
Contents
- 1 Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay :शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकरी हितैषी निर्णय
- 1.0.1 Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay नुसार सायंकाळी ५ ते ८ ऐवजी पहाटे ४ ते ७ ही वेळ–
- 1.0.2 मनमानी कारभाराविरोधात शेतकरी कृती समितीला यश—
- 1.0.3 Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay ऐतिहासिक —
- 1.0.4 Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay नुसार या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे –
- 1.0.5 Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay चे शिल्पकार शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे —
- 1.0.6 अधिक माहिती साठी खालील लिंक तपासा —
- 1.0.7 About The Author
Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay :शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकरी हितैषी निर्णय
Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay News 24 May 2025: (Satyashodhak News Report )
Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay घेण्यात आला आहे.शेतकरी म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा. पण वेळोवेळी प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका अशाच निर्णयामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शेतकरी त्रस्त होते.
Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay नुसार सायंकाळी ५ ते ८ ऐवजी पहाटे ४ ते ७ ही वेळ–

Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay या निर्णयानुसार, शेतमाल विक्रीची वेळ सायंकाळी ५ ते ८ ऐवजी पहाटे ४ ते ७ अशी बदलण्यात आली होती. ही वेळ शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे गैरसोयीची होती. ना पुरेशा वाहतूक सुविधा, ना ग्राहकांची उपस्थिती – परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले.
मनमानी कारभाराविरोधात शेतकरी कृती समितीला यश—
या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी कृती समिती – शिरूर, श्रीगोंदा व पारनेर तालुका यांनी एकत्र येत प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला. आंदोलनाचा इशारा देण्यात आला. काही अपरिहार्य कारणांमुळे आंदोलन लांबले, पण प्रशासनाशी संवाद सुरू ठेवत अखेर एका सकारात्मक टप्प्यावर पोहोचला.
Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay ऐतिहासिक —
२२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता एक ऐतिहासिक Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay बैठक पार पडलेया बैठकीला प्रशासक मा. साकोरे साहेब, सचिव श्री अनिल ढोकले साहेब, शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्यासमोर असलेल्या अडचणी थेट प्रशासकांसमोर मांडल्या. साकोरे साहेबांनीही अत्यंत समंजसपणे व सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतले.
Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay नुसार या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे –
1. विक्री वेळ सायंकाळी:
येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना पुन्हा सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कांदा मार्केट यार्डमध्ये शेतमाल विक्री करण्यासाठी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
2. अतिक्रमणावर कारवाई:
सध्याच्या बाजार यार्डमध्ये असलेल्या अतिक्रमण आणि शेतकऱ्यांना अडवण्याच्या प्रकारांवर तातडीने ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले.
3. शेडसाठी निधी मंजुरी:
शेतकऱ्यांच्या सुविधा वाढवण्यासाठी १.५ कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी सहकार संचालकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामधून शेड बांधकाम सुरू होणार आहे.
या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. आता ते आपल्या सोयीच्या वेळेत – सायंकाळी – शेतमाल विक्री करू शकतील. ग्राहकांनाही दररोज संध्याकाळी ताजा भाजीपाला, फळे व अन्य शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची सोय होणार आहे.
Shirur Krushi Utpanna Bazar Samiti Nirnay चे शिल्पकार शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नाथाभाऊ पाचर्णे —
“शेतकरी बांधवांच्या एकजुटीच्या जोरावरच हे यश शक्य झाले. प्रशासनाने आमच्या मागण्या समजून घेतल्या, यासाठी आम्ही आभारी आहोत. आपल्या सर्वांची ही एकजूट कायम राहावी.”
त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की,
“येणाऱ्या तीन दिवसांनंतर शेतमाल सायंकाळी ५ ते ८ या वेळेतच बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा. स्वयंशिस्त पाळा आणि कोणत्याही गैरसोयी टाळा.”
शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी मोबाईल नंबर: ७७६९८६५१९६ वर संपर्क साधावा, असेही आवाहन पाचर्णे यांनी केले.
अधिक माहिती साठी खालील लिंक तपासा —
1. महाराष्ट्र शासन – कृषी विभाग
https://krishi.maharashtra.gov.in
राज्याच्या कृषी योजनांची अधिकृत माहिती.
2. ई-नाम (eNAM – National Agriculture Market)
https://www.enam.gov.in
शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्केट याविषयी माहिती.
3. किसान सुविधा पोर्टल (Govt. of India)
https://farmer.gov.in
सरकारच्या योजनांची आणि हवामानाची माहिती.
4. अॅगमार्कनेट (Agmarknet)
https://agmarknet.gov.in
देशभरातील बाजार भावांची अपडेट माहिती.
5. शेतकरी योजना आणि अनुदान माहिती (India.gov.in Agriculture Section)
https://www.india.gov.in/topics/agriculture
सत्यशोधक न्युज च्या आणखीन बातम्या वाचा खालील लिंक वर क्लिक करून —-
Loan Guide in 2025 : 2025 मध्ये कर्ज कसे मिळवावे?
Best Insurance Scheme 2025: 2025 मध्ये सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स योजना कोणत्या आहेत?