शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कधी पारडे वर तर कधी खाली ! तर दौलतनाना शितोळे यांनी अपहरण प्रकरणाची उडवली खिल्ली आणि आप चे नितीन पवार अशोक पवार यांना पाडणार !
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कधी पारडे वर तर कधी खाली ! असे ताजे चित्र आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये माऊली आबा कटके यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले वृत चैनल वर दिसले.तर ॲडव्होकेट शिरीष लोळगे यांनी अशोक बापू पवार यांची 'घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत बाजु सांभाळताना दिसले.एकंदरीत शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ हा, ' कुरुक्षेत्र' बनला आहे हे नक्की!
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कधी पारडे वर तर कधी खाली ! तर दौलतनाना शितोळे यांनी अपहरण प्रकरणाची उडवली खिल्ली आणि आप चे नितीन पवार अशोक पवार यांना पाडणार!
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये माऊली आबा कटके यांचे कार्यकर्ते आक्रमक !
शिरुर,दिनांक 13 आक्टोंबर : (प्रकाश करडे यांच्या कडुन)
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कधी पारडे वर तर कधी खाली ! असे ताजे चित्र आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये माऊली आबा कटके यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले वृत चैनल वर दिसले.तर ॲडव्होकेट शिरीष लोळगे यांनी अशोक बापू पवार यांची ‘घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत बाजु सांभाळताना दिसले.एकंदरीत शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ हा, ‘ कुरुक्षेत्र’ बनला आहे हे नक्की!
शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ बनला, ‘कुरुक्षेत्र’. ….
शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024 चे ,’कुरुक्षेत्र’ जणू धगधगत आहे ! रोज एका बाजूचे पारडे वर जाते आहे. तर दुसऱ्या बाजूचे पारडे खाली जात आहे. अशी परिस्थिती दिसत आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे माऊली आबा कटके यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांचे असणारे तिकीट , भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची लढावु फौज आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या शिवसैनिकाचा जोरदार प्रचार चालू आहे .’शिरुर हवेली’
‘आप’चा पाठिंबा माऊली आबा कटके यांना…
Dr.Not in Pawar, Editor -satyashodhaknews.com
” दरम्याण आम आदमी पक्षाने महा आघाडीच्या उमेदवाराचा पाठिंबा मागे घेतला आहे,असे आम आदमी पक्षाचे संभाव्य उमेदवार राहिलेले डा.नितीन पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना इंडिया आघाडीच्या प्रचार कार्यक्रमात जाणीवपुर्वक बाजुला ठेवण्यात आले होते. आता पुन्हा तेच करण्यात आले आहे.त्यामुळे आप कार्यकर्त्यांचे श्रम व प्रामाणिकता व्यर्थ खर्च होत राहीली.हे पिठ्यान पिठ्या आपल्याकडेच सत्ता ठेवण्यासाठी प्रभावी राजकीय स्पर्धकांना वर येवु न देण्याच्या मानसिकतेतुन केले जात आहे. त्यामुळे आप चे स्वाभिमानी कार्यकर्ते हे कदापि मान्य करणार नाहीत.असे डा.नितीन पवार यांनी म्हटले आहे.
‘आम आदमी पक्ष आता महा आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना विजयी होवु देणार नाहीत’.असे डा.नितीन पवार यांनी सांगितले आहे. शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात अशोक पवार हे आपल्याच कुटुंबाला अनंत काळापर्यंत आमदार पद,जिल्हा परिषद,कारखाने अशा सर्व ठिकाणी प्रस्थापित करु पहात आहेत.
पण आम आदमी पक्षाचा एक कार्यकर्ता लाखांना भारी असतो.शेकडो दगडांपेक्षा एक हिरा मौल्यवान असतो.पवार यांना कदापि मतदारांनी मतदान करु नये.हा तुम्हालाही धोका देत आला आहे. त्याचे शिरुर मधील चमचे व एक उद्योगपती यांचे हेच चारित्र्य आहे. मतदारांनी यांना मतदान करु नये.कारण यांना फक्त पैसा ,सत्ता व ऐशो आरामीचे जीवन पाहिजे.तेही पिढ्यानपिढ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीतही शिरुर ल लागलेले हे उद्योगपतीचे भुत कायमचे आप उतरुन टाकेल ! हे ही लक्षात ठेवा.”
शिरुर हवेली विधानसभा मतदान संघ पिंजून काढला. ..
शिरूर हवेली मतदारसंघातील प्रत्येक गाव प्रचार दौरा ,सभा ,घोषणा, पदयात्रा, रॅली, प्रचारक, पक्षाचे झेंडे,फलक, स्टिकर्स इत्यादी वस्तू अगदी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ शिरूर ते अगदी उरुळी कांचन,वढु, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, मांडवगण फराटा, वडगाव रासाई इत्यादी भाग अक्षरशः पिंजून काढला जात आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महायुतीचे पहिल्या,दुसर्या फळीतले आणि तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते नियोजनपूर्वक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
माउली कटके : नवी आशा ….
माऊली कटके हे नवीन उमेदवार आहेत. तरुण उमेदवार आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप करता येण्यासारखाच नाही कारण ते यापूर्वी आमदार राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रकारचे आरोप विशेष दखल घेण्याजोगे होणे शक्य नाही. ही एक त्यांची जमेची बाजू आहे . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासाठी महत्त्वाचा असणारा मतदारसंघ असल्यामुळे आणि महाआघाडीचे ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या दृष्टीने हा विधानसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा विषय ठरलेला असल्याने इथले विधानसभा निवडणुकीचे मैदान ‘कुरूक्षेत्र’ ठरले नाही तर नवलच ! दोन्ही बाजूने एक एक पत्ता बाहेर काढायला सुरुवात झालेली आहे .
आमदार पुत्रावर बेतला अवघड प्रसंग…
माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेली घटना, त्यानंतर उमटलेली समिश्र अशी प्रतिक्रिया यांनी काल परवाचा दिवस ढवळून निघाला आहे.अशोक बापू पवार यांना या गोष्टीचा विशेषता सहानुभूती म्हणून पाठिंबा वाढणार आहे की विरोधकांनी हा राजकीय मुद्दा नसल्याचे सांगत वैयक्तिक असून त्याबाबतही शंका उपस्थित केलेले आहेत.त्यामुळे पवार यांच्या मुलामुळे त्यांची सहानुभूती कमी होईल का हे निकालानंतरच ठरेल? त्या पद्धतीने वेगवेगळ्या स्थानिक माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आणि माहिती सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाब नक्कीच चांगली आहे. मुख्य प्रवाहातील मिडीयाने पुर्वीच आपली विश्वासार्हता गमावलेली आहेच. काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.असे वातावरणात माहितीचे माऊली आबा कटके यांनी संयमाची भूमिका घेतली, झालेल्या घटनेचा निषेध करून त्याचा तपास व्हावा अशी मागणी केली. तर यामध्ये एक कार संशयास पद्धतीने वाघोली येथील बंगल्यासमोर वावरत होती. हा मुद्दा फेटाळल्याने वाघोली ते पुणे कनेक्शनची काही शक्यता फेटाळुन लावली गेली आहे. या घटनेचा पोलीस तपास चालू असल्यामुळे त्याबाबत पोलीस तपासाअंतीच काय ते लोकांच्या समोर येईल.
शिलेदार दौलतनाना शितोळे लढवत आहेत महायुती आणि बहुजन समाजाचा किल्ला !
दौलतनाना शितोळे
” दौलतनाना शितोळे हे जयमल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातुन राज्यभर महायुतीचा किल्ला सातारा,कोल्हापूर, कराड इ.ठिकाणांसह शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात लढवत आहेत. बहुजन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या हितासाठी ते सतत कार्यरत आहेत. लवकरच ते शिरुर मधे मोठी पदयात्रा रॅली काढणार आहेत.असे समजते.आमदार पुत्राच्या प्रकरणाची त्यांनी खिल्ली उडवली आहे.तर आनखीन माहिती उघड करणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.”
माऊली आबा कटके यांचे शिरुरचे शिलेदार जोरात…..
दरम्यान शिरुर शहरांमध्ये माऊली आबा कटके आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी सातत्याने प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचाराचा सपाटा चालू ठेवलेला आहे. न्यूज चैनल वरील डिबेट मध्ये दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे आणि आक्रमकपणे एकमेकांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारच्या तक्रारी, आरोप प्रत्यारोप, स्पष्टीकरण, गोंधळ, बाचाबाची, आरडाओरड पाहायला मिळाला. शिरूर शहरातील काही काळापूर्वी पाडल्या गेलेल्या टपऱ्यांचा विषय विजय नरके या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांने जोरदारपणे मांडला.उमेश शेळके यांनी दमदारपणे प्रतिवाद केला. एडवोकेट शिरीष लोळगे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंबंधी काही बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. एकेकाचे धडाडीचे शिवसैनिक मंगेश खांडरे यांनी घेतली देखील जोरदारपणे महाआघाडीच्या उमेदवारांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. वादविवाद थोड्याच वेळात व्हायरल होऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या मुद्द्यांची चर्चा झालेली ‘झुंज’ व तिची चर्चा मतदारसंघांमध्ये रंगू लागली. पारडे कधी यांच्या बाजूने तर कधी त्यांच्या बाजूने असणाऱ्या तक्रारी किंवा केलेली कामे यांच्या संबंधीची माहिती देणारे व्हिडिओ वगैरे रोज व्हायरल होत आहेत. वाबळेवाडी येथील शाळेतील शिक्षकांचा आणि पालकांचा रोष अशोक बापू यांच्यावर दिसून आला. तर कोरोनाच्या काळामध्ये आणि अनेक पेशंटला मदत केल्याच्या अशोक बापूंच्या आठवणी वगैरे काही लोकांनी सांगितल्या.
बड्या नेत्यांच्या सभा. ….
या सर्व प्रचारादरम्यान निश्चितपणे पुढे येत आहे ते ,हे की माऊली आबा कटके नम्रतेने, संयमाने, सुसंस्कृतपणे मतदारांच्या समोर जात आहेत. अगदी निलेश लंके यांच्याप्रमाणे त्यांची प्रतिमा तयार झाली नसली तरी शिरूर हवेलीला एक नवा पर्याय म्हणून ते आता प्रस्थापित झाले आहेत. हे नक्की ! कदाचित ते निवडुन येवु शकतात. कारण महायुती आणि महाआघाडी यांच्या दोन्ही बाजूने जोरदार प्रचार यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे एका दिवशी अशोक बापू वरचढ वाटत आहेत तर दुसऱ्या दिवशी माऊली आबा कटके वरचढ वाटत आहेत ! अजून मोठ्या नेत्यांच्या सभा या मतदारसंघांमध्ये झालेल्या नाहीत. माननीय शरदचंद्रजी पवार,अजित दादा पवार यांच्या सभा बाकी आहेत आणि त्या सभा देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारक यांच्या आगमनातूनही लढतीत रंग भरला जाणार आहे.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना प्रश्न. …
घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा मुद्दा मात्र अजूनही संवेदनशील आहे.तो अशोक पवार यांना सतावणार असेही दिसते. एकूणच पाहता ही लढत दुरंगी होत चाललेली आहे.
बहुजन मुक्ती पक्ष व बहुजन समाज पक्ष. …
तरी त्याला आणखीन एक बाजू आहे. बहुजन मुक्ती पक्ष, बहुजन समाज पक्ष यांच्या उमेदवारांना किती मते मिळवतात हे देखील माऊली आबा कटके आणि अशोक पवार यांच्या मतांना काय धक्का पोहोचू शकतील का असा प्रश्न आहे. या व इतर पक्षांना आणि अपक्षांना जास्त मते मिळाली तर थोड्या मतांच्या फरकाने विजय ,पराजय होण्याची शक्यता आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार नाथाभाऊ पाचर्णे हे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे एक नातलग आहेत आणि सुस्वाभावी, साध्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. रात्रंदिवस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्याबद्दल एक सहानभूती असल्याचेही दिसत आहे .बहुजन समाज पक्ष हा नेहमी निवडणूक लढवतो. तोही निवडणुकीच्या रिंगणात आहे. हसर्या चेहर्याचे एडवोकेट विशाल सोनवणे हे देखील आपल्या स्मित हास्याने मतदारांमध्ये स्थान निर्माण करताना दिसले. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार मात्र रिंगणातून बाहेर पळालेली दिसतात. त्यामुळे तो एक महत्त्वाचा घटक होता. परंतु तो राहिला नाही .तर अनेक आम्ही सर्व ‘नोटा’ चे बटन दाबणार असल्याचेही सांगतात. ही सर्व पक्षांच्या उमेदवारांबद्दल आणि पक्षाबद्दल असणारी नाराजी सुद्धा मतदारसंघांमध्ये दिसली. एकंदरीत शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ ढवळून निघत आहे आणि यावेळी काहीतरी वेगळे घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही !
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com