
Contents
- 1 Shirur Crime : शिरूर येथे वायर बंडल चोरीची घटना – शिरुर पोलिसांकडुन तपास सुरू !
- 1.1 Shirur Crime शिरुरचचे व्यापारी यश बरमेचा यांच्या दुकानातुन चोरी !
- 1.1.1 Shirur Crime : या चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे –
- 1.1.2 Shirur Crime : शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल—
- 1.1.3 Shirur Crime : शिरूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ—
- 1.1.4 Shirur Ctime: व्यापारी ,नागरिक यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना —
- 1.1.5 Shirur Crime शिरुर पोलिसांचा तपास सुरू –
- 1.1.6 Shirur Crime : शहरातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक –
- 1.1.7 About The Author
- 1.1 Shirur Crime शिरुरचचे व्यापारी यश बरमेचा यांच्या दुकानातुन चोरी !
Shirur Crime : शिरूर येथे वायर बंडल चोरीची घटना – शिरुर पोलिसांकडुन तपास सुरू !
Shirur Crime शिरुरचचे व्यापारी यश बरमेचा यांच्या दुकानातुन चोरी !
Shirur, Pune 24 February 2025: ( Satyashodhak News Report )
शिरूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात एका व्यावसायिक गाळ्यातून वायर बंडलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात फिर्यादी यश भरत बरमेचा वय – २८ वर्षे व्यवसाय – गुंतवणूक सल्लागार , राहणार- . मुंबई बाजार, शिरूर यांनी शिरूर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली आहे.
Shirur Crime :
या चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे –
अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गाळ्याचे कुलूप तोडून १८,९८० रुपयांच्या किमतीचे इलेक्ट्रिकल वायर बंडल चोरुन नेले आहेत. चोरी झालेल्या वायर बंडलचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
1. पॉलीकॅब वायर (2.5 एम.एम.) –
4 बंडल.
प्रत्येक बंडलची किंमत – 2680 /- रुपये इतकी आहे.
याची एकूण किंमत – 10,720 /- रुपये इतकी आहे.
2. फिनोलेक्स वायर- (1 एम.एम.) – 7 बंडल.
प्रत्येक बंडलची किंमत –1180 /- रुपये इतकी आहे.
एकूण किंमत – 8260 /- रुपये इतकी आहे.
Read more>>
Shirur Crime : शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल—

ही घटना समोर आल्यानंतर फिर्यादीने शिरूर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 133/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305 नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा प्राथमिक नोंद पोलिस हवालदार श्री. खेडकर यांनी केली आहे. पुढील तपास फौजदार हवालदार श्री. जगताप हे करत आहेत.
Shirur Crime :
शिरूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ—
गेल्या बर्याच महिन्यांत शिरूर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिक चिंतेत पडले आहेत .शिरुर पोलिस प्रशासनाने शहरात गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी जास्त सतर्कता ठेवावी, अशी मागणी स्थानिक नागरीक व व्यापारी यांच्या कडुन केली जात आहे.
Read more>>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
Shirur Ctime: व्यापारी ,नागरिक यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना —

शिरुर पोलिसांनी स्थानिक व्यापाऱ्यांना सुरक्षा उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.
पुढील काही उपाययोजना केल्यास अशा घटनांना आळा बसेल –
• गाळ्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे.
• रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे. स्थानिक नागरीकांचे स्वयंसेवी गट तयार करणे.रात्री गस्त घालणे.
• गाळ्यांमधे भक्कम कुलूप आणि Alarm System बसवणे.
• संशयास्पद हालचालींवर लक्षात देणे.तसे काही दिसल्यास त्वरित शिरुर पोलिसांना माहिती देणे.
Read more>>
Shirur Crime शिरुर पोलिसांचा तपास सुरू –
शिरूर पोलिस या चोरीचा कसून तपास करत आहेत. CCTV footage आणि स्थानिक गोपनीय सूत्रांच्या कडुन आरोपीचा शोध घेतला आहेत. या चोरीचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Shirur Crime :
शहरातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक –
शिरूरमधील सतत वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी व व्यावसायिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे आणि आपले परिसर सुरक्षित ठेवण्यास मदत करावी.