
Contents
- 1 शिरूर : हिट-अँड-रन प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा; आरोपी चालक जळगाव येथून ताब्यात
शिरूर : हिट-अँड-रन प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा; आरोपी चालक जळगाव येथून ताब्यात
शिरूर, ११ मार्च २०२५: ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे झालेल्या हिट-अँड-रन अपघाताचा गूढ उलगडण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.
अपघाताचा घटनाक्रम:
११ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात करणसिंग ग्यानसिंग जमरे (वय ४९, रा. बडवाणी, जिल्हा राजपूर, मध्यप्रदेश) हे दुर्दैवीरित्या मृत्युमुखी पडले.
सीसीटीव्ही व तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध–
अपघातानंतर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात आणि रविंद्र आव्हाड यांनी शिरसगाव काटा, पिंपळगाव सुटी, निर्वी, काष्टी आणि तांदळी परिसरातील ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण करून अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेतला.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध आणि आरोपीस अटक–
तपासादरम्यान अपघात करणारे वाहन आशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (MH25AJ7637) असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासानंतर हे वाहन वारे वडगाव, तालुका भुम, जिल्हा जळगाव येथून मिळाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक प्रितेश राजेंद्र गायकवाड याला ताब्यात घेतले.
पोलिसांचा उल्लेखनीय तपास–
या संपूर्ण तपास व कारवाईसाठी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस निरीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, शुभम चव्हाण तसेच सहायक पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत.