
Contents
- 1 Shirur Crime News: शरद मल्लाव वर अखेर स्थानबद्धतेची कारवाई!
- 1.1 Shirur Crime News: पुणे जिल्हा वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी केली आहे कारवाई!
- 1.2 सविस्तर घटना अशी आहे —-
- 1.3 रेकार्ड वरील गुन्हेगार शरद बन्सी मल्लाव—
- 1.4 हद्दपारीच्या कालावधीमधे गुन्हेगारी वर्तन चालु ठेवले—
- 1.5 धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबद्धतेसाठी कारवाई—
- 1.6 आकोला येथै रवाना करण्यात आले —
- 1.7 पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचि यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशारा—-
Shirur Crime News: शरद मल्लाव वर अखेर स्थानबद्धतेची कारवाई!
Shirur Crime News: पुणे जिल्हा वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी केली आहे कारवाई!
Shirur Crime News 9 April 2025:(Satyashodhak News Report)
Shirur Crime News: शरद मल्लाव वर अखेर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी ही कारवाई केली आहे.शिरुर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्हेगारी तत्वांवर यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सविस्तर घटना अशी आहे —-
शिरूर शहरातील सराफावर फायरींग करूणे ,व गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला सराईत गुंडाला पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांच्या शिफारशीवरुन माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी या ‘धोकादायक’ म्हणुन शरद बन्सी मल्लाव या इसमाला MPDA कायद्याखाली स्धानबद्ध करण्यात केले आहे.शिरूर पोलिस स्पेशन पुणे ग्रामीण पोलिसांची ही या चालू वर्षातील पहिली धडाकेबाज कारवाई आहे.असे मानले जात आहे.
रेकार्ड वरील गुन्हेगार शरद बन्सी मल्लाव—
शिरुर पोलिस स्टेशन मधील रेकार्ड वरील गुन्हेगार शरद बन्सी मल्लाव,वय- 25 वर्षे,काची आळी,शिरुर, तालुका -शिरुर, जिल्हा – पुणे हा ‘सक्रिय गुंड’ मानण्यात आला आहे. रांजणगाव पोलिस स्टेशन, पाली,पोलिस स्टेशन, जिल्हा -रायगड हद्दीमधे बेकायदेशीर अग्नीशस्र वापरणे,इच्छापुर्वक गंभीर व साधी दुखापत करणे,हाताने मारहाण, शिवीगाळ करणे,मालमत्तेचे जाळुन नुकसान करणे ,खुन करण
याचा प्रयत्न करणे,गुन्हा करण्यासाठी चिथावणी देणे,साथीदारांसह प्राणघातक हत
यारासह सज्ज असताना चोरी करण्याचा किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे,अग्नीशस्राचा व प्राणघातक हत्यारांचा वापर करुन खुन करण्याचा प्रयत्न करणे, साथीदारासह जबरी चोरी करणे,हिसकावुन चोरी करणे,अशा गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध एकुण 7 गंभीर गुन्हे सन 2021 ते 2024 या कालावधीत याच्यावर दाखल आहेत.
हद्दपारीच्या कालावधीमधे गुन्हेगारी वर्तन चालु ठेवले—
शरद बन्सी मल्लाव याला कायद्याचे कोनते ही भय व वचक राहिला नाही व नव्हता.तो लागोपाठगुन्हेगारी वर्तन करत होता.
पोलिसांनी या गुन्हेगाराला प्रत्येक गुन्ह्यात अटक करुन त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करत 1 वर्षे संपुर्ण पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व श्रिगोंदा तालुक्यातुन सन 2023 व 2024 मधे माननीय पोलिस अधिक्षक व हद्दपारीच्या कालावधीमधे गुन्हेगारी वर्तन चालु ठेवले.हद्दपारीनंतर त्याने 2 गंभीर गुन्हे केले होते.
धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबद्धतेसाठी कारवाई—
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील व शिरुर पोलिस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंकज देशमुख पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांच्या सुचनेप्रमाणे याला झोपडपटटी दादा,हातभट्टीवाले,औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणे,(व्हिडीओ पायरट ),वाळु तस्करी आणि अत्यावशक वस्तुंचा काळा बाजार करणार्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबत अधिनियम सन 1981 सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 3(1)अन्वये ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबद्धतेसाठी कारवाई होणेकामी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, शिरुर यांनी उपरोक्त MPDA कायद्याप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यास सांगितला होता.
आकोला येथै रवाना करण्यात आले —
पोलिस निरीक्षक यांनी प्रस्ताव पंकज देशमुख ,पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या कार्यालयात सादर केला होता.त्यांनी 8 एप्रिल 2025 रोजी आदेश दिले. त्यानुसार शरद मल्लाव याचा शोध शिरुर पोलिसांनी दिनांक 9 एप्रिल रोजी केला.सकाळी 9 वाजता काची आळी येथुन ताब्यात घेतले. 9 एप्रिलला मध्यवर्ती कारागृह आकोला,जिल्हा -आकोला,येथे जमा करून स्थानबद्ध करण्याकरता रवाना करण्यात आले आहे.शिरूर पोलिस स्टेशन मधे 2024 व 2025 या कालावधीत 4 सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचि यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशारा—-
गुन्हेगारांना पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पंकज देशमुख,पुणे जिल्हा पोलिस अधिक्षक, रमेश चोपडे अपर पोलिस अधिक्षक ,पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलिस अधिकारी,शिरुर उपविभाग, संदेश केंजळे,पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन, पोलिस हवालदार परशराम सांगळे,पोलिस अंमलदार सचिन भोई,नाथसाहेब जगताप,नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखिल रावडे, रविंद्र आव्हाड,निरज पिसाळ या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे.