
Contents
- 1 Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
- 1.1 Shirur Jalit Kand : येथील त्रिमुर्ती प्लॅस्टिक कंपनीला आग!
- 1.1.1 Shirur Jalit Kand : न्हावरे येथील त्रिमुर्ती प्लॅस्टीक कंपनी —-
- 1.1.2 Shirur Jalit Kand : आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न —-
- 1.1.3 Shirur Jalit Kand : एक चारचाकी transformer ला धडकली —
- 1.1.4 Shirur Jalit Kand : आगीत आतील सामान जळुन खाक—-
- 1.1.5 खबर देणार कंपनीचे मालक —
- 1.1.6 Shirur Police Station मधे नोंद व तपास—–
- 1.1.7 About The Author
- 1.1 Shirur Jalit Kand : येथील त्रिमुर्ती प्लॅस्टिक कंपनीला आग!
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
Shirur Jalit Kand : येथील त्रिमुर्ती प्लॅस्टिक कंपनीला आग!
Shirur 17 February :
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले आहे. अशी ताजी बातमी आहे. या जळीत कांडात 5 कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे कळते. हे Shirur Jalit Kand न्हावरे येथील त्रिमुर्ती प्लॅस्टिक कंपनीला आग लागुन घडले आहे. Shirur Police पुढील तपास करत आहेत.
Shirur Jalit Kand : न्हावरे येथील त्रिमुर्ती प्लॅस्टीक कंपनी —-

फिर्यादी गुलाब पोपट पडवळ, वय – 40 वर्ष, धंदा – व्यवसाय (त्रिमुर्ती प्लॅस्टीक) , राहणार- बोरीपाधीं (आनंद हेरीटेज) , तालुका – दौड, जिल्हा – पुणे यांनी माहिती दिली आहे.ती अशी आहे. शिरूर पोलीस स्टेशन अंकीत न्हावरा पोलीस दूरक्षेत्र येथे हजर राहुन त्यांनी माहिती दिली आहे. ती अशी की आहे. ते वरील ठिकाणी पत्नी करूणा, मुलगा कुणाल, मुलगी संस्कृती असे राहतात. त्यांची न्हावरे, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हदीत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या शेजारी शिरूर ते चौफुला हाय रे रोडच्या बाजुला जमीन गट नं. 445 मध्ये त्रिमुर्ती प्लॅस्टिक कंपनी आहे. त्यावर त्यांच्या कुटुबांची ते उपजिवीका करतात .

Read more>>
शिरुर तालुक्यात 6 लाख 36 हजार रुपयांच्या सोन्या,चांदीची चोरी कुठे व कशी झाली ते वाचा इथे !
Shirur Jalit Kand : आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न —-

त्या कंपनीमध्ये मोठमोठ्या मशिनरी आहेत. 9:15 वाजता ते त्यांच्या घरी बोरीपार्थी येथे होते. त्यांना मॅनेजर योगेश आरोटे याचा फोन आला . फोनवरून त्यांनी सांगितले की,’ आपल्या त्रिमूर्ती कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. तुम्ही लवकर या .’ ते लगेच न्हावरे येथे कंपनीजवळ गेले.तेव्हा त्यांनी पाहीले की कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती. त्यांनी त्यानंतर रांजणगाव एम. आय. डी. सी. मधील अग्नीशामक दल fire brigade यांना फोनद्वारे कळविले. तसेच शिरूर नगरपरीषद येथील अग्नीशामक दल यांना देखील कळविले. दोनही अग्निशामक गाड्या 20 मिनिटांनी तेथे आल्या.

Shirur Jalit Kand : एक चारचाकी transformer ला धडकली —
त्यांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने ती आग विझवू शकले नाहीत . त्यानंतर वाघोली येथील पी. एम. आर. डी. ए. येथील अग्निशामक बोलवण्यात आली. तसेच इतर गावातील व रस्त्याचे काम चालू असलेले पाण्याचे टैंकर आले. त्यांनी सर्वांनी मिळून आग विझवली. त्यावेळी त्यांनी मॅनेजर योगेश आरोटे यास ‘ आग कशी लागली?’ असे विचारले.त्यावर त्याने सांगितले की, ‘ कंपनी समोर असलेल्या विदयुत ट्रांसफार्मरला एक फोर व्हीलर धडकली. त्यामध्ये विदयुत ट्रांसफार्मर खाली पडुन शॉर्ट सर्कीट झाले. कंपनीला आग लागली.
Read more>>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
त्यांनी पाहीले असता तेथे युंदाई कंपनीची औरा गाडी तिचा आर.टी.ओ.नं.एम. एच. 12 यु.एस. 1994 असा होता.ती होती. तिचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटला होता. ती विदयुत टॉन्सफॉर्मरला धडकली होती. नंतर आग विझल्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये जावून पाहीले.
Shirur Jalit Kand : आगीत आतील सामान जळुन खाक—-

त्यावेळी आतमधील आगीमध्ये कंपनीमधील मशनरी, तसेच पोल्ट्री भांडी, कंपाउंड जाळी, शेततळ्याचे कागद, कागदाचे रोल, मेडनेट, कंपनीतील ऑफिस व्यामधील लॅपटॉप, प्यूटर प्रिंटर, कुंपनीतील सी. सी. टी. व्ही. वजन काटे, हार्डवेअर चे मटेरियल, लोखंडी एक, इतर विक्रीला ठेवलेले साहीत्य कंपनीचे अँगल पत्रा प्लायवुड, कंपनीतील इतर साहीत्य व कांऊटर मधील टेबलचे ड्रावर मधील 1,50,000/- रुपये कॅश अशा एकूण अंदाजे 5 कोटी रूपयाचे आगीत जळुन नुकसान झाले आहे.
Read more>>
शिरुर मधील बहुचर्चित ‘असिफ खान हल्ला प्रकरणा’ तील आरोपीस अखेर अटक !
खबर देणार कंपनीचे मालक —
गुलाब पोपट पडवळ, वय- 48 वर्ष, धंदा- व्यवसाय (त्रिमुर्ती प्लॅस्टीक) राहणार- बोरीपार्धा (आनंद हेरीटेज), तालुका – दौड, जिल्हा – -पुणे.
Shirur Police Station मधे नोंद व तपास—–

शिरूर पोलिस स्टेशन मधे या घटनेची अकस्मात जळीत म्हणुन नोंद करण्यात आली आहे. रजिस्टर नंबर- 02/2025 असा आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. वाघमोडे हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. जाधव हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
1 thought on “Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)”