोडाफोडी,तोडातोडी,फाटाफुटी,खोकी,पदे,पर्यटन ठिकाणी वारी,उंच उंच,गार गार !, अशा अनेक गोष्टी केलेल्या आपण पाहिल्या. आणि हेच चेहरे परत साळसुदपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना पर्यायच नाही, असे मिडीया रंगवत आहे. तीच घराणेशाही,तेच जातीपातीच्या मतदारांची एकुण संख्या व शेकडा प्रमाण सांगणे,दाखवणे इ.
‘पहिला प्याला’ पण कोण ?—
परिणामी त्या मतदारांनीही तसेच करणे, मग पार्ट्या , दारु, रोख रक्कमही मतदार व नवतरुणांना देणे . कित्येक तरुण जे पस्तिशी ,चाळीशीत दारु पिऊन मेले. त्यांनी ‘पहिला प्याला’ हा फुकटचा अशा निवडणुकीतच प्यायलेला होता. असेही दिसेल.
खर्या समस्या कायम…..
आणखीन एक बाब तरुणांच्या लक्षात येईना ती ही की आपल्यासाठी क्रिकेटच्या टुर्नामेंटस,कुस्ती स्पर्धा,दांडिया स्पर्धा,उत्सव वगैरे हे आपल्याला राजकिय हेतुने,कार्यकर्ता बनवण्याच्या हेतुने आयोजित करण्यात आलेली असतात.आणि नंतर निवडणुकीत आपल्याला वापरुन घेण्यासाठी भरवलेल्या अशा या स्पर्धा असतात.हळदीकुंकूचा कार्यक्रम,महिलांचे कार्यक्रम वगैरे देखील महिलांना त्या माहौलमधे ओढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या असतात.यामुळे मुख्य समस्या माणुस तात्पुरता विसरतो.पण हे संपले की डोळे उघडतात.समस्या पुर्वीसारख्याच! पण वेळ निघुन गेलेली असते.
तेच चेहरे पुन्हा ! मग काय ढेकळं बदल होणार ?—
शिरुर लोकसभा मतदारसंघाचा देखील हाच इतिहास आहे. आणि आताही काही वेगळी चिन्हे दिसत नाहीत. म्हणून गेल्या काही वर्षांत लोकांना आलेल्या अनुभवातुन धडा घेतला जाण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून ‘तेच चेहरे पुन्हा ! मग काय ढेकळं बदल होणार ? असे म्हणण्यासारखी स्थिती आहे!
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना•••••••
1. Election Commission of India – लोकसभा निवडणुकीची अधिकृत माहिती
2. PRS Legislative Research – भारतीय राजकारण व धोरणे
3. Factly – निवडणूक व माहिती विश्लेषणासाठी पोर्टल
4. Boom Live – निवडणूक संबंधित फॅक्ट चेक्स
5. Alt News – राजकीय व सामाजिक माहितीची पडताळणी
6. The Wire – माध्यमांवरील विश्लेषणात्मक लेख
7. Scroll.in – निवडणूक संदर्भातील भिन्न दृष्टिकोन
8. IndiaSpend – डेटा आधारित पत्रकारिता (राजकीय विश्लेषण)
9. CJP – नागरिक हक्क व निवडणूक पद्धतीवर लक्ष ठेवणारी संस्था
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करून—
Top 10 पर्यटन केंद्र शिरुर तालुका ! एक अभ्यासपुर्ण लेख !
👉 “तुम्ही याविषयी काय विचार करता? खाली कमेंट करा किंवा लेख शेअर करून आपले मत मांडायला विसरू नका!”