
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
Shirur Crime News:शिरुरच्या उच्चंभ्रु सोसायटीत हा काय तमाशा झाला ?
Shirur Crime News: शिरुरच्या श्रिनिवास सोसायटीत मारहाण करत प्रत्येक घरासमोर उठाबशा काढायला लावल्या ?
Shirur Crime News 3 April 2025: (Satyashodhak News Report )
Shirur Crime News: शिरुरच्या श्रिनिवास सोसायटीत मारहाण करत प्रत्येक घरासमोर एका सुपरवायजरला मारहाण करत उठाबशा काढायला लावल्याची नोंद शिरुर पोलिस स्टेशन मधे झाली आहे.
उच्चंभ्रु सोसायटीत हा काय तमाशा?
‘शिरुरच्या उच्चंभ्रु सोसायटीत हा काय तमाशा झाला आहे ?’ असे उद्गार शिरुर मधील नागरिकांनी काढले आहेत.आता शिरुरमधला कोनताच भाग व जवळ जवळ शिरुरचाच भाग असलेला रामलिंग ग्रामपंचायतीचा भाग शांत राहिला नाही.हिंसक वृत्ती सर्व स्तरात आता दि आयला लागली आहे.पोलिसांचा धाक देखील कुणाला का वाटत नाही? असा प्रश्न पडतो !
घटना सविस्तर अशी आहे-
दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.00 वाजण्याच्या सुमारास श्रीनिवास सोसायटी, रामलिंगरोड, तालुका- शिरुर, जिल्हा-पुणे येथे
फिर्यादी अंकुश माणिक कु-हाडे ,वय- 41 वर्षे, धंदा -पाणीपुरवठा (शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत) ,राहणार- रामलिंग रोड, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे हे ग्रामपंचायत ,शिरुर ग्रामीण येथे नळ पाणीपुरवठ्याच्या जेसीबीच्या साहयाने चारी खोदण्याचे शासकीय काम करत होते.
शासकीय कामात अडथळा आणला–
त्यावेळी अमित जयंत डोंगरे ,राहणार- श्रीनिवास सोसायटी, रामलिंगरोड, तालुका-शिरुर, जिल्हा- पुणे याने त्याच्या घराच्या पार्कीग समोरील ‘पाईपचे काम केले नाही’ म्हणुन फिर्यादी व जेसीबी सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे, राहणार- देवदैठण, तालुका- श्रीगोंदा, जिहा- अहील्यानगर याने शासकीय कामात अडथळा आणला. फिर्यादीच्या पाठीमागे कंबरेत, मानेवर दगडाने मारहाण केली. दुखापत केली.सुपरवायजर नाथा सुदाम शिंदे याला हाताने डोक्यात, पाठीत मारहाण केली.
घरांसमोर उठाबशा मारण्यास लावले?
त्यांच्या सोसायटीतील प्रत्येक घरा समोर उठाबशा मारण्यास लावले. तसेच माटोर सायकल क्रमांक एम. एच. 12 सी. झेड 9623 ला दगडाने ठेचले.तिचे नुकसान केली. फिर्यादी करीत असलेल्या शासकिय कामात हा अडथळा केला.म्हणुन फिर्यादीने त्याच्या विरुध्द कायदेशीर तक्रार शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे.
फिर्यादी–
अंकुश माणिक कु-हाडे, वय -41 वर्ष ,धंदा- पाणीपुरवठा (शिरुर ग्रामीण ग्रामपंचायत) ,राहणार- रामलिंग रोड ,तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे.
आरोपी–
अमित जयंत डोंगरे, राहणार-श्रीनिवास सोसायटी, रामलिंगरोड, तालुका-शिरुर,जिल्हा- पुणे
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 222/2025 असा आहे.भारतीय न्याय संहिता कायदा कलम 132,118(1),125,352,351(2)(3), 324(4) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. कदम हे आहेत. पुढीलतपास अंमलदार पोलीस हवालदार श्री.राउत हे करत आहेत. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे,पोलिस निरिक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
1 thought on “Shirur Crime News:शिरुरच्या उच्चंभ्रु सोसायटीत हा काय तमाशा झाला ?”